मराठी बातम्या /बातम्या /explainer /काय सांगता! अंतराळ अभियंते आणि न्यूरोसर्जन सामान्य लोकांपेक्षा जास्त हुशार नसतात, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

काय सांगता! अंतराळ अभियंते आणि न्यूरोसर्जन सामान्य लोकांपेक्षा जास्त हुशार नसतात, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

औरंगाबादच्या तरुणांची नामी शक्कल; सरकारी योजनेतंर्गत केली रोजगार निर्मिती

औरंगाबादच्या तरुणांची नामी शक्कल; सरकारी योजनेतंर्गत केली रोजगार निर्मिती

एरोस्पेस अभियंता (Aerospace Engineer) आणि न्यूरोसर्जन (Neurosurgeons) यांना अतिशय हुशार किंवा चाणाक्ष बुद्धी आणि विशेष क्षमता असलेल्या लोकांचे क्षेत्र असल्याचे मानले जाते. मात्र, अलीकडेच झालेल्या एका अभ्यासातून नवीन माहिती समोर आली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 15 डिसेंबर : जगभरात अंतराळवीर असो की आरोग्य क्षेत्रातील तज्ञ (Specialists) यांना इतर लोकांपेक्षा अधिक 'स्मार्ट' समजलं जातं. यावरच एक अभ्यास अहवाल समोर आला आहे. या अहवालात अंतराळवीर आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ञ खरंच इतरांपेक्षा अधिक 'स्मार्ट' किंवा बुद्धिमान असतात का या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात आलं. हे उत्तर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. यानुसार हे तज्ञ इतरांपेक्षा अधिक स्मार्ट नसतात. यासाठी अहवालात आकडेवारीच देण्यात आली आहे.

विशेष योग्यता आणि कुशाग्र बुद्धिमत्ता

सामान्यपणे असं मानलं जातं की तज्ञ होण्यासाठी अभ्यासात हुशार असलेले विद्यार्थीच पात्र ठरतात. इतकंच नाही तर असे लोकच तज्ञ स्मार्ट किंवा बुद्धिमान असू शकतात असंही म्हटलं जातं. मात्र, अभ्यासकांनी विशेष प्रकारच्या चाचण्या घेतल्यानंतर हे लोक सामान्य लोकांपेक्षा अधिक स्मार्ट किंवा बुद्धिमान नसतात असा निष्कर्ष काढला आहे.

हा अभ्यास कसा करण्यात आला?

अभ्यासकांनी घेतलेल्या चाचण्यांमध्ये 600 अंतराळ अभियांत्रिक, 148 न्यूरोसर्जनने सहभाग घेतला होता. त्यांना 12 ऑनलाईन चाचण्या देण्यास सांगितलं. यात ब्रिटिश बुद्धिमत्ता चाचणीचा वापर करण्यात आला. या अभ्यासाचे निष्कर्ष बीएमजे जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. यामध्ये संशोधकांनी सांगितले की, हे शक्य आहे की न्यूरोसर्जन आणि एरोस्पेस अभियंत्यांना विनाकारण 'शार्प माइंडेड' समजले जाते.

विशेष चाचण्यांमधून गोळा केला डेटा

संशोधकांनी एरोस्पेस अभियंते आणि न्यूरोसर्जन यांच्याकडून मिळालेल्या प्रतिसादांवरील डेटा संकलित केला आहे. ज्यामध्ये नियोजन आणि तर्क, कार्यशील स्मृती, लक्ष आणि भावना प्रक्रिया क्षमता यांचा समावेश असलेल्या संज्ञानात्मक चाचण्यांच्या मालिकेद्वारे डेटा गोळा केला आणि 18,000 लोकांच्या प्रतिसादांवरील डेटाशी त्यांची तुलना केली.

12 टास्कमधून आकडेवारी समोर

या चाचण्यांमध्ये कॉग्निट्रॉनच्या लायब्ररीतून 12 टास्क करण्यात आले होते, ज्याला पूर्ण करण्यासाठी 30 मिनिटे लागतात. या परीक्षेपूर्वी स्पेशलायझेशन, लिंग, वय, भौगोलिक स्थान, अनुभवाची पातळी अशा सहा प्रश्नांची उत्तरे स्पर्धकांना द्यावी लागतात. चाचणी परिणामांनी असे दिसून आले की शब्दसंग्रह समस्या सोडवण्याच्या क्षेत्रात एरोस्पेस अभियंत्यांपेक्षा न्यूरोसर्जनचे गुण जास्त आहेत. तर दुसरीकडे, एरोस्पेस अभियंत्यांनी मानसिक हाताळणी किंवा कौशल्य आणि लक्ष यामध्ये बरेच चांगले गुण मिळवले.

फक्त दोन फरक विशेष होते

अभ्यासात असे आढळून आले की दोन्ही गटांमध्ये स्मृती, समस्या सोडवण्याचा वेग आणि रिकॉल स्पीडमध्ये समान गुण आहेत. जेव्हा प्रत्येक गटाच्या सहा क्षेत्रांमधील स्कोअरची सामान्य लोकसंख्येच्या स्कोअरशी तुलना केली गेली तेव्हा फक्त दोन महत्त्वपूर्ण फरक दिसून आले. न्यूरोसर्जनच्या समस्या सोडवण्याचा वेग वेगवान होता. मात्र, आठवण्याचा वेग कमी होता.

अंतराळ विज्ञान आणि मेंदूच्या शस्त्रक्रियांबाबत लोकांच्या समजुतींमध्ये किती तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितातील अनेक उद्योगांप्रमाणेच, न्यूरोसर्जन आणि एरोस्पेस अभियांत्रिकी यांना त्यांचे कार्यबल टिकवून ठेवण्यात समस्या येतात. या भागात अनेक दशकांपासून कुशल लोकांची कमतरता आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की अभ्यासाचे परिणाम या क्षेत्राबद्दल लोकांची धारणा बदलू शकतात आणि भविष्यात या क्षेत्रातील भरतीवर देखील परिणाम होऊ शकतात.

First published:
top videos

    Tags: Science, Spacecraft, अंतराळ