मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer: इस्रायलमध्ये झपाट्याने बंद केले जात आहेत कोरोनाचे वॉर्ड! काय असेल कारण?

Explainer: इस्रायलमध्ये झपाट्याने बंद केले जात आहेत कोरोनाचे वॉर्ड! काय असेल कारण?

इकडे आपण दुसऱ्या आणि संभाव्य तिसऱ्या कोरोनाच्या लाटेशी दोन हात करीत आहोत, पण इस्रायल याला अपवाद आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्या तिथे एकदम झपाट्याने कमी झाली आहे. लॉकडाउनमुळे नव्हे तर...

इकडे आपण दुसऱ्या आणि संभाव्य तिसऱ्या कोरोनाच्या लाटेशी दोन हात करीत आहोत, पण इस्रायल याला अपवाद आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्या तिथे एकदम झपाट्याने कमी झाली आहे. लॉकडाउनमुळे नव्हे तर...

इकडे आपण दुसऱ्या आणि संभाव्य तिसऱ्या कोरोनाच्या लाटेशी दोन हात करीत आहोत, पण इस्रायल याला अपवाद आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्या तिथे एकदम झपाट्याने कमी झाली आहे. लॉकडाउनमुळे नव्हे तर...

जेरुसलेम, 3 एप्रिल : भारतासह जगभरातल्या अनेक देशांमध्ये सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग (Coronavirus) झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणी दुसरी, तर काही ठिकाणी तिसरी लाट (Second Wave) आल्याचं चित्र दिसत आहे. इस्रायल (Israel) मात्र याला अपवाद आहे. तिकडे नव्या कोरोनाबाधितांची संख्या एकदम कमी आहे. त्यामुळे 2020मध्ये तिथल्या हॉस्पिटल्समध्ये तयार करण्यात आलेले कोरोना वॉर्ड (Corona Wards) आता झपाट्याने बंद केले जाऊ लागले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अवलंबलेल्या वैज्ञानिक मार्गांमुळे इस्रायल या देशाने आपला आदर्श जगापुढे ठेवला आहे. जेरुसलेम (Jerusalem) शहराच्या पूर्व भागात हदसा हॉस्पिटल आहे. अत्याधुनिक सेवांची उपलब्धता असलेलं हे हॉस्पिटल इस्रायलमधल्या सर्वोत्तम हॉस्पिटल्समध्ये गणलं जातं. गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाचा कहर होता, तेव्हा हेच हॉस्पिटल सर्वांत व्यग्र होतं. जेरुसलेम पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, त्या वेळी या हॉस्पिटलमध्ये दररोज सुमारे 140 कोरोनाबाधित दाखल होत होते. गेल्या आठवड्यात तिथे केवळ तीन नवे कोरोनाबाधित दाखल झाले. त्या कोरोनाबाधितांची लक्षणंही सौम्य होती, त्यामुळे त्यांना लवकर बरं करता आलं. इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, बुधवारी (31 मार्च) देशभरात 38 हजार कोरोना चाचण्या झाल्या. त्यात 489 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा हा दर केवळ 1.3 टक्के आहे. इस्रायलमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 6201 जणांचे प्राण गेले. इस्रायलचे शेजारी देश, तसंच पाश्चिमात्य आणि आशियाई देशांतल्या परिस्थितीशी तुलना केली, तर इस्रायलचा मृत्युदर कमीच आहे. इस्रायलमध्ये हे कशामुळे साध्य होऊ शकलं. मास्क परिधान (Mask) करणं किंवा लॉकडाउन (Lockdown) हे नव्हे, तर अत्यंत वेगाने करण्यात आलेलं लसीकरण हे या यशाचं कारण असल्याचं मानलं जात आहे. इस्रायलच्या 50 टक्के नागरिकांना आतापर्यंत कोरोनाप्रतिबंधक लशीचे प्रत्येकी दोन डोस मिळाले आहेत. तसंच, 60 टक्के नागरिकांना लशीचा पहिला डोस (Vaccination) मिळाला आहे. लोकसंख्येचा विचार केला, तर इतक्या वेगाने लसीकरण झालेला इस्रायल हा जगातला पहिला देश आहे. मे महिन्याच्या अखेरीपर्यंत संपूर्ण इस्रायलमध्ये लसीकरण पूर्ण होईल, असा अंदाज आहे. लसीकरणामुळेच तिथल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली. म्हणूनच त्या देशात आता कोरोनासाठी उभारण्यात आलेले वॉर्ड बंद करण्यात येत आहेत, जेणेकरून तिथल्या सुविधा आणि साधनसामग्री अन्य ठिकाणी वापरता येऊ शकेल. कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाच्या वेगाचा विचार केला, तर अमेरिका (USA) आघाडीवर आहे. तिथे आतापर्यंत 15 कोटींहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. चीन (China) दुसऱ्या क्रमांकावर असून, तिथे 11 कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे. भारत (India) तिसऱ्या क्रमांकावर असून, साडेसहा कोटींहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे. इस्रायलच्या उदाहरणावरून असं म्हटलं जात आहे, की भारतातली सद्यस्थिती सुधारण्यासाठी लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्याची गरज आहे. म्हणूनच एक एप्रिलपासून 45 वर्षांवरच्या सर्व नागरिकांना लस घेण्याची मुभा देण्यात आली आहे. भारतात डबल म्युटेशनही आढळलं असून, तो चिंतेचा विषय आहे. कारण विषाणूचं ते रूप वेगाने फैलावतं. खासकरून महाराष्ट्रात त्याचं प्रमाण जास्त आहे. डबल म्युटेशन (Double Mutation) प्रतिकारयंत्रणेसाठीही हानिकारक आहे. त्यामुळेच लसीकरण अनलॉक करण्याची अर्थात, सर्व वयोगटातल्या नागरिकांसाठी ते खुलं करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिक कमी वेळात सुरक्षित होऊ शकतील.
First published:

Tags: Coronavirus, Israel

पुढील बातम्या