जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / Rock from earth mantle : पहिल्यांदाच पृथ्वीच्या गर्भातून काढला एक किलोमीटर लांबीचा खडक; कारण आहे विशेष

Rock from earth mantle : पहिल्यांदाच पृथ्वीच्या गर्भातून काढला एक किलोमीटर लांबीचा खडक; कारण आहे विशेष

पृथ्वीच्या गर्भातून काढला एक किलोमीटर लांबीचा खडक

पृथ्वीच्या गर्भातून काढला एक किलोमीटर लांबीचा खडक

Rock from earth mantle : शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या समुद्रसपाटीखालील डोंगरात ड्रिलिंग करून एक किलोमीटर लांबीचा दगड काढला आहे. याद्वारे त्यांना पृथ्वीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. तसेच ज्वालामुखीय हालचाली, गुरुत्वाकर्षण आणि चुंबकीय शक्तींचा अभ्यास करायचा आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 12 जून : पृथ्वीशी निगडीत आजही अनेक रहस्य कायम आहेत. ही रहस्य जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ अविरत संशोधन करत आहेत. शास्त्रज्ञांनी नुकताच एक काहीसा वेगळा प्रयोग केला. समुद्राच्या तळाशी असलेल्या टेकडीत ड्रिलिंग करून एक किलोमीटर लांबीचा खडक बाहेर काढण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. या खडकाच्या माध्यमातून पृथ्वीशी निगडीत निरनिराळी रहस्यं आणि तिचा इतिहास जाणून घेण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. हा प्रयोग नेमका कसा केला गेला ते सविस्तर जाणून घेऊया. पृथ्वीच्या गर्भात नेमकं काय दडलं आहे, हा खरं तर एक रहस्यमयी प्रश्न आहे. हे गूढ उकलण्यासाठी शास्त्रज्ञ कायम निरनिराळे प्रयोग करत असतात. शास्त्रज्ञांनी नुकताच एक अनोखा प्रयोग केला. या प्रयोगादरम्यान त्यांनी अटलांटिक महासागरातील अटलांटिस मेम्फिस टेकडीला एक मोठं छिद्र पाडलं. हे छिद्र एक किलोमीटर खोल होतं. जॉयडिस रेझोल्युशन सायंटिफिक ड्रिलिंग व्हेसलच्या मदतीने हा प्रकल्प राबवला गेला. एक किलोमीटरचं छिद्र या टेकडीचं नाव पेडोटाइड असं आहे. हे पृथ्वीच्या आवरणात घेतले गेलेले सर्वांत खोल छिद्र नाही. पण भूवैज्ञानिक माहिती मिळण्यासाठी हा प्रयोग गरजेचा होता. कारण भूस्तरातून कोणाताही खडक काढणे फार कठीण असते. अटलांटिस हे मेम्फिस पर्वताच्या आवरणातील खडकांनी बनलेले आहे. त्यामुळे तिथे जाऊन खोदकाम करणे सोपे होते. या खोदकामातून पृथ्वीच्या दुसऱ्या आवरणातून खडक बाहेर काढला गेला. शास्त्रज्ञांनी अटलांटिक महासागराच्या आत अटलांटिस मेम्फिस पर्वतावर एक ड्रिलिंग व्हेसल अर्थात जहाज तैनात केले. त्यानंतर टेकडीच्या टोकापासून खोदकाम सुरू झाले. ही टेकडी मध्य अटलांटिक महासागरच्या उंचवट्यावर आहे. हे खोदकाम सुमारे 4156 फुटांपर्यंत केले गेले. ``हे एक महत्त्वाचे संशोधन आहे. यामुळे आपल्याला अनेक ऐतिहासिक घडामोडींची माहिती मिळू शकते. यामुळे येणाऱ्या कित्येक पिढ्यांना महत्त्वाचा डाटा मिळत राहील. या खडकाच्या आधारे आम्हाला अनेक गोष्टींचा अभ्यास करता येईल. यात प्रामुख्याने चुंबकीय बल, गुरुत्वाकर्षण, टेक्टोनिक प्रवाह आणि ज्वालामुखीचा समावेश असेल,`` असे शास्त्रज्ञांनी सांगितले. वाचा - समुद्र खवळलेला असताना तुफानी करायला गेले अन्…जुहू बीचवर मोठी दुर्घटना ``समुद्राच्या तळातून काढलेल्या या खडकामुळे भूवैज्ञानिक घटनांविषयी माहिती मिळेल. टेकडीत दडलेले धातू आणि खनिजांविषयी माहिती मिळेल. पृथ्वीच्या आवरणातून काढलेल्या पेरिडोटाइट खडकाचा एक किलोमीटरचा फक्त एक छोटासा भाग सापडला आहे. या खडकात ऑलिव्हिन आढळते. यामुळे खडकांच्या आत हायड्रोजन भरला जातो. यामुळे सुक्ष्मजीवांना फायदा होतो,`` असं शास्त्रज्ञांनी सांगितले. ``पृथ्वीच्या खालच्या भागातून खडक काढते आले तर पृथ्वीचा आकार, गुणधर्म आणि स्थिरता सहज कळू शकते. यावरून भूकंप होण्याचे कारण शोधता येईल. विविध स्तरांबद्दल माहिती मिळवू शकू, यामुळे पृथ्वी आणि पृथ्वीच्या विविध भागांचे शास्त्र समजण्यास मदत होईल,`` असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: science
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात