मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Sathya Sai Baba B’day: सत्यसाई बाबांमध्ये असं काय होतं की सचिन तेंडुलकरपासून माजी पंतप्रधान मनमोहन सिंगंही प्रभावित झाले?

Sathya Sai Baba B’day: सत्यसाई बाबांमध्ये असं काय होतं की सचिन तेंडुलकरपासून माजी पंतप्रधान मनमोहन सिंगंही प्रभावित झाले?

Sathya Sai Baba B’day: स्वतःला शिर्डीच्या साईबाबांचा अवतार मानणारे सत्यसाईबाबांची ख्याती जगभरात पसरली आहे. ते अनेक चमत्कार करत असल्याचा दावाही त्यांचे भक्त करतात. त्यांच्या भक्तांमध्ये माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरपासून (Sachin Tendulkar) माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचा समावेश होता. पण, हे भक्त चमत्कारांनी प्रभावित झाली की त्यांनी केलेल्या मानवसेवेने?

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 23 नोव्हेंबर: मागील काही काळापासून भारतातील (India) लोकांचा बाबांवरील विश्वास कमी होताना दिसत आहे. बाबा किंवा साधू यांच्याविषयी वाद निर्माण होणं ही काही नवीन गोष्ट नाही. विज्ञानाची मदत घेऊन बाबा कसे चमत्कार करतात हे अनेकदा उघड झाले आहे. चमत्कार आणि बाबांचा उल्लेख आला की, सत्यसाईबाबांची (Sathya Sai Baba) आठवण होते, ज्यांनी अनेक चमत्कार दाखवून भक्तांना आश्चर्यचकित केल्याचे सांगितले जाते. इतकच नाही तर मानव सेवेला (Human Service) धर्म मानून कार्य केले. त्यामुळे अनेक लोक त्यांना दैवी व्यक्तीच्या श्रेणीत ठेवतात.

मोठमोठ्या हस्तींवर प्रभाव

सत्यसाईबाबांची गोष्टीच वेगळी होती. ते स्वतःला शिर्डीच्या साईबाबांचा अवतार म्हणायचे आणि जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांनी पुढच्या वेळी पृथ्वीवर कधी परतणार हेही सांगितले होते. त्यांच्या प्रभावाखाली आलेल्या लोकांमध्ये समाजातील मोठमोठ्या हस्तींचा समावेश होता. राजकारणापासून क्रीडा आणि चित्रपट जगतापर्यंत त्यांना गुरू मानले जायचे. यामध्ये माजी पंतप्रधान नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांच्यापासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत त्यांना गुरू मानत होते.

वयाच्या 14 व्या वर्षी बदललं स्वरूप

सत्य साई बाबा यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1926 रोजी आंध्र प्रदेशातील पुट्टापर्थी गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव सत्यनारायण राजू होते. असे म्हटले जाते की ते 13 वर्षे सामान्य मुलासारखे जगले. परंतु, एकदा विषारी विंचू चाल्याने ते बराच वेळ बेशुद्ध होते. शुद्धीवर आल्यानंतर ते बदलले. त्यांनी अस्खलितपणे संस्कृत बोलण्यास सुरुवात केली, ज्याबद्दल त्यांना आधी काहीही माहित नव्हते.

बाबा आणि चमत्कार

यानंतर वर्षभरातच त्यांनी स्वतःला शिर्डीच्या साईबाबांचा अवतार घोषित केल्याचे सांगितले जाते. ते नेहमी शिर्डीच्या साईबाबांना 'त्यांचे पूर्वीचे शरीर' म्हणून संबोधत. शिर्डीचे साईबाबाही अनेक चमत्कार करण्यासाठी प्रसिद्ध होते. पण आपल्या भक्तांना चमत्कार दाखवण्यात सत्यसाईबाबाही मागे नव्हते. त्यांचे अनेक चमत्कार हे जादुई ट्रिक असल्याचं अनेकांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

Shirdi Sai Baba: शिर्डी साई संस्थानकडून दर्शनासाठी नियमावली जाहीर ...

जगभरात भक्त

सत्य साईबाबांकडे फक्त या दृष्टिकोनातून पाहणे पूर्णपणे समर्थनीय ठरणार नाही. त्यांचे चाहते जगभर पसरले होते. भारताशिवाय परदेशातही त्यांचे लाखो भक्त आहेत. बाबांचे अध्यात्मिक ठिकाण प्रशांती निलयम येथे रात्रंदिवस परदेशी भक्त भेट देत आहेत, जगातील अनेक भागांतील बाबांच्या भक्तांची चार्टर्ड विमाने या नगरातील खास विमानतळावर उतरतात. याच कारणामुळे आंध्र प्रदेशातील पुट्टापर्थी हे छोटेसे गावही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आहे.

सेवेचे उदाहरण

बाबा त्यांच्या सेवाच्या भावनेसाठीही ओळखले जातात. 20 व्या शतकात आंध्र प्रदेशात भीषण दुष्काळ पडला होता, तेव्हा सत्यसाई बाबांनी 750 गावांसाठी पाण्याची व्यवस्था केली होती. बाबांनी आध्यात्मिक शिकवणीसोबतच सामाजिक क्षेत्रातही अनेक सेवाकार्य केले. मानवसेवेला त्यांनी सर्वश्रेष्ठ धर्म म्हटले. याची सुरुवात पुट्टापर्थीमध्ये एका लहानशा हॉस्पिटलच्या बांधकामापासून झाली, जी आता 220 खाटांची सुपर स्पेशालिटी सत्य साई इन्स्टिट्यूट ऑफ हायर मेडिकल सायन्सेस बनली आहे.

देवा किती रे प्रतीक्षा! साईबाबांच्या दर्शनासाठी चेन्नईहून निघालेलं विमान ...

मोठ्या प्रमाणात देणग्या

सत्य साई बाबांसारखी ख्याती आजपर्यंत कोणत्याही संताला मिळाली नसावी. त्यांना कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळत असे. साई आश्रमातील वार्षिक देणगीच्या रकमेबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती नाही. परंतु, असे मानले जाते की साई जिवंत असताना दरवर्षी कोट्यवधी देणग्या तेथे येत असत. यातून सत्यसाईंनी अनेक रुग्णालये, शाळा, आश्रम, पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प उभारले. त्यामुळे त्यांची कीर्ती आणखी वाढली.

24 एप्रिल 2011 रोजी साईबाबांचे निधन झाले. यापूर्वी त्यांना महिनाभर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याआधीही त्यांनी पुन्हा दुसऱ्या शरीरासह पृथ्वीवर परतण्याचा अंदाज वर्तवला होता. आज त्यांच्या मालमत्तेची देखरेख आणि काम सत्य साई सेंट्रल ट्रस्टद्वारे केले जाते. त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांच्यावरील आरोप नेहमीच कमी होत गेले, जे कधीच सिद्ध होऊ शकले नाहीत.

First published:

Tags: Manmohan singh, Sachin tendulakar, Shridi sai baba