मुंबई, 13 डिसेंबर : भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सोबतच इतर मंत्र्यांची सुरक्षाही वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री पाटील यांना राज्य पोलिसांच्या सुरक्षेशिवाय सीआयएसएफ, केंद्रीय सुरक्षा दलाची सुरक्षाही देण्यात आली आहे. त्यात वाढ करण्याचाही विचार आहे. सुरक्षा यंत्रणा देखील अनेक कॅटेगरीमध्ये विभागली गेली आहे. जसे X, Y, Y Plus, Z, Z Plus आणि SPG सुरक्षा. याबद्दल आणखी खोलात जाऊया. X कॅटेगरी सुरक्षा : या कॅटेगरीमध्ये 2 सुरक्षा रक्षक तैनात असतात. ज्यामध्ये एक पीएसओ (पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर) असतो. Y कॅटेगरी सुरक्षा : एकूण 11 सुरक्षा कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत. ज्यामध्ये दोन PSO (खाजगी सुरक्षा रक्षक) देखील असतात. या रेंजमध्ये एकही कमांडो तैनात नसतो. Y Plus कॅटेगरी सुरक्षा : यात 11 सुरक्षा कर्मचारी आहेत. यामध्ये 1 किंवा 2 कमांडो आणि 2 पीएसओचाही समावेश आहे. Z कॅटेगरी सुरक्षा: झेड कॅटेगरी च्या सुरक्षेत चार ते पाच एनएसजी कमांडोसह एकूण 22 सुरक्षा रक्षक तैनात आहेत. यामध्ये दिल्ली पोलीस, आयटीबीपी किंवा सीआरपीएफचे कमांडो आणि स्थानिक पोलिसांचाही सहभाग आहे. वाचा - चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीनंतर आता तरुणाची भाजपच्या… Z Plus कॅटेगरी सुरक्षा: Z Plus ही भारतातील स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप सुरक्षेनंतरची सर्वोच्च सुरक्षा कॅटेगरी आहे. या कॅटेगरी त 36 जवान संबंधित विशेष व्यक्तीच्या सुरक्षेसाठी कार्यरत आहेत. यामध्ये दिल्ली पोलीस, ITBP किंवा CRPF कमांडो आणि राज्य पोलीस कर्मचार्यांसह 10 हून अधिक NSG कमांडोचा समावेश आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) सुरक्षा: ही सर्वोच्च सुरक्षा पातळी आहे. 1985 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर याची सुरुवात झाली होती. ही सुरक्षा पंतप्रधान किंवा माजी पंतप्रधानांना दिली जाते.
सुरक्षा कोणाला दिली जाते? देशातील आदरणीय लोक आणि राजकारणी यांच्या जीवाला धोका असेल तर त्यांना यापैकी एक सुरक्षा दिली जाते. ही सुरक्षा मंत्र्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेपेक्षा वेगळी आहे. यामध्ये आधी सरकारला यासाठी अर्ज द्यावा लागतो, त्यानंतर सरकारला गुप्तचर यंत्रणांमार्फत धोक्याचा अंदाज येतो. धोक्याची बाब निश्चित झाल्यावर सुरक्षा दिली जाते. गृहसचिव, महासंचालक आणि मुख्य सचिवांची समिती संबंधित लोकांना कोणत्या कॅटेगरी ची सुरक्षा द्यायची हे ठरवते. सुरक्षा कोण देते? पोलिसांसोबतच अनेक एजन्सी व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींना सुरक्षा कवच देत आहेत. यामध्ये स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच SPG, NSG, ITBP आणि CRPF यांचा समावेश आहे. विशेष लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी एनएसजीच्या खांद्यावर असली तरी झेड प्लस सुरक्षा घेणाऱ्यांची संख्या ज्याप्रकारे वाढली आहे, ते पाहता सीआयएसएफकडेही ही जबाबदारी सोपवली जात आहे.