Home /News /explainer /

Budget 2022: 13 हजार 700 कोटींचे अंतराळ बजेट! ISRO च्या मोहिमा पाहुन तुम्हालाही वाटेल अभिमान

Budget 2022: 13 हजार 700 कोटींचे अंतराळ बजेट! ISRO च्या मोहिमा पाहुन तुम्हालाही वाटेल अभिमान

भारताच्या (India) अंतराळ कार्यक्रमांमध्ये यावर्षी काही मोठ्या मोहिमांवर काम केले जाणार आहे. यामध्ये गगनयानसह चांद्रयान-3, आदित्य एल 1 यांसारख्या अनेक महत्त्वाच्या मोहिमा आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये (Union Budget 2022) यावेळी केंद्र सरकारने इस्रोच्या (ISRO) बजेटमध्येही वाढ केली आहे, ज्यामुळे गेल्या दोन वर्षांत कोविड-19 महामारीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या मोहिमांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : मंगळवारी मोदी सरकारच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये (Union Budget 2022) दूरगामी विचार दिसून येत आहे. सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही जी लोकांना भुरळ घालेल असे म्हणता येईल, तर दीर्घकाळात चांगले बदल घडवून आणतील अशी पावले उचलली आहेत. या अर्थसंकल्पात अंतराळ विभागाला Department of Space) गतवर्षीपेक्षा एक हजार कोटींनी अधिक निधी दिला आहे, जो या वर्षी अनेक मोठ्या मोहिमांमध्ये वापरला जाणार आहे, त्यात सर्वात प्रमुख म्हणजे गगनयान मोहीम. या व्यतिरिक्त इस्त्रोच्या (ISRO) चांद्रयान 3 सोबत सूर्य आणि शुक्राच्या मोहिमांवर देखील यावर्षी खूप काम करायचे आहे. अंतराळासाठी आणखी एक हजार कोटी या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला 14217.46 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापूर्वीच्या 2021-22 या आर्थिक वर्षापेक्षा 833 कोटी रुपये जास्त आहेत, ज्यामध्ये 13,438 कोटी रुपये वाटप करण्यात आले होते. यावर्षी सरकारने एस सोमनाथ यांच्या नेतृत्वाखालील इस्रोला 13,700 कोटींचे वाटप केले आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत हजार कोटींनी जास्त आहे. या मोहिमांना गती मिळणार अंतराळ विभागाला मिळालेला भरीव निधीळे कोविड-19 मुळे मंद गतीने चाललेल्या मोहिमा गगनयान आणि चांद्रयान-3 ला गती देण्याचे काम करेल. याशिवाय, सूर्यासाठी आदित्य L1 मोहीम आणि शुक्रासाठी मोहिमेच्या विकासासारख्या आणखी कार्यक्रमांना गती मिळेल. तरीही इतर विभागांच्या तुलनेत कमी यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक नवीन प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे देशाला विशेषत: हवामान बदलाच्या संदर्भात चांगली हरित ऊर्जा देशाला मिळू शकेल. त्यामुळे पर्यावरण, वने आणि हवामान बदल विभागासोबतच भूविज्ञान विभागाला अवकाश विभागापेक्षा जास्त निधी दिला जात आहे. कल्पना चावलाचा मृत्यू होणार हे आधीच माहिती होतं! तरीही NASA ने का लपवलं? गगनयान मिशन इस्रो आपल्या सर्वात महत्वाकांक्षी मोहीम गगनयानची तयारी करत आहे, ज्याचा पहिला टप्पा गगनयान 1 यावर्षी पाठवला जाणार आहे, ज्यामध्ये क्रूलेस वाहन अवकाशात पाठवले जाईल आणि परत आणले जाईल. 2023 मध्ये पहिले क्रू सदस्य वाहन पाठवले जाण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर अशी कामगिरी करणारा भारत अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश बनेल. पहिली दोन मानवरहित उड्डाणे गगनयान मोहिमेत पहिल्या दोन क्रूलेस उड्डाणे होतील. यापैकी एका क्रूलेस फ्लाइटमध्ये व्योमित्र नावाचा ह्युमनॉइड रोबो पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवला जाईल. स्पेस क्रूच्या हालचालींप्रमाणे हा रोबोट अंतराळात कार्य करेल. यामुळे अंतिम मोहिमेसमोरील सर्व आव्हानांचे मूल्यांकन करता येईल. चंद्रावर मोहीम इस्रोकडून यावर्षी प्रलंबित असलेले आणखी एक मिशन चांद्रयान 3 आहे. ही महत्त्वाकांक्षी मोहीम 2020 मध्ये पाठवली जाणार होती. आता या मोहिमेच्या दुसऱ्या प्रयत्नात इस्रो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत हे चंद्राचे असे क्षेत्र आहे, ज्याचे सर्वात कमी अन्वेषण आणि निरीक्षण केले गेले आहे. या वर्षाच्या मध्यात आदित्य एल1 मिशन सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवले जाणार आहे, जे दोन वर्षांपूर्वी पाठवले जाणार होते, जे सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करेल. या मोहिमांव्यतिरिक्त, स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (SSLV), रडार इमेजिंग सॅटेलाइट (RISAT 1A EOS-4), ओसीनसेट-3 Oceansat-3 (EOS-6) आणि माइक्रोसेट  (EOS-2) उपग्रह देखील या वर्षी प्रक्षेपित केले जाणार आहेत.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Isro, Space

    पुढील बातम्या