मराठी बातम्या /बातम्या /explainer /

मेटेंच्या अपघातानंतर रोड हिप्नोसिस चर्चेत; अडीच तास ड्राव्हिंगनंतर चालक होतो संमोहीत

मेटेंच्या अपघातानंतर रोड हिप्नोसिस चर्चेत; अडीच तास ड्राव्हिंगनंतर चालक होतो संमोहीत

Vinayak Mete : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं. त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम हा बीड तालुक्यात होता. या घटनेनंतर रोड हिप्नोसिस ही संकल्पना देखील पुन्हा चर्चेत आली आहे.

Vinayak Mete : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं. त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम हा बीड तालुक्यात होता. या घटनेनंतर रोड हिप्नोसिस ही संकल्पना देखील पुन्हा चर्चेत आली आहे.

Vinayak Mete : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं. त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम हा बीड तालुक्यात होता. या घटनेनंतर रोड हिप्नोसिस ही संकल्पना देखील पुन्हा चर्चेत आली आहे.

  • Published by:  Rahul Punde
चंद्रकांत फुंदे, पुणे पुणे, 15 ऑगस्ट : शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं काल  अपघाती निधन झालं. त्यामुळे रस्तेअपघाताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या अपघातामुळे रोड हिप्नोसिस ही संकल्पना देखील पुन्हा चर्चेत आली आहे. पण, मुळात ही संकल्पना नेमकी काय आहे हे बहुतांश चालकांना माहिती नाही. चला यानिमित्ताने रोड हिप्नोसिस नेमकं आहे समजून घेऊ. माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनामुळे एक्सप्रेस वे वरील वाढत्या अपघाताची कारण मिमांसा नव्याने चर्चेला आली आहे. मुंबई-पुणे या महामार्गावरील अपघातांमागे अनेकदा ड्रायवरची डुलकी, ओव्हर टेकिंग यासोबतच रोड हिप्नोसिस हेही एक कारण सांगितले जातं आहे. रोड हिप्नोसिस म्हणजे काय? रोड हिप्नोसिस म्हणजे रस्ते संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे ज्याची बहुतेक चालकांना माहिती नसते. रस्त्यावर नॉन स्टॉप वाहन चालवताना साधारण 2.5 तासांनी रोड हिप्नोसिस सुरू होते. ज्यात संमोहीत चालकाचे डोळे सताड उघडे असतात, पण मेंदू क्रियाशील राहत नाही आणि डोळे काय पाहतात त्याचे विश्लेषणही करत नाही, परिणाम तुमच्यासमोर चाललेल्या वाहनाला तुमची गाडी मागील बाजूस धडकून अपघात होतो. यात समजा तुमच्या वाहनाचे स्पीड 140 किमीच्या वर असेल तर रोड हिप्नोसिसचा धोका अधिक संभवतो तसंच या स्थितीत संबंधित चालकाला मागील 15 मिनिटाचे काहीच आठवतही नाही त्यामुळे नेमका कशामुळे झाला हे कळतही नाही, अशी माहिती क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट हिप्नोटिस्ट डॉ. समीर गुप्ते यांनी सांगितले आहे. रोड हिप्नोसिस टाळण्यासाठी चालकांनी नेमकी काय काळजी घ्यावी, याचीही माहिती जाणकारांनी दिली आहे. पण, रोड हिप्नोसिस बाबत वाहतूक नियमांमध्ये अद्याप तरी कोणताच उल्लेख आढळत नाही. खरंतर रस्त्यांवरचे अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी स्पीड लिमिट घालून दिलेली आहेत. पण, वाहन चालकाने किती तासानंतर ब्रेक घ्यायचा याबाबत वाहतूक सुरक्षा नियमात सरकारने अजून तरी तरतूद केलेली नाही. म्हणून या अपघाताच्या निमित्ताने वाहन चालकांनी किमान अडीच तासानंतर तरी ब्रेक घ्यावा आणि रिफ्रेश झाल्यानंतरच स्टेरिंगवर बसावे, जेणेकरून ते रोड हिप्नोसिसचा शिकार होणार नाहीत. Vinayak Mete Death : विनायक मेटेंच्या अपघाताचा ट्रक सापडला, ड्रायव्हरला अटक अपघातापूर्वी काय-काय घडलं? मेटे यांनी बीड शहरातल्या शिवसंग्राम भवनमध्ये शनिवारी सकाळी 11 वाजता तिरंगा रॅली संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. दुपारी एक वाजता त्यांच्या मूळ गावी राजेगावला गावाकडे जाऊन घरी भेट दिली. राजेगाव केजला आल्यानंतर केजमध्ये चार वाजता कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. केज होऊन अंबाजोगाईला गेल्यानंतर अंबाजोगाईमध्ये कार्यकर्त्यासोबत 6 वाजता रेस्ट हाऊसला बैठक घेतली. कालचे रात्रीचे जेवण नऊ वाजता अंबाजोगाईच्या रेस्ट हाऊस वर केले. त्यानंतर अकरा वाजता बीडला पोहोचले आणि त्यानंतर पुढे आजच्या होणाऱ्या मुंबईच्या मीटिंगसाठी निघाले. विनायक मेटे त्यांची आज अकरा वाजता बीड शहरामध्ये तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र, अचानक मुंबईमध्ये आज मराठा आरक्षणासाठी बैठक लावल्याने ते मुंबईला गेले. मेटे हे कार्यकर्त्यांना सांगून गेले की ते त्या रॅलीला उपस्थित राहू शकत नाहीत.
First published:

Tags: Vinayak mete

पुढील बातम्या