Home /News /explainer /

Airplane Retirement | विमानं निवृत्तीनंतर शेवटचं उड्डाण कुठं घेतात? पुढं त्याचं काय होतं?

Airplane Retirement Age, When Plane Retires : हवेत उडणाऱ्या विमानांचं वय काय असतं माहित आहे का? किती वर्षांच्या उड्डाणानंतर ते निवृत्त होतात? या विमानांच शेवटी काय होतं?

  प्रत्येक गोष्टीप्रमाणे विमानाचेही एक वय असते. त्यानंतर त्यांना निवृत्त केलं जातं. सामान्यतः विमानाच्या निवृत्तीचं वय 25 वर्षे असते. मात्र, चांगली देखभाल केली तर आणखी काही वर्ष चालतात. निवृत्तीनंतर विमानाचं शेवटचं उड्डाण स्टोरेज डेपोच्या दिशेने होते. ज्याला एअरप्लेन बोनयार्ड किंवा ग्रेवयार्ड असेही म्हणतात.

  निवृत्तीनंतर विमानाचं काय होतं? त्यांचं शेवटचे उड्डाण जगातील कोणत्या ठिकाणी होते? ज्याला विमानांचे ग्रेवयार्ड देखील म्हटले जाते. विमानांची साठवणूक करण्याचे डेपो जगभर असले, तरी विशेषत: एकाच देशात असे अनेक डेपो आहेत, जिथे एक-दोन नव्हे तर शेकडो निवृत्त विमानांना आसरा मिळतो. अनेकवेळा जेव्हा कंपन्या काही कारणास्तव त्यांचे फ्लाइट रद्द करतात किंवा काही एअरलाइन्स काम करणे थांबवतात तेव्हा ते त्यांची विमाने काही काळासाठी स्टोरेज डेपोमध्ये आणतात आणि पार्क करतात. याचं त्यांना भाडं द्यावं लागतं.

  बहुतेक स्टोरेज डेपो अमेरिकेच्या दक्षिणेकडील किंवा पश्चिम प्रांतात आहेत. इथं मोठमोठ्या मोकळ्या जागा आहेत. जिथं असे स्टोरेज डेपो करणे सोपे आहे. अमेरिकेत अनेक वाळवंटी भागात विमानांसाठी स्टोरेज डेपोही बनवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने निवृत्तीनंतर विमान इथं कायमची विश्रांती घेऊ लागतात.

  विमाने येथे पोहोचल्यावर सर्वात प्रथम त्यांची जलद धुलाई केली जाते, या धुलाईत अशी रसायने वापरली जातात जी गंज पकडू देत नाही. यानंतर त्याच्या इंधन टाकीमधून इंधन पूर्णपणे काढून टाकले जाते.

  मग त्याचे पार्ट, मशिन्स आणि अॅक्सेसरीज काढण्याचे काम सुरू होते. विमानातून एकूण 3.5 लाख पार्ट्स काढले जातात. या गोष्टी इतर विमानांचे भाग म्हणून वापरल्या जातात. विमान दुरुस्तीच्या बाजारपेठेत त्यांना मोठी मागणी आहे. मागे उरतो तो विमानाचा सांगाडा.

  त्यानंतर क्रेन आणि मशिन्सच्या साहाय्याने ही बॉडी डिस्मेंटल करण्याचे काम सुरू होते. विमानाचे संपूर्ण बॉडी, ग्रॅन्युल्स आदी गोष्टी वेगवेगळ्या करून क्रश करुन वितळवल्या जातात. जेणेकरून ते पुन्हा वापरता येतील. काही वेळा विमानांचा रिकामा सांगाडाही इच्छुक कंपन्या विकला जातो.

  उदाहरणार्थ, स्वीडनमधील एका कंपनीने अनेक रिकाम्या विमानांचे सांगाडे घेऊन त्यांचे 25 खोल्यांच्या हॉटेलमध्ये रूपांतर केलं आहे. तुर्कीमध्ये रेस्टॉरंट उघडले आहे. भारतातही दिल्लीहून हरियाणाला जाताना रिकाम्या विमानांचे सांगाडे उभे दिसतात. परंतु, सर्वात नेत्रदीपक काम मेक्सिकोमध्ये घडले आहे, जिथं 200 विमानांचे सांगाड्यांचे रुपांतर एका विशाल गिलेस्को लायब्ररीमध्ये केले गेले आहे.

  या लायब्ररीमध्ये खूप साऱ्या गोष्टी तयार करण्यात आल्या आहेत. बोईंग 727 आणि 737 च्या सांगाड्यातून साकारलेल्या या लायब्ररीमध्ये मीटिंग रूम, दोन ऑडिटोरियम आणि अनेक वेगवेगळ्या खोल्या आहेत, सर्व पुस्तकांना लायब्ररी लॉबीज जोडलेल्या आहेत. ते खूप सुंदर आणि वेगळे दिसते.

  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Airplane

  पुढील बातम्या