Home /News /explainer /

पुन्हा Lockdown होणार का? सध्याची परिस्थिती काय सांगते?

पुन्हा Lockdown होणार का? सध्याची परिस्थिती काय सांगते?

एका कोरोनामुळे देश लॉकडाऊनमध्ये.

एका कोरोनामुळे देश लॉकडाऊनमध्ये.

हॉस्पिटलमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच राहिली, तर हिवाळी हंगामात काही किरकोळ निर्बंध पुन्हा लागू केले जाऊ शकतात; मात्र...

लंडन, 13 सप्टेंबर : इंग्लंडमध्ये (UK coronavirus) कोविड-19च्या (Covid-19) संसर्गाला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेले जवळपास सर्व कायदेशीर निर्बंध (Lockdown in UK) 19 जुलै 2021 रोजी हटवण्यात आले होते. तिथल्या राष्ट्रीय आरोग्य सेवेने केलेल्या ट्रॅक अँड ट्रेसच्या (Track & Trace) शिफारशीनुसार, संसर्गग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती आणि लशीचे दोन्ही डोस न घेतलेल्या व्यक्ती यांना असलेली विलगीकरणाची अट कायम ठेवण्यात आली; मात्र नाइट क्लब बंद ठेवणं, घरातल्या कार्यक्रमांना किती व्यक्तींनी जमणं यावर निर्बंध आदी उपाय मात्र रद्द करण्यात आले. सर्व काही पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने टाकलेली पावलं थांबवली जाणार नाहीत, असं राजकीय नेत्यांनी सांगितलं होतं. 2020 सालच्या उन्हाळ्यात निर्बंधांमधून (Restrictions) सवलत दिल्यानंतर हिवाळ्यात म्हणजेच नोव्हेंबर 2020 आणि जानेवारी 2021मध्ये पुन्हा देशव्यापी लॉकडाउन तिथे लागू करण्यात आला होता. आता 2021च्या हिवाळ्यातही तिथे हाच फॉर्म्युला अवलंबला जाणार आहे का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून ठरावीक लोकसंख्येतून प्रातिनिधिक नमुने गोळा करून कोणत्याही एका ठरावीक वेळी कोरोना विषाणूचा (Corona Infections) संसर्ग किती व्यक्तींना झाला आहे याचा अंदाज वर्तवला जातो. निर्बंध हटवल्यानंतर या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात खालच्या पातळीवर असलेला संसर्ग वाढून जुलैमध्ये 1.57 टक्क्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. ऑगस्टमध्ये संसर्गाचा दर कमी होऊन 1.28 टक्के झाला आणि नंतर स्थिर झाला.

भारतीयांसाठी खूशखबर! COVAXIN ला या आठवड्यात WHO कडून मंजुरी मिळण्याची शक्यता

 सामाजिक संपर्क हळूहळू वाढू लागला, की संसर्गाचा दर आधीच असलेल्या उच्च पातळीवरून पुन्हा वाढू शकतो. शाळा पुन्हा सुरू झाल्या, की तिथे मुलं येऊ लागतील, तसंच पालक त्यांच्या त्यांच्या कार्यालयांमध्ये जातील. त्यामुळे सामाजिक संपर्क वाढू लागण्याचा धोका आहे.
कोरोना संसर्गाच्या जागतिक साथीवेळी (Corona Pandemic) निर्बंध लागू करण्याची गरज होती. कारण कोविड-19चा संसर्ग झाल्यामुळे मोठ्या संख्येने रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागत होतं. आता मात्र लसीकरण मोहिमेने वेग पकडला असून, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांचं प्रमाण घटलं आहे. नोव्हेंबर 2020मध्ये इंग्लंडमध्ये जेव्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती, तेव्हा 31 ऑक्टोबर 2020 रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोविड रुग्णांची संख्या 10 हजारांहूनही कमी होती. या वर्षीच्या मे-जूनमध्ये तिथे एक हजार रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होते. सध्या ही संख्या सहा हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे या परिस्थितीवरून सध्याची स्थिती लॉकडाउन लागू करण्याची 60 टक्के शक्यता असल्यासारखी वाटत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही अंशी या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आल्यामुळे लॉकडाउन लागू करावा लागला होता. 2020 मधल्या उन्हाळ्यात लागू केलेला लॉकडाउन आणि 2021च्या उन्हाळ्याच्या अखेरीला केलेला लॉकडाउन (Lockdown) यांमध्ये फरक हा आहे, की लसीकरण कार्यक्रम खूप यशस्वी ठरला आहे. इंग्लंडमध्ये 16 वर्षांवरच्या वयाच्या 89 टक्के नागरिकांना लशीचा पहिला डोस, तर 80 टक्के नागरिकांना लशीचा दुसरा डोस मिळालेला आहे; पण लशीमुळे किती काळ सुरक्षितता मिळते, या प्रश्नाचं नेमकं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. बूस्टर डोस देण्याबद्दल तितल्या सरकारने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. Corona ची तिसरी लाट येण्याची शक्यता कमीच', पण शाळा उघडण्याबाबत तज्ज्ञांचा इशारा आगामी हिवाळी हंगामात कोविड-19 आणि अन्य संसर्गजन्य रोगांच्या संसर्गात निश्चितपणे वाढ होईल. तसंच, हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोविडबाधितांची संख्याही पूर्वीच्या तुलनेत अधिक आहे; मात्र लसीकरण मोठ्या प्रमाणावर झालेलं असल्यामुळे आधीचा अंदाज बदलला आहे. पूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ज्या झपाट्याने वाढ होत होती, त्या वेगाने आता होण्याची शक्यता नाही. हॉस्पिटलमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच राहिली, तर हिवाळी हंगामात काही किरकोळ निर्बंध पुन्हा लागू केले जाऊ शकतात; मात्र देशव्यापी लॉकडाउन पुन्हा लागू होण्याची शक्यता नाही.
First published:

Tags: Coronavirus, Covid19, United kingdom, Winter

पुढील बातम्या