मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Black Fungus : दूषित ऑक्सिजनमुळे तर ब्लॅक फंगस वाढलेला नाही ना? तज्ज्ञांनी व्यक्त केली शंका

Black Fungus : दूषित ऑक्सिजनमुळे तर ब्लॅक फंगस वाढलेला नाही ना? तज्ज्ञांनी व्यक्त केली शंका

काळी बुरशी (ब्लॅक फंगस – Black Fungus) किंवा म्युकरम्युकोसिसमुळे (Mucormycosis) महाराष्ट्रात 90 मृत्यू झालेत. आपल्याकडून दूषित ऑक्सिजनचा तर वापर होत नाही ना? असा प्रश्न आता अन्न व औषध फाउंडेशन आणि तज्ज्ञांनी उपस्थित केलाय.

काळी बुरशी (ब्लॅक फंगस – Black Fungus) किंवा म्युकरम्युकोसिसमुळे (Mucormycosis) महाराष्ट्रात 90 मृत्यू झालेत. आपल्याकडून दूषित ऑक्सिजनचा तर वापर होत नाही ना? असा प्रश्न आता अन्न व औषध फाउंडेशन आणि तज्ज्ञांनी उपस्थित केलाय.

काळी बुरशी (ब्लॅक फंगस – Black Fungus) किंवा म्युकरम्युकोसिसमुळे (Mucormycosis) महाराष्ट्रात 90 मृत्यू झालेत. आपल्याकडून दूषित ऑक्सिजनचा तर वापर होत नाही ना? असा प्रश्न आता अन्न व औषध फाउंडेशन आणि तज्ज्ञांनी उपस्थित केलाय.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 20 मे : भारताप्रमाणेच परदेशांमध्येही कोविड-19 ने (Coronavirus)  थैमान घातलं आहे. त्यावरील उपचारांदरम्यान मोठ्या प्रमाणात स्टिरॉइड्सचा वापर झालाय. मात्र, आपल्याच देशात काळ्या बुरशीची लागण होण्याचं इतकं प्रकार का होत आहे, असा प्रश्न बहुतेकांच्या मनात आहे. काळी बुरशी (ब्लॅक फंगस – Black Fungus) किंवा म्यूकोर्मिकोसिसमुळं महाराष्ट्रात 90 मृत्यू झालेत. आपल्याकडून दूषित ऑक्सिजनचा तर वापर होत नाही ना? असा प्रश्न आता अन्न व औषध फाउंडेशन आणि तज्ज्ञांनी उपस्थित केलाय. डिस्टिल्ड वॉटरऐवजी नळाचे पाणी तर वापरले जात नाही? कारण, यामुळं काळ्या बुरशीचे प्रमाणही वाढते असं दिसून आलंय.

ब्लॅक फंगसमुळं 63 वर्षांच्या किशोर पंजाबी यांना त्यांचा उजवा डोळा गमवावा लागला. त्यांना मधुमेह असून त्या कोविडमधून बऱ्या झाल्यानंतर 10 दिवसांनी त्यांना घातक म्युकरमायकोसिस (Mucormycosis) झाल्याचे निदान झालं. दोन महिन्यांनंतर अखेर त्यांना एक डोळा गमवावा लागला आणि त्या यातून कशाबशा बऱ्या झाल्या.

पंजाबी यांच्या त्या डोळ्याची दृष्टी गेली होती. डोळ्यात बुरशीचा संसर्ग झाला असल्याचं एमआरआयमधून स्पष्ट झालं. त्यामुळं आम्ही त्यांचा डोळा काढून टाकण्याचे आणि त्या बाजूच्या सायनसचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला, असं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या इएनटी सर्जन डॉ. प्रशांत केवले यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात म्यूकोरामायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगसमुळे 90 जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर, आणखी 1500 पेक्षा जास्त रुग्ण राज्यात आहेत. ब्लॅक फंगसमुळं रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळं ऑल इंडिया फूड अ‌ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनने हा प्रश्न उपस्थित केला आहे की, अचानक झालेल्या बुरशीच्या प्रसारामागे दूषित ऑक्सिजन किंवा त्यात वापरल्या जाणार्‍या पाण्याचे कारण आहे का? त्यांनी अन्न व औषध प्रशासनाला लिहिलेल्या पत्रात, ऑक्सिजन कमतरता असताना ऑक्सिजन उत्पादकांनी उद्योगांसाठी वैद्यकीय ऑक्सिजन तयार केला, तेव्हा याच्याशी संबंधित नियमांची अंमलबजावणी केली गेली किंवा नाही, अशी शंका व्यक्त केलीय. याबाबत चौकशी झाली की नाही? एवढेच नाही तर, घरात दिला जाणारा ऑक्सिजनदेखील डिस्टिल्ड वॉटरमधून दिला जातो की नाही, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

हे वाचा - कोरोनाचा विळखा आणखी सैल; राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण, रिकव्हरी रेटही नव्वदी पार

पाश्चात्य देशांमध्ये जिथं कोविडचं प्रमाण जास्त होतं, तिथंही इतक्या प्रमाणात ब्लॅक फंगसचा प्रादुर्भाव झाला नव्हता. आपल्या देशात असं घडण्यामागे बरीच कारणं आहेत. पुरेशा ऑक्सिजनच्या उपलब्धतेअभावी आपण भारतात औद्योगिक ऑक्सिजनदेखील वापरत आहोत. यामध्ये होत असलेलं शुध्दीकरण कदाचित पुरेसं नाही. आम्ही बाटलीतील पाण्याद्वारे येथे ह्युमिडिफाईड ऑक्सिजन देतो. काही ठिकाणी यासाठी डिस्टिल्ड वॉटर वापरण्याऐवजी नळाचं पाणी वापरलं जात असण्याची शक्यता आहे किंवा बाटल्यांचं निर्जंतुकीकरण योग्य प्रकारे होत नसण्याचीही शक्यता आहे, असं प्रख्यात गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट (Gastroenterologist) आणि जेन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. रॉय पाटणकर यांनी सांगितलं.

हे वाचा - Corona दिलासा : मुंबई-पुण्यात कोरोनाचा उतरता आलेख कायम मुंबईत 1500 तर पुण्यात 1000 पेक्षा कमी रुग्णसंख्या, मृत्यूचं प्रमाणही घटलं

भारत आणि महाराष्ट्रात ज्या कोरोना स्ट्रेनचा प्रादुर्भाव झालाय, तोही ब्लॅक फंगसला कारणीभूत असू शकतो. मात्र, ऑक्सिजन आणि डिस्टिल्ड वॉटरचा वापर न होणं हीदेखील कारणं आहेतच. ही बुरशी हवा, ओलसर ठिकाणी, माती, ओलसर खोल्यांमध्ये आढळते. निरोगी लोकांना विशेष काळजी करण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, त्यांना काळ्या बुरशीचा धोका अधिक आहे, असं ENT सर्जन प्रशांत केवले म्हणाले.

First published:

Tags: Corona updates, Corona vaccination, Corona virus in india, Coronavirus