Home /News /explainer /

Republic day parade | प्रजासत्ताक दिनाच्या परेडवरुन वाद! 'या' राज्यांचे चित्ररथ नाकारल्याने पक्षपातीपणाचा आरोप

Republic day parade | प्रजासत्ताक दिनाच्या परेडवरुन वाद! 'या' राज्यांचे चित्ररथ नाकारल्याने पक्षपातीपणाचा आरोप

यावेळी पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनी लावण्यात आलेल्या चित्ररथावरुन (Tableau Proposals) वाद निर्माण झाला आहे. जवळपास दरवर्षी असे वाद निर्माण होतात. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये चित्ररथ कसा निवडला जातो. ही प्रक्रिया किती काळापूर्वी सुरू होते? काही वेळा समिती मर्यादित संख्येमुळे निवड झाल्यानंतर राज्याचा चित्ररथ रद्द करू शकते.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 18 जानेवारी : गेल्या काही वर्षांपासून प्रजासत्ताक दिनी (73rd Republic Day Parade) सादर करण्यात येणाऱ्या चित्ररथावरुन वाद सुरू आहेत. यावेळीही, बंगाल आणि केरळने प्रजासत्ताक दिनी त्यांच्या राज्यांच्या चित्ररथाचा (Tableau Proposals) समावेश न केल्याने राजकीय पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. बंगालमध्ये (bengal) यंदाच्या चित्ररथात सुभाषचंद्र बोस (subhash chandra bose) यांचा समावेश करण्यात येणार होता, तर केरळने (kerala) राज्याचे नारायण गुरू यांचा चित्ररथ काढून टाकण्याचा प्रस्ताव नाकारला होता. यावरुन आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर आता बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या दोन राज्यांचे चित्ररथांचा समावेश परेडमध्ये का करण्यात आला नाही? प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व राज्यांचे चित्ररथ सादर करण्याला खूप महत्त्व मिळत आहे. हा चित्ररथ सहसा संबंधित राज्याची संस्कृती, विकास आणि कला सादर करते. हे चित्ररथ मर्यादित संख्येतच काढले जात असल्याने ते ठरविण्याचे काम एक समिती करते. तज्ज्ञ समिती निवडते चित्रकला, शिल्पकला, संगीत, स्थापत्य आणि नृत्यदिग्दर्शन या क्षेत्रातील 'प्रथितयश व्यक्तींचा' समावेश असलेली एक समिती, चित्ररथ निवडते किंवा नाकारते. प्रतिष्ठित व्यक्तींची तज्ज्ञ समिती बहु-स्तरीय प्रक्रियेत चित्ररथाची निवड करत असते. 2022 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राज्ये आणि केंद्रीय मंत्रालयांकडून एकूण 56 प्रस्ताव प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी 21 जणांना शॉर्टलिस्ट करण्यात आले. प्रक्रिया कधी आणि कशी सुरू होते? दरवर्षी सप्टेंबरमध्ये, संरक्षण मंत्रालय पुढील वर्षीच्या प्रजासत्ताक दिनासाठी सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालयांकडून चित्ररथांसाठी प्रस्ताव मागवते. या वेळी हे प्रस्ताव 10 दिवसांत पाठवण्यास सांगण्यात आले होते. प्रस्ताव आल्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून निवड प्रक्रिया सुरू होते. गोव्याच्या राजकारणातील मोठी बातमी! दीदींचे भाजपला अवघ्या 5 तासांत दोन धक्के! समिती मूल्यांकन कसे करते? तज्ज्ञ समितीच्या बैठका घेऊन चित्ररथ प्रस्तावांचे मूल्यमापन करते. प्रस्तावासोबत, राज्ये आणि केंद्रीय मंत्रालयांना स्केचेस/डिझाइन पाठवावे लागतात, ज्यांचे मूल्यांकन समितीद्वारे केले जाते. समितीला डिझाइन आवडल्यास, प्रस्तावांचे थ्रीडी मॉडेल लवकरात लवकर सादर करण्यास सांगितले जाते. मात्र, त्यानंतरही निवड निश्चित नाही. कोविडच्या निर्बंधांमुळे या वर्षी चित्ररथांची संख्या आणखी कमी झाली आहे. चित्ररथासोबत कोणतेही पारंपारिक नृत्य समाविष्ट केले असल्यास ते लोकनृत्य असावे, अशी समितीची शिफारस असते. त्यांची वेशभूषा आणि वाद्ये पारंपारिक आणि अस्सल असावीत. चित्ररथाच्या निवडीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यापूर्वी, निवड समिती त्या चित्ररथाचे दृश्य आकर्षण, तपशील आणि त्याचा जनतेवर होणारा परिणाम यांची तपासणी करते. साधारणपणे नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात चित्ररथ तयार केले जातात. यावेळी ही प्रक्रिया उशिरा झाली आहे. चित्ररथ तयार करण्यासाठी राज्यांना सुमारे एक महिन्याचा कालावधी मिळतो. यावेळी किती चित्ररथ यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर दाखवल्या जाणाऱ्या 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आणि नऊ घटनात्मक संस्थांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडची यंदाची थीम 'आझादी का अमृत महोत्सव' आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही थीम तयार करण्यात आली आहे. Goa Election : गोव्यात शिवसेनेचा महाविकास आघाडीचा प्लॅन फसला, काँग्रेसचा नकार गेल्या वर्षांत बंगालचे किती चित्ररथ सहभागी? केरळचा चित्ररथ 2018 आणि 2021 मध्ये दाखवला गेली नाही, तर तामिळनाडूचा चित्ररथ 2018 सोडून गेल्या 6 वर्षांत पाच वेळा दिसला. 2016, 2017, 2019 आणि 2021 मध्ये राजपथवर पश्चिम बंगालचा चित्ररथ पाहायला मिळाला. 2016 मध्ये बंगालचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट ठरला होता. चित्ररथाचा आकार निश्चित आहे का? चित्ररथ 45 फुटांपेक्षा लांब, 14 फुटांपेक्षा रुंद आणि जमिनीपासून 16 फुटांपेक्षा उंच नसावा. संरक्षण मंत्रालय प्रत्येक चित्ररथासाठी ट्रॅक्टर आणि ट्रेलर प्रदान करते, ज्यावर चित्ररथ सहज बसू शकतो. यासाठी अतिरिक्त ट्रॅक्टर किंवा ट्रेलर किंवा इतर कोणतेही वाहन दिले जात नाही. सहभागी राज्ये किंवा संस्था, त्यांची इच्छा असल्यास, संरक्षण मंत्रालयाने प्रदान केलेले ट्रॅक्टर किंवा ट्रेलर इतर वाहनांसह बदलू शकतात. परंतु, एकूण संख्या दोन वाहनांपेक्षा जास्त नसावी.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Republic Day, Republic Day parade

    पुढील बातम्या