जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / Horsepower आणि घोड्याचा काय आहे संबंध? अजूनही का वापरतात हेच unit?

Horsepower आणि घोड्याचा काय आहे संबंध? अजूनही का वापरतात हेच unit?

Horsepower आणि घोड्याचा काय आहे संबंध? अजूनही का वापरतात हेच unit?

महामार्गाला Highway म्हणत असले तरी तो काही High म्हणजे उंच नसतो. मग Horsepower या शब्दाचा घोड्याशी काही संबंध असतो का? याचा शोध घेणारा हा रिपोर्ट.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 जानेवारी: जेव्हा नवी कार (Car) घेण्याचा विषय येतो, तेव्हा एका गोष्टीची हमखास चर्चा होते आणि ती गोष्ट म्ङणजे हॉर्सपॉवर (Horsepower). ऊर्जा मोजण्यासाठी (To count energy) वापरल्या जाणाऱ्या या युनीटचा आणि प्रत्यक्ष घोड्यांचा (Horse) एकमेकांशी काही संबंध आहे का, असा प्रश्न अनेकदा पडतो. याचं उत्तर म्हटलं तर आहे आणि म्हटलं तर नाही, असंच दिलं जातं.   घोडा आणि हॉर्सपॉवर हॉर्सपॉवर हे युनीट घोड्याच्या शक्तीचा विचार करूनच तयार केलं असलं, तरी त्यामागे केवळ शास्त्रीय कारण नसून मानसिक कारण असल्याचंही सांगितलं जातं. प्रत्यक्षात घोड्याच्या क्षमतेचा विचार केला, तर एक घोडा पूर्ण क्षमतेेने 15 हॉर्सपॉवरचं काम करत असतो. वास्तविक हॉर्सपॉवर ही संकल्पना मानवी ऊर्जेच्या निकषावर तयार करण्यात आली आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ जेम्स वॅट यांनी हॉर्सपॉवर ही संकल्पना जन्माला घातली.   जेम्स वॅट यांची संकल्पना वाफेचं इंजिन शोधण्यासाठी जगभर ओळखल्या जाणाऱ्या जेम्स वॅट यांनी हॉर्सपॉवर ही संकल्पना पहिल्यांदा मांडली. वाफेचं इंजिन किती क्षमतेनं काम करू शकतं, हे जगाला पटवून देण्यासाठी त्यांनी या युनीटचा शोध लावला. जेम्स वॅट यांच्या मते एक घोडा त्याच्या पूर्ण क्षमतेचा वापर करून एका मिनिटात 32,572 पाउंड वजन 1 फूट हलवू शकतो. या क्षमतेशी तुलना करून त्यांनी हॉर्सपॉवर हे युनीट मांडलं. त्यावेळी वॅट यांना घोड्याच्या क्षमतेच्या शास्त्रोक्त आकड्यांमध्ये फारसा रस नव्हता. मात्र घोडा हेच तत्कालीन समाजात वेग आणि शक्ती यांचं प्रतिक होतं. त्यामुळेच त्यांनी हॉर्सपॉवर हा शब्द वापरला. लोकांना समजायला सोपं जावं यासाठी त्यांनी वजनाचा आकडा सरसकट केला आणि 33 हजार पाउंड म्हणजेच साधारण 14,800 किलो वजन एका मिनिटात एक फूट हलवण्याच्या क्षमतेला हॉर्सपॉवर असं युनीट मिळालं.   झाले अनेक बदल त्यानंतर जसजशी विज्ञानाची प्रगती होत गेली, तसतसे या युनीटवर अभ्यास होत गेले. जेम्स वॅट यांनी संशोधनाचा सन्मान करण्यासाठी उर्जेच्या एककात वॅट हे नाव देण्यात आलं. 1 हॉर्सपॉवर म्हणजे नेमकी किती शक्ती, याचं एकक हळूहळू बदलत गेलं. मात्र ही संकल्पना मात्र तशीच राहिली. हे वाचा -

हायवे कुठं हाय असतो? त्या त्या काळात विशिष्ट शब्दांचे जे अर्थ असतात, त्यानुसार संकल्पना तयार होत असतात. आता हायवे कुठं हाय असतो, असा प्रश्न आपल्याला पडतो. मात्र ज्या काळात हायवे या शब्दाचा जन्म झाला, त्यावेळी High या शब्दाचा अर्थ Main असा होता. त्यामुळे हॉर्सपॉवरचा संबंध हा शास्त्रोक्तरित्या घोड्याशी नसला तरी संकल्पना म्हणून तो घोड्याशी संबंधित आहे. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात