जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / पावसाचे पाणी थेट पिता येते का? तुमच्याही मनात आहेत हे चुकीचे गैरसमज? आत्ताच दूर करा

पावसाचे पाणी थेट पिता येते का? तुमच्याही मनात आहेत हे चुकीचे गैरसमज? आत्ताच दूर करा

पावसाचे पाणी थेट पिता येते का? तुमच्याही मनात आहेत हे चुकीचे गैरसमज? आत्ताच दूर करा

संपूर्ण जगात शुद्ध पाण्याची (Pure Water) उपलब्धता ही एक मोठी समस्या आहे. आज लोक पावसाचे पाणी शुद्ध मानत नाहीत. परंतु, पृथ्वीवरील पाण्याचे सर्वात शुद्ध स्वरूप म्हणजे पावसाचे पाणी हे फार कमी लोकांना माहीत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 जुलै : पृथ्वीतलावर पाणी मुबलक प्रमाणात आहे. तरीही जगभरातील अनेक लोकांना स्वच्छ, पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी मिळत नाही. जगातील अनेक लोक आजही स्वच्छ आणि सुरक्षित पाण्यापासून वंचित आहेत. वास्तविक, शुद्ध पाणी मिळणे अवघड नाही. पाण्याचे अनेक स्त्रोत आहेत ज्यात महासागर, नदी, तलाव, भूगर्भातील पाणी, पावसाचे पाणी प्रमुख आहेत. मात्र, शुद्ध व स्वच्छ पाणी कोठून मिळणार हा वाद अनेकदा होत असतो. पावसाचे पाणी किती शुद्ध असते? ते पिण्यायोग्य आहे की नाही आणि त्याचा वायू प्रदूषणाशी काय संबंध आहे? याबद्दल अनेकांना माहिती नाही. पाण्याचे शुद्ध रूप पावसाच्या पाण्याबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. मात्र, सत्य हे आहे की ते पाण्याचे सर्वात शुद्ध स्वरूप आहे. एक काळ असा होता की पाण्याची कमतरता नव्हती. तलाव, विहिरी, नद्या सर्वत्र पाणी उपलब्ध होते. लहान नद्याही बारा महिने वाहत असत. मुलं पावसाच्या पाण्यात अंघोळ करायची आणि त्याच नदीचं पाणी प्यायची. पावसाचे पाणी स्वच्छ आहे की नाही याचा विचार देखील त्यांच्या डोक्यात येत नव्हता. बाटलीबंद पाण्याची सुरुवात आज आपण हळूहळू शुद्ध पाण्याच्या नावाखाली बाटलीबंद पाण्याला प्राधान्य देत आहे. पाऊस येताच आपण मुलांना पावसात जाऊ नका तर आत या असे सांगतो. पण बाटलीबंद पाण्याऐवजी पावसाचे पाणी प्या असे आज कोणाला सांगितलं तर? पण बाटलीबंद पाण्याचा उगम पावसाच्या पाण्यातून झाल्याचे दाखवणारे पुरावे आहेत. पावसाच्या पाण्याची शुद्धता नद्या आणि कालव्यांचे बहुतांश पाणी पावसाचे आहे. नळांमध्ये येणाऱ्या पाण्याचा मुख्य स्त्रोतही पाऊस आहे. नैसर्गिक जगातही चालू चक्राच्या शीर्षस्थानी पावसाचे पाणी आहे. पाणी बाष्पीभवनाच्या प्रक्रियेद्वारे ढगांपर्यंत पोहोचते. त्यानंतर ते पुन्हा पावसाच्या माध्यमातून जमीनीपर्यंत पोहोचेपर्यंत शुद्ध असते. Drinking Water : दात न घासता पाणी पिणं योग्य असतं का? आरोग्यावर कसा होतो परिणाम? पाणी कसे प्रदूषित होते? जगात पृथ्वीवर आलेला प्रत्येक थेंब हा पावसाच्या पाण्यातून आला आहे. जेव्हा पाणी जमिनीच्या आत जाते तेव्हा ते खनिज पाणी बनते. कारण जमिनीखालील खनिजे त्यात विरघळतात. तरीही हे पाणी तुलनेने सुरक्षित आणि स्वच्छ असते. पावसाचे पाणी जिकडे जाते, त्याच्याशी जुळवून घेते. तसेच कचऱ्यावर पडल्यास ते प्रदूषित होते. पावसाचे पाणी सर्वात शुद्ध कधी असते? हेही वास्तव आहे की पाणी जितके जास्त पसरेल, म्हणजेच जितकी जास्त जागा जाईल तितकी त्यात प्रदूषण होण्याची शक्यता जास्त आहे. अशा स्थितीत आपल्याला त्या पाण्याच्या शुद्धीकरणाची किंमत मोजावी लागते. अशा प्रकारे सर्वात शुद्ध पाणी पावसाचे आहे, पण जमीनीवर पडण्याआधी. हे नैसर्गिकरित्या सर्वात शुद्ध पाणी आहे. म्हणूनच प्रदूषित होण्याआधी आपण ते साठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण वायू प्रदूषणाचे काय? वायुप्रदूषणाचा परिणाम पावसावर होतो ही भीती पूर्णपणे चुकीची नाही. मात्र, प्रदूषणाचा पावसावर परिणाम होत असल्याचे वास्तव आहे. कारण वरून पाऊस प्रदूषित भागावर पडतो. तेव्हा अनेक प्रदूषके पाण्यात विरघळतात. पण, सतत पडणारा पाऊस प्रदूषणमुक्त होण्यास अर्धा तासही लागत नाही. म्हणजे पाऊस सुरू झाल्यानंतर काही वेळाने पाणी साठवू शकता. ते पूर्णपणे शुद्ध असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: rain fall
  • First Published :
जाहिरात
जाहिरात