
पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) गेल्या वर्षी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या. 5 जानेवारीला त्या 67 वर्षांच्या झाल्या आहेत. इथपर्यंत पोहचण्यासाठी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले आहेत. त्यांनी सार्वजनिक जीवनाकडे लक्ष केंद्रीत करुन एक खंबीर आणि मातीशी घट्ट नातं सांगणारी राजकारणी (Politician) म्हणून सिद्ध स्वतःला केलंय. प्रादेशिक नेत्या असूनही त्या नेहमीच राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होत्या. त्याच्याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या लोकांना फार कमी माहित आहेत. (फोटो: विकिमीडिया कॉमन्स)

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा जन्म 5 जानेवारी 1955 रोजी पश्चिम बंगालची (West Bengal राजधानी कलकत्ता (आता कोलकाता) येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. ममता यांनी वयाच्या 15 व्या वर्षी उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्याच वर्षी त्यांनी राजकारणातही (Politics) प्रवेश केला. त्यांचे वडील प्रोमिलेश्वर बॅनर्जी हे स्वातंत्र्यसैनिक होते. अशा स्थितीत ममता 17 वर्षांच्या असताना वैद्यकीय सुविधांअभावी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. (फाइल फोटो)

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बीए केल्यानंतर कोणत्या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली हे फार कमी लोकांना माहिती आहे. यामध्ये त्यांचा इस्लामिक इतिहास (Islamic History) हा विषय होता. पण त्यांना कायद्याचाही अभ्यास करायचा होता. त्यांनी जोगेशचंद्र चौधरी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षणही पूर्ण केलं आहे. शिक्षणादरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि विद्यार्थी परिषदेची स्थापना केली. त्यांनी दीर्घकाळ काँग्रेससाठी काम केले आणि संघटनेच्या प्रमुख पदांवरही पोहोचल्या. 1984 च्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सोमनाथ चॅटर्जी यांचा पराभव करून त्या खासदार झाल्या. (फोटो: विकिमीडिया कॉमन्स)

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे माहिती नाही. कारण, त्यांचे वैयक्तिक आयुष्य नगण्य आहे. त्यांनी लग्न केलं नाही. त्यांच्या कुटुंबात त्यांचे 6 भाऊ आणि त्यांची मुले यांचा उल्लेख आहे. त्यांचा पुतण्या अभिषेक हा त्यांचा राजकीय उत्तराधिकारी मानला जातो. त्या मुख्यतः निळ्या रंगाचा पट्टा (Saree of Mamata Banerjee) असलेल्या पांढऱ्या साडीत दिसतात. तर पायात चप्पल घातलेली दिसते. (फोटो: विकिमीडिया कॉमन्स)

साधी राहणीमान असले तरी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आपल्या आरोग्याबाबत (Health) खूप जागरूक आहेत. त्या दररोज ट्रेडमिलवर 5-6 किमी चालतात. विधानसभेच्या अधिवेशनानंतर त्या अनेकदा आपल्या सहकारी आणि पत्रकारांसोबत विधानसभेत फिरताना दिसतात. अनेक प्रसंगी त्या 10 किलोमीटरपर्यंत पायी जातानाही पाहायला मिळतात. तेलकट आणि मसालेदार पदार्थांपासून त्या दूर राहातात. त्यांना विशेषकरुन उकडलेला भात आणि चहा आवडतो. याशिवाय चॉकलेट आणि आलूर चॉप्सही आवडतात. प्रवासादरम्यान त्यांना पाण्याची कमतरता भासू नये याची विशेष काळजी घेतात. (फाइल फोटो)

साध्या राहणीच्या बाबतीत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचे घर. हे घर पाहून हे मुख्यमंत्र्यांचे घर (Home of Mamata Banerjee) आहे असं कोणालाही वाटणार नाही. कोलकाता येथील 30 बी हरीश चॅटर्जी स्ट्रीट येथे त्यांचे घर आहे. घराचे छत टेराकोटा टाइलचे आहे. मुसळधार पावसामुळे पूर आला तर घराबाहेर पाणी तुंबते. अशा परिस्थितीत त्यांना विटा ठेवून घरात जावे लागते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीही त्यांचे घर पाहून अचंबित झाले होते. दीदी त्यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री होत्या. (फोटो: News18.com)

वैयक्तिकरित्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना निसर्गाची खूप आवड आहे. त्यांना चित्रकलेसोबत गायन आणि लेखनाचीही आवड आहे. कोलकात्याच्या ट्रॅफिक लाइटमध्ये त्यांनी रवींद्र संगीताची सुरुवात केली होती. महान कवी काझी नजरुल इस्लाम यांची गाणी आणि कविताही त्यांना आवडतात. याशिवाय त्यांनी स्वतः अनेक कविता, निबंध आणि कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या चित्रांच्या विक्रीतून मिळालेला पैसा त्यांच्या पक्षालाच दिला जातो. (फोटो: विकिमीडिया कॉमन्स)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.