Home /News /explainer /

1 एप्रिलपासून 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचं कोरोना लसीकरण; 10 पॉईंट्समध्ये समजून घ्या प्रक्रिया

1 एप्रिलपासून 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचं कोरोना लसीकरण; 10 पॉईंट्समध्ये समजून घ्या प्रक्रिया

लसीकरणाच्या सध्या सुरू असलेल्या टप्प्यात 60 वर्षांवरील सर्व व्यक्ती आणि 45 वर्षांवरील को-मॉर्बिड (Co-Morbid) अर्थात अन्य विकार असलेल्या व्यक्तींना लस दिली जात आहे. आता 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वच व्यक्तींना लस घेता येणार आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 25 मार्च : देशात सध्या एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तर दुसरीकडे लसीकरणाचा वेगही सरकारने वाढवला आहे. येत्या एक एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोनाप्रतिबंधक लस (Anti Covid-19 Vaccine) दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली. लसीकरणाच्या सध्या सुरू असलेल्या टप्प्यात 60 वर्षांवरील सर्व व्यक्ती आणि 45 वर्षांवरील को-मॉर्बिड (Co-Morbid) अर्थात अन्य विकार असलेल्या व्यक्तींना लस दिली जात आहे. आता 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वच व्यक्तींना लस घेता येणार आहे. - को-विन 2.0 पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसं करायचं? लसीकरणाला पात्र असलेल्या व्यक्ती आपल्या मोबाइल नंबरच्या माध्यमातून को-विन 2.0 (Co-Win 2.0) या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकतात. या प्रक्रियेतले टप्पे - को-विन अ‍ॅप्लिकेशनचा वापर करा किंवा या www.cowin.gov.in या वेबसाइटवर लॉगिन करा. तुमचा मोबाइल नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला अकाउंट तयार करण्यासाठी ओटीपी (OTP) अर्थात वन टाइम पासवर्ड मिळेल. ओटीपी टाकून 'Verify' बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही लसीकरणाच्या नोंदणीशी संबंधित पेजवर रिडायरेक्ट व्हाल. तिथे तुम्हाला फोटो आयडी प्रूफची निवड करावी लागेल. तुमचं नाव, वय, लिंग आदी माहिती भरून जे फोटो आयडी प्रूफ निवडलं आहे, ते अपलोड करावं. नोंदणीसाठीची माहिती भरल्यानंतर 'Register' बटणावर क्लिक करावं. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सिस्टममध्ये 'Account Details' दिसतील. 'Add More' बटणावर क्लिक करून त्या मोबाइल नंबरशी संबंधित असलेल्या आणखी तीन व्यक्तींना जोडलं जाऊ शकतं. अपॉइंटमेंटची माहिती देणारं एक बटण दिसेल. आपलं राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि पिन कोड ही माहिती टाकून आपल्या पसंतीचं लसीकरण केंद्र शोधावं. तिथे तुम्हाला दिनांक आणि उपलब्धतेची माहिती मिळेल. 'Book' बटणावर क्लिक करा. अपॉइंटमेंट बुक झाल्यानंतर त्या अपॉइंटमेंटच्या एक दिवस आधी तुम्ही रिशेड्यूलही करू शकता.

(वाचा - हँड सॅनिटायजर पसरवतोय कॅन्सर; आढळले धोकादायक केमिकल्स, अभ्यासातून मोठा खुलासा)

प्रश्न : रजिस्ट्रेशन (Registration) कधीपासून सुरू होईल? उत्तर : केंद्र सरकारने राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून सांगितलं, की 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लसीकरणात तत्काळ समाविष्ट करून घेण्याच्या दृष्टीने व्यवस्था करावी. को-विन पोर्टलवर या व्यक्तींचं रजिस्ट्रेशन 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. प्रश्न : त्यासाठी कोणत्या प्रमाणपत्राची गरज आहे का? उत्तर : केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 1977 नंतर जन्मलेल्या व्यक्ती 1 एप्रिलपासून नोंदणी करू शकतात. त्यांच्या नोंदणीसाठी आवश्यक ते बदल को-विन पोर्टलवर केले जात आहेत. 45 ते 59 वर्षांच्या या व्यक्तींच्या नोंदणीवेळी त्यांना अन्य कोणता रोग असल्याचं प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही. प्रश्न : कोणती सरकारी ओळखपत्रं (ID Proof) दाखवता येतील? उत्तर : लसीकरण केंद्रावर लस घेण्यापूर्वी आपली ओळख पटवण्याकरता सरकारी ओळखपत्र दाखवण्याची गरज आहे. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स, पॅन कार्ड, हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, पेन्शन डॉक्युमेंट, बँक किंवा पोस्टाचं पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, एमपी/एमएलए/एमएलसी कार्ड, सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवा ओळखपत्र, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरअंतर्गत देण्यात आलेलं स्मार्ट कार्ड यांपैकी कोणतंही ओळखपत्र चालू शकतं.

(वाचा - सावधान! उलटी, पोटदुखी, बेचैनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आली समोर)

प्रश्न : कुटुंबातल्या सदस्यांची नोंदणी कशी करता येईल? उत्तर : प्रत्येक डोससाठी कोणत्याही वेळी लाभार्थीसाठी केवळ एकच लाइव्ह अपॉइंटमेंट असेल. अ‍ॅपवरून अपॉइंटमेंट घेता येऊ शकेल. तिथे तुम्ही तुमच्या सोयीची तारीख आणि ठिकाण निवडू शकता. उदा. तुम्ही 2 एप्रिलची अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि उपलब्धतेनुसार एक स्लॉट आरक्षित केला जाईल. त्याशिवाय पुढेही उपलब्ध स्लॉटसाठी कोणत्याही तारखेची अपॉइंटमेंट बुक करता येऊ शकते. प्रश्न : दुसऱ्या डोससाठी अपॉइंटमेंट कशी घ्यायची? उत्तर : पहिल्या डोसच्या अपॉइंटमेंटच्या तारखेनंतर 29व्या दिवशी त्याच कोविड लसीकरण केंद्रात दुसऱ्या डोससाठी एक स्लॉट बुक होईल. एखाद्या व्यक्तीने पहिल्या डोसची अपॉइंटमेंट रद्द केली, तर त्या व्यक्तीच्या दोन्ही अपॉइंटमेंट रद्द होतील. प्रश्न : अपॉइंटमेंट कोणत्या अ‍ॅप्लिकेशन्सवरून (Applications) मिळते? उत्तर : लसीकरणासाठी पात्र असलेल्या व्यक्ती कोणत्याही वेळी आणि कुठेही लसीकरणाकरता नोंदणी करण्यासाठी को-विन 2.0 पोर्टलचा किंवा आरोग्यसेतूसारख्या अन्य आयटी अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर करू शकतात. प्रश्न : किती हॉस्पिटल्सचा (Hospitals) समावेश आहे? उत्तर : लसीकरणाच्या या अभियानात आयुष्मान भारत पीएमजेएवाय अंतर्गत 10 हजार खासगी हॉस्पिटल्स, सीजीएचएस अंतर्गत 600हून अधिक खासगी हॉस्पिटल्स आणि राज्य सरकारांच्या आरोग्य विमा योजनांतर्गत अन्य खासगी हॉस्पिटल्समध्ये लसीकरण होऊ शकतं.

(वाचा - GOOD NEWS! कोरोनाची लस शोधता शोधता सापडली कॅन्सरची लस; पाहा कधी उपलब्ध होणार)

प्रश्न : स्मार्टफोन नसेल तर काय करायचं? उत्तर : तुमच्याकडे स्मार्टफोन नसेल, तर थेट लसीकरण केंद्रावर नोंदणीची सोय आहे. त्यामुळे लाभार्थी लसीकरण केंद्रात जाऊन नोंदणी करून लस घेऊ शकेल. दुसऱ्या कोणा व्यक्तीला मोबाइल नंबर देऊनही रजिस्ट्रेशन करता येऊ शकेल. प्रश्न : लशीच्या डोसची किंमत (Dose Price) किती? उत्तर : कोविड-19ची लस सरकारी हॉस्पिटल्समध्ये मोफत दिली जाणार आहे. खासगी हॉस्पिटल्समध्ये लस घेतल्यास प्रति डोस 250 रुपयांपर्यंत शुल्क घेतलं जाऊ शकतं. प्रश्न : आतापर्यंत किती लोकांचं लसीकरण झालं? उत्तर : देशात 23 मार्चपर्यंत 5.21 कोटी डोस देऊन झाले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे, की राष्ट्रीय विशेषज्ञ समूहाकडून लसीकरण कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन केलं जात आहे. प्रश्न : आतापर्यंत लसीकरणाचे किती टप्पे झाले आहेत? उत्तर : देशात कोविडप्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर कोरोनो योद्ध्यांना लसीकरण करण्यात आलं. 1 मार्चपासून सुरू झालेल्या टप्प्यात 60 वर्षांवरील नागरिक, तसंच 45 वर्षांवरील गंभीर व्याधी असलेल्या व्यक्तींना लसीकरण करण्यात आलं. 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस घेता येणार आहे.
First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Corona vaccine cost, Coronavirus

पुढील बातम्या