मराठी बातम्या /बातम्या /explainer /नेपोलियन बोनापार्टला ब्रिटीशांनी विष देऊन मारलं का? मृत्यूनंतर भारतात पाठवलेल्या पत्रातून वेगळाच खुलासा!

नेपोलियन बोनापार्टला ब्रिटीशांनी विष देऊन मारलं का? मृत्यूनंतर भारतात पाठवलेल्या पत्रातून वेगळाच खुलासा!

फ्रान्समधील सर्वात शक्तिशाली शासकांपैकी एक नेपोलियन बोनापार्ट (napoleon bonaparte) यांचा मृत्यू संशयास्पद मानला जातो. मात्र, एका पत्राने त्यांचा मृत्यू कर्करोगाने झाल्याचा दावा केला आहे.

फ्रान्समधील सर्वात शक्तिशाली शासकांपैकी एक नेपोलियन बोनापार्ट (napoleon bonaparte) यांचा मृत्यू संशयास्पद मानला जातो. मात्र, एका पत्राने त्यांचा मृत्यू कर्करोगाने झाल्याचा दावा केला आहे.

फ्रान्समधील सर्वात शक्तिशाली शासकांपैकी एक नेपोलियन बोनापार्ट (napoleon bonaparte) यांचा मृत्यू संशयास्पद मानला जातो. मात्र, एका पत्राने त्यांचा मृत्यू कर्करोगाने झाल्याचा दावा केला आहे.

मुंबई, 5 मे : नेपोलियन बोनापार्ट (napoleon bonaparte) हा फ्रान्सचा महान सम्राट होता. उंची लहान पण कीर्ती महान अशी ख्याती असलेल्या नेपोलियनने आपल्या शौर्याने जगाच्या मोठ्या भागावर राज्य केले. आजही नेपोलियनची उंची गाठणारे फार कमी लोक आहेत. नेपोलियनचे सैनिक त्याच्यावर प्रेम करत होते, त्यामुळे शत्रू त्याला घाबरत असत. ब्रिटनचा महान योद्धा, ड्यूक ऑफ वेलिंग्टन म्हणाला की नेपोलियन रणांगणावरील 40 हजार योद्धांच्या बरोबरीचा आहे. नेपोलियनच्या जीवनाचा सामान्य माणूस ते सम्राटाच्या सिंहासनापर्यंतचा प्रवास खूप रंजक होता. आजच्याच दिवशी 1821 मध्ये सेंट हेलेना बेटावर त्याचं निधन (napoleon bonaparte death) झालं.

नेपोलियन बोनापार्ट हा इतिहासातील जगातील महान सेनापतींपैकी एक मानला जातो. त्याने फ्रान्समध्ये एक नवीन कायदा संहिता आणली, ज्याला नेपोलियनची संहिता म्हणतात. नागरी विवाह आणि घटस्फोटाची प्रथा त्याच्या कायद्याच्या संहितेत मान्य करण्यात आली होती. त्यावेळची ही मोठी गोष्ट होती.

नेपोलियन फार श्रीमंत कुटुंबातील नव्हता, पण तो अभ्यासात खूप वेगवान होता, म्हणून त्याच्या पालकांनी त्याला वयाच्या अवघ्या नऊव्या वर्षी अभ्यासासाठी फ्रान्सला पाठवले. त्यांचे शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले आणि सप्टेंबर 1785 मध्ये त्यांनी बॅचलर पदवी प्राप्त केली. नंतर तो फ्रेंच सैन्यात सामील झाला, जिथे त्याला तोफखाना रेजिमेंटमध्ये सेकंड लेफ्टनंट पदावर बढती मिळाली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वयाच्या 24 व्या वर्षी नेपोलियनला ब्रिगेडियर जनरल बनवण्यात आले होते.

नेपोलियनने आपल्या पराक्रमाने आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक लढाया जिंकल्या होत्या. त्याने जनरल म्हणून फ्रान्समधील सर्वात शक्तिशाली सैन्य देखील तयार केले होते, परंतु नंतर अशी काही परिस्थिती उद्भवली की त्याला फ्रान्सच्या सम्राटाचे पद स्वीकारावे लागले. 1804 मध्ये, त्याने पोपच्या उपस्थितीत स्वतःला सम्राट घोषित केले.

संशयास्पद मृत्यू

1815 मध्ये वॉटरलूच्या लढाईत पराभव झाल्यानंतर, नेपोलियनला अटलांटिक महासागरातील एक दुर्गम बेट सेंट हेलेना येथे ब्रिटीशांनी कैदी केले, जेथे सहा वर्षांनंतर त्याचा मृत्यू झाला. काही इतिहासकारांच्या मते इंग्रजांनी त्याला आर्सेनिकचे विष देऊन मारले. वास्तविक आर्सेनिकला विषाचा राजा म्हटले जाते. त्यामुळे शरीरातील अनेक अवयव काम करणे बंद करतात आणि शेवटी व्यक्तीचा मृत्यू होतो.

तर नेपोलियन बोनापार्ट यांचे कर्करोगाने निधन झाला असल्याचाही पुरावा दिला जातो. 1821 मध्ये लिहिलेल्या पत्रातून याचा पुरावा मिळतो, जे अटलांटिक समुद्रात स्थित ब्रिटिश ओव्हरसीज बेट सेंट हेलेना येथून चेन्नई (तेव्हाचे मद्रास) येथे पाठवले गेले होते. चेन्नईतील तामिळनाडू सरकारच्या पुराभिलेखागार आणि ऐतिहासिक संशोधन विभागाच्या दस्तऐवजात असलेले हे पत्र, बोनापार्टचा निर्वासनानंतर मृत्यू झालेल्या ठिकाणाहून पाठवण्यात आला होता.

इंग्रजांना नेपोलियनची भीती वाटत होती

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीत काम करणारे इंग्रज इतके घाबरले की त्यांनी चेन्नईच्या सेंट जॉर्ज किल्ल्यावर नेपोलियन बोनापार्टसाठी वेगळा खंड ठेवला होता. येथे बोनापार्टशी संबंधित आंतरराष्ट्रीय घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. ब्रिटिशांनी त्यांना त्यांच्या वसाहतीसाठी सर्वात मोठा धोका मानला होता.

सेंट हेलेनाहून मद्रासला पाठवलेले पत्र

सेंट हेलेना सरकारच्या एच. लोवे यांनी स्वाक्षरी केलेल्या 10 मे 1821 रोजीच्या पत्रात असे नमूद केले आहे की नेपोलियन बोनापार्ट यांचे 5 मे रोजी संध्याकाळी सहा वाजून 10 मिनिटे आधी आजाराने निधन झाले. त्याच्या आजारपणात, नेपोलियनचे वैद्यकीय सहाय्यक प्राध्यापक एन्टोमार्ची यांच्या देखरेखीखाली होते.

First published:

Tags: France