मराठी बातम्या /बातम्या /explainer /प्राणी नाही तर वनस्पतींही देतात दूध आणि मांस; कधी खाल्लं आहे का Vegetarian Meat and Milk

प्राणी नाही तर वनस्पतींही देतात दूध आणि मांस; कधी खाल्लं आहे का Vegetarian Meat and Milk

आता वनस्पतीजन्य दूध आणि मांसाचा शाकाहारी पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांचा व्यवसाय (वनस्पतीपासून बनवलेलं मांस - Meat Milk Made From Plants) जगात झपाट्यानं वाढत आहे.

आता वनस्पतीजन्य दूध आणि मांसाचा शाकाहारी पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांचा व्यवसाय (वनस्पतीपासून बनवलेलं मांस - Meat Milk Made From Plants) जगात झपाट्यानं वाढत आहे.

आता वनस्पतीजन्य दूध आणि मांसाचा शाकाहारी पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांचा व्यवसाय (वनस्पतीपासून बनवलेलं मांस - Meat Milk Made From Plants) जगात झपाट्यानं वाढत आहे.

नवी दिल्ली, 03 ऑक्टोबर : वनस्पतींपासून बनलेलं मांस आणि दूध (Plant Based Meat And Milk)  तुम्हाला माहीत आहे का, आता मांस आणि दूध जनावरांशिवायच मिळवता येईल? हो, हे शक्य आहे. जगातील अनेक देशांमध्ये आधी मांसाहारी असलेले पण आता शाकाहारी पदार्थांपासून बनणारे अनेक खाद्यपदार्थ बनवले जातात.

याआधी आपल्याला वनस्पती तूपाचा पर्याय माहीत होता. आता वनस्पतीजन्य दूध आणि मांसाचा शाकाहारी पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांचा व्यवसाय (वनस्पतीपासून बनवलेलं मांस - Meat Milk Made From Plants) जगात झपाट्यानं वाढत आहे. बर्गर, हॉटडॉग आणि सॉसेजसारखे अनेक प्रकारचे फास्ट फूड्स अमेरिका आणि युरोपमधील अनेक रेस्टॉरंट्समध्ये आता पूर्णपणे शाकाहारी पदार्थांपासून बनवले जातात. दैनिक भास्कर वृत्तपत्रानं 'द इकॉनॉमिस्ट' (The Economist) चा हवाला देत याची माहिती दिलीय.

यापुढं हे पदार्थ गाय, म्हैस किंवा इतर कोणत्याही प्राण्यांच्या मांसापासून तयार न करता वनस्पतींपासून तयार केले जातील. उदाहरणार्थ, चिकनसारखं दिसणारं पांढरं मांस मटारपासून तयार केलं जातंय. विशेष म्हणजे, हे फक्त लॅबमध्ये तयार केलं जात नाही तर, फास्ट फूड कंपन्यांमध्ये तयार केलं जातंय.

कसं तयार होतं वनस्पतीजन्य दूध?

आतापर्यंत सोया आणि इतर वनस्पतींपासून बनवलेलं दूध फक्त शाकाहारी आणि दुधातील लॅक्टोज न पचणाऱ्या लोकांपुरतं मर्यादित होतं. पण आता हे दूध जगभरातील कॉफी शॉप आणि किराणा दुकानांतही उपलब्ध आहे. त्याची बाजारपेठ झपाट्यानं वाढतेय. आता डॅनोन (Danone) आणि छोबानी (Chobani) सारख्या कंपन्यांनी वनस्पतींवर आधारित दूध बनवण्यास सुरुवात केलीय. त्यांच्यामध्ये गाईच्या दुधापेक्षा जास्त फायबर असतात.

वनस्पती दुधाचा व्यवसाय

या अहवालानुसार जगातील वनस्पतींपासून बनवलेल्या दुधाचा व्यवसाय 1.48 लाख कोटी रुपयांवर गेला आहे. 2020 च्या वर्षाबद्दल बोलायचं तर केवळ अमेरिकेच्या दुग्ध बाजारात वनस्पतींपासून बनवलेल्या दुधाचा वाटा तब्बल 15 टक्के होता.

असं बनवलं जातं शाकाहारी मांस

बियाँड मीट (Beyond Meat) ही एथन ब्राऊनची (Ethan Brown) कंपनी 2009 मध्ये सुरू झाली. त्यांच्या शास्त्रज्ञांनी शाकाहारी मांस बनवण्यासाठी हेन्री फोर्डचं तंत्रज्ञान स्वीकारलं. प्राण्यांच्या मांसातील घटक पाहून त्यांनी ते घटक वनस्पतींमधून काढून घेतले आणि त्यांना एकत्र आणून वनस्पतीजन्य मांस तयार केलं. त्यांनी यासाठी प्रथम मटार आणि सोयाबीनमधून प्रथिनं काढली. नंतर ती बटाटा स्टार्च आणि नारळाचं तेल यासारख्या चरबीमध्ये मिसळली. यानंतर, त्यात मीठ आणि फ्लेवर घालून त्याची मांसासारखी चव बनवली.

हे वाचा - Health Insurance ठरेल कठीण काळातील मित्र, कोरोना पँडेमिकमध्ये आहे अधिकच महत्त्व; जाणून घ्या फायदे

शाकाहारी मांस व्यवसाय

शाकाहारी दुधाबरोबरच जगात मांसाहाराला शाकाहारी पर्याय देणाऱ्या कंपन्यांचा व्यवसायही झपाट्यानं वाढला आहे. 2009 पासून शाकाहारी मांसाचा व्यवसाय सुरू करणाऱ्या एथन ब्राऊनची कंपनी ‘बियॉन्ड मीट’वरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो. आता 80 पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांची उत्पादनं विकली जातात. त्यात पिझ्झा हट आणि मॅकडोनाल्डसारख्या फास्ट फूड चेनवर अधिक लक्ष केंद्रित केलं गेलंय. 10 वर्षांत म्हणजे 2019 मध्ये शेअर बाजारात आलेल्या या कंपनीचं मूल्य सुमारे 50 हजार कोटी रुपये होतं. या शाकाहारी मांसाच्या व्यवसायात बियॉन्ड मीटची स्पर्धा इम्पॉसिबल फूड्सशी (Impossible Foods) होतेय. या कंपनीनं अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये आपलं साम्राज्य पसरवलंय. आज अमेरिकेतल्या जवळजवळ प्रत्येक सुपरमार्केटमध्ये या दोन्ही कंपन्यांची उत्पादनं सापडतील.

बियॉन्ड मीटचं यश पाहून आता मांसाचे पदार्थ बनवणाऱ्या अनेक कंपन्यांनी शाकाहारी उत्पादनं सुरू केलीत. त्यापैकी कारगिल (Cargill), जेबीएस आणि टायसन फूड्स (Tyson Foods) प्रमुख कंपन्या आहेत.

हे वाचा - ‘आई, पप्पाकडे चलायचं’, पतीच्या निधनानंतर मायलेकीने संपवलं आयुष्य, डोळ्यात पाणी आणणारी सुसाईड नोट

1500 वर्षांचा इतिहास

अहवालात पुढं असे म्हटलंय की वनस्पतींच्या वस्तूंपासून मांस आणि दूध बनवणं ही नवीन किंवा विचित्र बाब नाही. मुळात जी प्रथिनं, कर्बोदकं आणि चरबी वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आढळतात, त्या मूलभूत घटकांना नवीन प्रकारे एकत्र आणण्याची प्रक्रिया जुनीच आहे. असं म्हटलं जातं की आशियातील बौद्ध धर्माचे लोक 1500 पेक्षा जास्त वर्षांपासून विविध वनस्पतीजन्य घटक मिसळून नकली मांस बनवतायत. सोयाबीनचं दूध अनेक शतकांपासून चीनमध्ये बनवलं जातंय. हेन्री फोर्डनं लिहिलं होतं की, गाय खात असलेल्या धान्यं आणि इतर घटकांना मिसळून नैसर्गिक दूध बनवणं शक्य आहे. आता त्याच्या कल्पनेची अंमलबजावणी होतेय असं म्हणता येईल.

First published:

Tags: Vegan, Vegetables