जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / Explainer: यंदा जून महिन्यातच अनेक ठिकाणी Red Alert; महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप?

Explainer: यंदा जून महिन्यातच अनेक ठिकाणी Red Alert; महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप?

Explainer: यंदा जून महिन्यातच अनेक ठिकाणी Red Alert; महाराष्ट्रात मॉन्सूननं का धारण केलंय भयंकर रूप?

जाणून घ्या पुढील तीन दिवस कसं असेल राज्यातील हवामान

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 जून : मॉन्सून (Monsoon in Maharashtra) येणार असा नुसता शब्द जरी कानावर पडला तरी डोळ्यासमोर येतात मेघगर्जना आणि त्यासह येणारा पाऊस. हा पाऊस संपूर्ण उन्हाळाभर असलेली उष्णता अगदी काही क्षणात घालवतो. बळीराजालाही सुखावून जातो. मात्र यंदाचा मॉन्सून असा अजिबात नाही. राज्यात मॉन्सून पाच जूनला दाखल झाला. अवघ्या ५ दिवसांत त्यांना संपूर्ण महाराष्ट्र गाठला. सध्या कोकण (Konkan), पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ (Vidarbha) बघता बघता सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. या आधी जून महिन्यात इतका पाऊस कधीच झाला नाही असं तज्ज्ञ सांगताहेत. काही जिल्ह्यांना तर रेड अलर्टही  देण्यात आला आहे. पण यंदाच्या मान्सूननं जून महिन्यातच भयंकर रूप का धारण केलंय? यावर तज्ज्ञांचं मत काय आहे हेच आपण जाणून घेणार आहोत. साधारणतः मॉन्सून महाराष्ट्रात 10 जूनच्या आसपास दाखल होतो. मात्र यावर्षी 5 दिवस आधीच मॉन्सूननं राज्यात धडक दिली. बरं हा इथवर थांबला नाही तर मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस सुरु झाला. पहिलाच दणका इतका जोरदार होता की अख्खी मुंबई (Rain in Mumbai) पहिल्याच पावसात जलमय झाली. सध्या पुणे शहर (Pune city) आणि पुण्याजवळील घाटांमध्ये अतिमुसळधार (Heavy rain in ghats) पाऊस सुरु आहे. पुढील काही दिवस पाऊस राहणार असा अंदाज ही व्यक्त करण्यात आला आहे. हे वाचा - Weather Alert: राज्यात पावसाचा जोर वाढला; कोल्हापूर-सांगलीला पुराचा धोका यंदा पाऊस इतका जास्त का? पुणे हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘यंदा मॉन्सून सरासरीएवढा किंवा सरासरीपेक्षा अधिक असू शकतो अशी माहिती त्यांनी पुढारीशी बोलताना दिली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तिथून वारे वाहू लागतात तर अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्यामुळेही वारे वाहतात. यामुळे मॉन्सून अधिक सक्रिय होतो. मात्र यंदा मॉन्सून नेहमीसारखा नाही, नेहमीपेक्षा यंदा अधिक पावसाचा अंदाज आहे असं होसाळीकर यांनी म्हंटलंय.

जाहिरात

अतिवृष्टीचा इशारा यंदाचा मॉन्सून नेहमीसारखा नाही. यावर्षी अतितीव्र पाऊस येण्याची शक्यता आहे. तसंच अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत जून महिन्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता.मात्र यावर्षी अति मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे अतिवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. संशोधन सुरु यंदा मॉन्सून इतक्या तीव्रतेनं का दाखल झाला. जून महिन्यातील पावसानं गेल्या काही वर्षातील सर्व रेकॉर्ड का मोडलेत यावर अभ्यास सुरु आहे असंही होसाळीकर यांनी बोलताना म्हंटलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात