जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / आझाद हिंद फौजेने आजच्या दिवशी फडकवला होता ईशान्येत तिरंगा! पण, परिस्थिती कशी फिरली?

आझाद हिंद फौजेने आजच्या दिवशी फडकवला होता ईशान्येत तिरंगा! पण, परिस्थिती कशी फिरली?

आझाद हिंद फौजेने आजच्या दिवशी फडकवला होता ईशान्येत तिरंगा! पण, परिस्थिती कशी फिरली?

भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या (Indian Freedom Movement) इतिहासात 19 मार्च ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhas Chandra Bose) यांच्या आझाद हिंद फौजेने (Azad Hind Fauj) ईशान्य भारतात प्रवेश केला आणि देशाच्या भूमीवर तिरंगा फडकवण्यात यश मिळवले. इंग्रजांना भारतातून हाकलले जाऊ शकते हे नेताजींच्या सैन्याने दाखवून दिले होते. या कामगिरीने देशवासीयांच्या हृदयात स्वातंत्र्याचा इरादा आणखी बळकट केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 मार्च : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhas Chandra Bose) यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद फौजेचा मोठा प्रभाव होता. जेव्हा संपूर्ण जग दुसऱ्या महायुद्धात गुरफटले होते, तेव्हा भारतातील स्वातंत्र्यसैनिकांचा मोठा वर्ग ब्रिटीशांच्या विरोधात तसेच फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात होता. नेताजींनी याला एक संधी म्हणून पाहिले आणि भारताचे सैन्य तयार केले. त्यावेळी ते सिंगापूरमार्गे ईशान्येत पोहचण्यात यशस्वी झाले. देशवासियांनी लष्करी शैलीत इंग्रजांकडून आपली जमीन परत घेण्याची ही पहिलीच वेळ होती. आझाद हिंद फौज सहजासहजी उभी राहिली नाही आझाद हिंद फौज उभी करण्यापूर्वी नेताजींना अथक प्रयत्न करावे लागले. इंग्रजांना चकवा देत अफगाणिस्तान, रशियामार्गे जर्मनी गाठणे, तिथे निराश पदरात पडल्यानंतर सिंगापूर गाठणे असा संघर्ष होता. सिंगापूरमध्ये त्यांना आझाद हिंद फौजेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यांनी जपानशी हातमिळवणी करून सैन्यासह भारताकडे कूच केली. कर्नल शौकत मलिक यांचं नेतृत्व 19 मार्च 1944 रोजी कर्नल शौकत मलिक यांनी काही मणिपुरी आणि आझाद हिंद कॉम्रेड्सच्या मदतीने ईशान्येकडील देशाच्या भूमीत प्रवेश केला आणि त्या वेळी लष्कराने उभारलेला राष्ट्रध्वज फडकवला. या लढाईत कर्नल शौकत अली मलिक यांनी आझाद हिंद फौजेच्या शूर रेजिमेंटचे नेतृत्व केले. या घटनेवर बिमल राय यांनी ‘पहेला आदमी’ नावाचा चित्रपटही बनवला. यानंतरच दिल्ली चलोचा नारा या घटनेनंतर दोन दिवसांनी नेताजींनी ‘दिल्ली चलो’चा नारा दिला. नंतर 14 एप्रिलला मोइरांगमध्ये आझाद हिंद फौजेने मोइरांग ताब्यात घेतला, जिथे कर्नल मलिक यांनी तिरंगा फडकवला. मोइरांगला आझाद हिंद फौजेचे भारतीय मुख्यालय बनवण्यात आले. हे सर्व मणिपुरी लोकांच्या मदतीने शक्य झाले. आज येथे भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचे चित्रण करणारे भारतीय राष्ट्रीय सैन्य संग्रहालय देखील आहे. परिस्थिती फिरली यानंतर लष्कराला एकाच वेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पावसामुळे ये-जा करताना अडचणी वाढल्या आणि जवानांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला. रसद पोहोचण्यात अडचण आली, दळणवळण खूप कठीण झाले. जपानी सैन्याची मदतही शिथिल झाली. या सर्व प्रकारामुळे आझाद हिंद फौजेला जपानी सैन्यासह माघार घ्यावी लागली आणि इंग्रजांना युद्धात बाजी मारण्याची संधी मिळाली. डेल्टाक्रॉनमुळे पुन्हा भितीचं वातावरण, किती धोकादायक आणि काय आहेत लक्षणे? तो तिरंगा काही वेगळाच होता विशेष म्हणजे कर्नल शौकत मलिक यांनी जो तिरंगा फडकावला तो आज आपला राष्ट्रध्वज नाही. हा ध्वज काहीसा वेगळा होता, त्यात केशरी, पांढरा आणि हिरवा असे तीन पट्टे होते, पण पांढरा पट्टा अधिक रुंद होता, मध्यभागी वाघ उडी मारत असल्याचे चित्र होते. याशिवाय पहिल्या केशरी पट्टीवर आझाद तर खालच्या हिरव्या पट्टीवर हिंद लिहिले होते. आझाद हिंद फौजेचा संघर्ष आणि स्वातंत्र्य मिळवण्याची तळमळ हे देशभक्तीचे उत्तम उदाहरण आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यानंतरही आझाद हिंद फौजेला हवा तसा सन्मान मिळू शकला नाही. यामध्ये 19 मार्चच्या दिवसाचे महत्त्व विसरणे म्हणजे देशभक्तीच्या महत्त्वाच्या पैलूकडे दुर्लक्ष करणे होय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात