तामिळनाडूमध्ये पोंगल सणादरम्यान बैल नियंत्रणाचा लोकप्रिय आणि पारंपारिक खेळ जल्लीकट्टू 16 जानेवारी ऐवजी 17 जानेवारीला खेळला जाणार आहे. 16 जानेवारीला रविवार येत असल्याने कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आदेशानुसार या दिवशी वीकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
तामिळनाडू सरकारने सोमवारी कोविड-19 च्या कठोर नियमांचे पालन करून जल्लीकट्टू आयोजित करण्यास परवानगी दिली. शासनाने काढलेल्या आदेशानुसार, बैलांचे मालक आणि त्यांचे सहाय्यक जे त्यांच्या जनावरांची खेळासाठी नोंदणी करतात आणि प्रशिक्षक यांना संपूर्ण लसीकरण प्रमाणपत्र तसेच RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल जास्तीत जास्त 48 तास आधी दाखवावा लागेल. यासोबतच त्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ओळखपत्रही देण्यात येणार आहे.
जल्लीकट्टू हा बैलांना नियंत्रित करण्याचा खेळ आहे. बंद जागेतून विशेष प्रशिक्षित बैल सोडले जातात, बाहेर लोकांची फौज खेळण्यासाठी सज्ज असते. बॅरिकेडच्या बाहेरही मोठ्या संख्येने प्रेक्षक त्याचा आनंद लुटण्यासाठी गर्दी करतात. बैल सोडताच तो धावत बाहेर येतो, ज्याला पकडण्यासाठी लोक तुटून पडतात. खेळातील खरं कौशल्य म्हणजे बैलाचे वशिंड (खांद्याचा वर आलेला भाग) पकडून त्याला थांबवणे आणि नंतर शिंगात कापडाने बांधलेले नाणे काढणे आहे.
बिघडलेल्या आणि रागावलेल्या बैलाला नियंत्रित करणे सोपे नाही. या प्रयत्नात बरेच लोक अपयशी होतात. यात अनके लोकं जखमी होतात. या खेळात जीवितहानी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पण या खेळाप्रती खेळाडू आणि प्रेक्षकांची उत्कंठाही पाहण्यालायक असते. या गेममध्ये विजेत्याला मोठ्ठ बक्षीस दिले जाते.
जल्लीकट्टू हा निव्वळ ग्रामीण खेळ असून तामिळनाडूच्या प्राचीन परंपरेशी संबंधित आहे. काही लोकं त्याचा इतिहास अडीच हजार वर्षे जुना सांगतात. खेळाची सुरुवात इ.स.पू 400-100, ज्याला तमिळ शास्त्रीय कालखंड म्हणतात. 'जल्ली' हा शब्द प्रत्यक्षात तमिळ शब्द 'सल्ली' वरून आला आहे ज्याचा अर्थ 'नाणे' आणि कट्टू म्हणजे 'बांधलेला'.
जल्लीकट्टूमध्ये सहभागी होणारे बैल हे विशेष जातीचे असतात. वर्षभर पौष्टीक आहार देऊन त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षण घेणाऱ्या बैलांची वैद्यकीय चाचणीही केली जाते, त्यानंतरच त्यांची जल्लीकट्टूसाठी नोंदणी केली होते. यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना नोंदणी आणि वैद्यकीय चाचणीही द्यावी लागणार लागते. कोविड-19 मुळे हे नियम थोडे अधिक कडक करण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षांत जल्लीकट्टूबाबत वाद निर्माण झाला आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. प्राणीप्रेमींच्या संघटनेच्या आवाहनावरून सर्वोच्च न्यायालयाने 2014 मध्ये यावर बंदी घातली होती. त्यात प्राण्यांची क्रूरता, शेकडो लोक जखमी आणि प्राणहानी यांचा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर सर्वसामान्यांपासून ते चित्रपट आणि राजकारणापर्यंतचे लोकही जल्लीकट्टू सुरू ठेवण्याच्या बाजूने एकवटले. तामिळनाडूने परंपरा आणि विश्वासाचा हवाला देत या निर्णयाविरोधात आंदोलन केले. अखेर एका अध्यादेशाद्वारे खेळाची परंपरा पुढे चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.