Home /News /explainer /

Nikola Tesla Death Anniversary: आज आपण वापरत असलेल्या अनेक गोष्टी Nikola Tesla ची देण, काय आहेत अविष्कार?

निकोला टेस्ला (Nikola Tesla) हा एक अतिशय हुशार शास्त्रज्ञ (Scientist) होता, ज्याने आपल्या आयुष्यात आरोग्यापासून आर्थिक स्थितीपर्यंत अनेक चढउतार पाहिले. ऐहिक जगाचा न्याय त्याला कधीच मिळू शकला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर जगाला त्यांचं महत्व समजलं.

पुढे वाचा ...
  जगातील महान शास्त्रज्ञांपैकी (Scientists) क्वचितच कोणाचं आयुष्य निकोला टेस्लासारखे (Nikola Tesla) चढ-उतारांनी भरलेलं असेल. इतकं महान शोधकार्य करुनही टेस्ला यांना आयुष्यात अखेरच्या दिवसात पैसा आणि आदर यापासून वंचितच राहावं लागलं. मृत्यूनंतर शेकडो वर्षांनी त्यांच्या अविष्कारांनी (Inventions of Tesla) लोकांना टेस्लाची आठवण करून दिली. जगभरात 7 जानेवारीला त्यांच्या पुण्यतिथीला लोकं त्यांना अभिवादन करतात. त्याचवेळी त्यांचं महत्व जाणलं असतं तर 1943 मध्ये त्यांच्या मृत्यूपूर्वी जगात अनेक क्रांतिकारी शोध लावले गेले असते, असे म्हणतात. (फोटो: विकिमीडिया कॉमन्स)

  1856 मध्ये जन्मलेल्या निकोला टेस्ला (Nikola Tesla) लहानपणापासूनच खूप हुशार होते. ते सर्व पुस्तके पूर्णपणे लक्षात ठेवू शकत होते, अगदी लॉगरिदम (Logrithm) तक्ताही त्यांच्या लक्षात होता. त्यांची निरीक्षणे (Observations) खूप चांगली असायची. ते भाषा सहज समजू शकत होते. ते खूप कमी वेळ झोप घ्यायचे. (फोटो: विकिमीडिया कॉमन्स)

  वयाच्या 19 व्या वर्षी, निकोला टेस्ला (Nikola Tesla) ऑस्ट्रियामध्ये त्यांच्या पॉलिटेक्निक अभ्यासात एक उत्कृष्ट विद्यार्थी होता. नंतर टेस्लाने याविषयी लिहले, की वीजेसंबंधी (Electricity) कोणताही प्रश्न त्याच्या जीवन आणि मरणाचा प्रश्न होत होता. याचं उत्तर मनात असायचं पण, ते व्यक्त करता येत नव्हते, असेही पुढे लिहले आहे. त्यांच्या मनावर विचारांचे वर्चस्व असायचे, यामुळे नियमित अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचं. हळुहळु त्याला जुगाराची चटक लागली, शिकवणीचे सगळे पैसे गमावले. शाळा सुटली आणि नर्व्हस ब्रेकडाऊनचाही शिकार झाला. (फोटो: शटरस्टॉक)

  यानंतर निकोला टेस्ला (Nikola Tesla) 1884 मध्ये बरे झाल्यानंतर न्यूयॉर्कला आले, त्यांच्या खिशात फक्त 60 सेंट होते. यानंतर टेस्ला एडिसनला भेटले, ज्यामध्ये टेस्लाने एडिसनला अल्टरनेटिंग करंट (Alternating Current, AC) वर आधारित कामाबद्दल सांगितले. त्याच वेळी, एडिसनच्या डायरेक्ट करंट (Direct current, DC) किंवा DC वर आधारित अनेक पॉवर प्लांट उभे राहिले होते. एडिसनला टेस्लाने डीसीवर काम करावे असे वाटत होते तर टेस्लाचा एसीवर जास्त विश्वास होता. हेच दोघांमधील वादाचे मूळ असल्याचे मानले जात आहे. टेस्लाने एडिसनची उपकरणे अपग्रेड केली. परंतु, एडिसनने त्याचे श्रेय त्याला दिले नाही. यामुळे नाराज होऊन टेस्लाने नोकरी सोडली आणि खोदकाम सुरू केले. (फोटो: विकिमीडिया कॉमन्स)

  निकोला टेस्ला (Nikola Tesla) यांच्या बुद्धिमत्तेचा (Intelligence) दृष्टिकोन त्यांच्या मालक थॉमस अल्वा एडिसनबद्दलच्या त्यांच्या विधानातून दिसून येतो. ते म्हणाले, की एडिसनला जर पेंढ्यामधून सुई काढायची असेल, तर ते एक-एक पेंढा काढून ती सुई सापडेपर्यंत शोधतील. टेस्ला याचं म्हणणं होतं, की थोडं थिअरी आणि मॅथ वापरलं तर तो 90 टक्के मेहनत वाचवू शकतो. (फोटो: विकिमीडिया कॉमन्स)

  निकोला टेस्लाच्या (Nikola Tesla) काळातील अनेक शास्त्रज्ञ (Scientists) जे प्रतिभामध्ये त्यांच्यापेक्षा कमी होते, त्यांच्याकडे असलेली व्यावसायिक बुद्धिमत्ता टेस्लामध्ये कधीही दिसली नाही. टेस्लाने जगातील दळणवळण आणि ऊर्जा प्रसारणाचे भविष्य बदलण्याचा नाट्यमय प्रयत्न केला. न्यूयॉर्कच्या मध्यभागी असलेल्या लाँग आयलंडवर एक भव्य टॉवर बांधण्यासाठी त्यांनी 15 लाख डॉलरची आर्थिक मदत देखील मिळवली होती. 1898 मध्ये टेस्लाची योजना वायरलेस ट्रान्समिशन सिस्टम उभारण्याची होती. यामुळे त्यांना सर्व संपत्ती आणि सन्मान मिळू शकला असता जो त्यांना मिळायला हवा होता. (फोटो: विकिमीडिया कॉमन्स)

  निकोला टेस्लाने (Nikola Tesla) एसी मोटर्स आणि पॉवर सिस्टमचे पेटंटही घेतले. यासाठी त्यांना जॉर्ज वेस्टिंगहाऊसचा पाठिंबा मिळाला, ज्यांना एडिसनचा डीसी करंट एसी करंटद्वारे हटवायचा होता. पण ही स्पर्धा टाळण्यासाठी वेस्टिंगहाऊसच्या कंपनीला खूप त्रास सहन करावा लागला. वेस्टिंगहाऊसच्या विनंतीवरून टेस्लाने रॉयल्टीचा करार फाडला ज्यामुळे तो अब्जाधीश होऊ शकला असता. टेस्ला त्याच्या विशेष कॉइलसाठी ओळखले जातात ज्यातून निऑन, फ्लोरोसेंट आणि एक्स-रे सारखे प्रकाश काढले जाऊ शकतात. या कॉइलमधून रेडिओ सिग्नल देखील पाठवले जाऊ शकतात. नंतर त्याला गुंतवणूकदारांकडून पाठिंबा मिळाला नाही आणि त्याचे पेटंट वापरून मार्कोनी यांनी रेडिओ कम्युनिकेशनचे पेटंट घेतले. (फोटो: pulsepowernow.com FAL द्वारे विकिमीडिया कॉमन्स)

  या घटनांनी निकोला टेस्ला ढासळले. त्यांना ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर (COD) असल्याचे निदान झाले. ते एका कबुतराच्या प्रेमातही पडला होते, ज्याबद्दल त्यांनी सांगितले की त्याला ते माणसासारखे आवडते. यानंतर देखील ते त्यांच्या काही प्रयत्नांमुळे अनेकवेळा प्रसिद्ध झाले. न्यूयॉर्कमधील हॉटेलमध्ये अनेक वर्षे राहिल्यानंतर 7 जानेवारी 1943 रोजी कर्जबाजारी होऊन त्यांचा मृत्यू झाला. मार्कोनीसोबतच्या कायदेशीर लढाईतील विजय त्यांच्या मृत्यूनंतरच मिळाला. (फोटो: जेफ्री बी. बांके / शटरस्टॉक)

  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Science, Tesla

  पुढील बातम्या