कोविड-19 आणि मुले..! आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स

कोविड-19 आणि मुले..! आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स

लोकांना कोविड-19च्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर परिणाम होण्याची भीती वाटत आहे. भविष्यात या स्थितीचा सामना करण्यासाठी, डॉक्टर्स आणि शासकीय अधिकारी तिसऱ्या लाटेसाठीची सज्जता वाढवत आहेत.

  • Share this:

बालके आणि किशोरांसह कोणत्याही वयोगटातील कोणालाही कोविड-19 ची बाधा होऊ शकते. तरीही मुलांना कोविड-19 ची फारशी बाधा झालेली नाही आणि जरी झाली असेल तरीही त्यांना कोणतीही लक्षणे नव्हती किंवा सौम्य प्रकारची लक्षणे आढळली. भारतातील मुलांमधील कोविड-19 ची केवळ काहीच गंभीर उदाहरणे अशी होती की त्यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते, असे आढळले आहे.1

लोकांमध्ये कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर परिणाम होईल अशी भीती आहे. तरीही, या म्हणण्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.2 पहिल्या लाटेमध्ये वयस्क लोकांवर जास्त परिणाम झाला आणि दुसऱ्या लाटेमध्ये तरुण प्रौढांवर अधिक प्रभाव आढळला. म्हणून असे समजले जाते आहे की, तिसऱ्या लाटेमध्ये मुलांवर जास्त परिणाम होईल. लोकांना अशीही भीती वाटते आहे की, मुलांचे अद्याप लसीकरण झालेले नसल्याने, त्यांच्यावर जास्ती परिणाम होईल. भविष्यात या परिस्थितीचा सामना करण्यासाठी, डॉक्टर्स आणि शासकीय अधिकारी कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेसाठी जय्यत तयारी करत आहेत.

मुलांमधील कोविड-19ची लक्षणे

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या बालकांमधील कोविड-19 च्या व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बालकांमध्ये अगदी सुरुवातीला आढळणारी संक्रमणाची लक्षणे म्हणजे थंडी वाजणे, थोडासा खोकला, ताप, अंगदुखी, अशक्तपणा तसेच पोटात दुखणे, अतिसार, उलट्या, चव आणि गंधाच्या संवेदना न होणे ही होत. मुलांमधील कोविड-19 चे लवकरात लवकर निदान होऊन उपचार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 3

लक्षात घ्या की, मुलांना कोविड-19 चा संसर्ग झाला असल्यास मुलांची चाचणी करणे आवश्यक आहे. जर मूल घरातील एखाद्या कोविड-19 संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात असेल किंवा त्याला/तिला कोविड-19 ची लक्षणे दिसत असतील किंवा मुलाला 3 दिवसांपेक्षा अधिक काळापर्यंत ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन मुलाची चाचणी करा आणि घरातच विलगीकरण करा.

कोविड-19 संक्रमित मुलांची देखरेख

एखादे मूल संक्रमित असल्यास, त्याला/तिला त्वरित अन्य कुटुंबापासून वेगळे करून एखाद्या स्वतंत्र खोलीत विलग करणे आवश्यक आहे (शक्य असल्यास) आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा. कुटुंबाने कॉल्स आणि व्हिडीओ कॉल्सच्या माध्यमातून मुलाशी सतत संपर्क साधला पाहिजे आणि सकारात्मक बोलले पाहिजे.

जर आई आणि तिचे मूल/मुले असे दोघेही कोविड-19 संक्रमित असतील व आई त्यांची काळजी घेण्यासाठी अक्षम नसेल आणि रुग्णालयात दाखल झालेली नसेल तर मुले त्यांच्या आईसमवेत राहू शकतात. माता आपल्या तान्ह्या बाळांना शक्य तितके आणि जमेल तेवढे स्तनपान देऊ शकतात. जर आई कोविड-19 संक्रमित असून रुग्णालयात दाखल केले नसेल आणि अत्यंत अशक्त नसेल पण मूल संक्रमित नसेल आणि त्याच्या संगोपनाची अन्य कोणतीही सुविधा उपलब्ध नसेल तर आई तिच्या मुलांची देखभाल करू शकते. तरीही, असे करताना तिने स्वच्छतेच्या उपायांचे जास्तीत जास्त पालन केले पाहिजे व योग्यप्रकारे मास्कचा वापरही केला पाहिजे.

मुलांमधील मल्टीसिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (MIS-C) 4

आरोग्य सेवा संचालनालया(DGHS)च्या मुलांमधील कोविड-19 च्या व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोविड-19 होऊन गेल्यानंतर 2 ते 6 आठवड्यांनंतर मुलांमध्ये मल्टीसिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (MIS-C) आढळला आहे. मुलांमधील MIS-C ची सर्वसाधारण लक्षणे म्हणजे हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंडे, मेंदू, त्वचा, डोळे किंवा पचन संस्था यांसह विविध अवयवांची जळजळ होणे ही आहेत. त्यांच्यामध्ये ताप, पोटदुखी, उलट्या, अतिसार, पुरळ, डोळ्यांमध्ये रक्त गोठणे, भांबावून जाणे, धक्का बसणे, कन्जंक्टीव्हिटीज किंवा थकवा अशीही लक्षणे दिसू शकतात. MIS-C ची करणे अज्ञात आहेत. तरीही, MIS-C झालेल्या अनेक मुलांना पूर्वी कोविड-19 संक्रमण झालेले होते. मुलांमधील MIS-C च्या गंभीर गुंतागुंतीचा धोका टाळण्यासाठी लवकरात लवकर निदान, वैद्यकीय सेवा आणि उपचार अत्यंत आवश्यक आहेत.

 

भारत अन्य देशांमधील मुलांसाठीची कोविड-19 वरील लस

सद्यस्थितीत भारतात केवळ प्रौढांचे लसीकरण केले जात आहे. मुले(2 वर्षांवरील) व किशोरांसाठीची कोव्हॅक्सीन(Covaxin)(टप्पा II/III) ची प्रायोगिक चाचणी अद्याप चालू आहे5. काही देशांमध्ये 12 वर्षे व त्यावरील वयोगटातील मुलांचे लसीकरण आधीपासूनच सुरू झाले आहे. 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांमधील फायझर-बायोएनटेक(Pfizer-BioNTech) च्या यशस्वी प्रायोगिक चाचणीनंतर, ही लस 12 वर्षांवरील सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येत आहे.6

कोविड-19 विकारांचा प्रतिबंध

सध्या कोविड-19 पासून मुलांचा बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांनी शारीरिक अंतर राखणे, वयानुसार योग्य तो मास्क वापरणे, साबणाने हात धुणे किंवा अल्कोहोलपासून बनवलेल्या हँड रबचा वापर करणे, यासारखे कोविड-19 शी सुसंगत वर्तन केले पाहिजे. आरोग्य सेवा संचालनालया(DGHS) च्या मुलांमधील कोविड-19 च्या व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पाच वर्षांखालील मुलांनी मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. 6 ते 11 वयोगटातील मुलांनी त्यांच्या पालकांच्या देखारेखीमध्ये मास्क वापरावा आणि 12 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांनी मास्क वापरला पाहिजे.7

कोणत्याही रोगाशी लढण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी, भाज्या आणि फळांसह सकस आणि पौष्टिक आहार घेणे व पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांच्या आरोग्यासाठी केवळ स्तनपान हेच उत्तम पोषणमूल्य असते. 6 महिन्यांनंतर मुलांना स्तनपानाव्यतिरिक्त पूरक आहार देता येईल. मुलांचे नेहमीचे लसीकरण चालू राहिले पाहिजे.

मुलांच्या मानसिक आरोग्याचे महत्त्व

कोविड-19 च्या काळात आपल्या मुलांचे मानसिक आरोग्य सांभाळणेही पालकांसाठी महत्त्वाचे आहे. कोविड-19 मुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावर तर परिणाम होतोच पण त्यांच्या मानसिक आरोग्यावरही प्रभाव पडून ताण, चिडचिडेपणा, खिन्नता, चिंता, आणि अन्य लक्षणे दिसून येतात. पालक गरजेच्या वेळी त्यांना आधार देऊन त्यांच्यासमवेत काही वेळ व्यतीत करू शकतात. त्यांना त्यांच्या मित्रमैत्रिणींशी व्हर्च्युअल(आभासी ) माध्यमांद्वारे जोडून पालक त्यांना मदत करू शकतात आणि त्यांना बैठ्या उपक्रमांमध्ये गुंतवू शकतात.8

रेणुका बिर्गोडिया,

समन्वयक, कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट,

युनायटेड वे, मुंबई

संदर्भ

  1. https://www.mohfw.gov.in/pdf/ProtocolforManagementofCovid19inthePaediatricAgeGroup.pdf-
  2. https://thefederal.com/covid-19/no-basis-to-theory-that-third-wave-will-be-hard-on-teens-soumya-swaminathan/
  3. https://www.mohfw.gov.in/pdf/ProtocolforManagementofCovid19inthePaediatricAgeGroup.pdf-
  4. https://www.cdc.gov/mis-c/ आणि https://dghs.gov.in/WriteReadData/Orders/202106090336333932408DteGHSComprehensiveGuidelinesforManagementofCOVID-19inCHILDREN_9June2021.pdf
  5. https://covid19commission.org/commpub/preparing-for-covid-19-part-iii-planning-protocols-and-policy-guidelines-for-paediatrics
  6. https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/vaccines/recommendations/adolescents.html
  7. https://dghs.gov.in/WriteReadData/Orders/202106090336333932408DteGHSComprehensiveGuidelinesforManagementofCOVID-19inCHILDREN_9June2021.pdf
  8. https://nimhans.ac.in/wp-content/uploads/2021/03/Taking-care-of-mental-health-of-children-and-Elderly-During-covid-19.pdf

Published by: Manoj Khandekar
First published: June 30, 2021, 5:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या