मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Bhopal gas tragedy | घटनेच्या 36 वर्षांनंतरही इथं जन्माला येणारी मुलं भोगतायेत शिक्षा! काय आहे कारण?

Bhopal gas tragedy | घटनेच्या 36 वर्षांनंतरही इथं जन्माला येणारी मुलं भोगतायेत शिक्षा! काय आहे कारण?

Bhopal gas tragedy : जगाच्या औद्योगिक इतिहासातली ही सर्वात मोठा अपघात होता. मध्य प्रदेशातील भोपाळ (Bhopal) मधल्या युनियन कार्बाईड फॅक्टरीमधून 3 डिसेंबर 1984 च्या पहाटे झालेल्या विषारी वायू गळतीने आतापर्यंत हजारोंचा जीव घेतलाय. इथं जन्माला येणारी अनेक मुलं आजही त्याची शिक्षा भोगत आहेत.

Bhopal gas tragedy : जगाच्या औद्योगिक इतिहासातली ही सर्वात मोठा अपघात होता. मध्य प्रदेशातील भोपाळ (Bhopal) मधल्या युनियन कार्बाईड फॅक्टरीमधून 3 डिसेंबर 1984 च्या पहाटे झालेल्या विषारी वायू गळतीने आतापर्यंत हजारोंचा जीव घेतलाय. इथं जन्माला येणारी अनेक मुलं आजही त्याची शिक्षा भोगत आहेत.

Bhopal gas tragedy : जगाच्या औद्योगिक इतिहासातली ही सर्वात मोठा अपघात होता. मध्य प्रदेशातील भोपाळ (Bhopal) मधल्या युनियन कार्बाईड फॅक्टरीमधून 3 डिसेंबर 1984 च्या पहाटे झालेल्या विषारी वायू गळतीने आतापर्यंत हजारोंचा जीव घेतलाय. इथं जन्माला येणारी अनेक मुलं आजही त्याची शिक्षा भोगत आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

भोपाळ, 1 डिसेंबर : 3 डिसेंबर 1984 साली देशात सर्वात मोठी काळ रात्र आली होती. मध्य प्रदेश (madhya pradesh) राज्यातील भोपाळ (Bhopal) शहरात 36 वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेत हजारो लोकांचा मृत्यू तर कित्येकजण आयुष्यभरासाठी अपंग झाले. आजही तोही दिवस आठवला तरी अंगाचा थरकाप होत असल्याचे इथले नागरिक सांगतात. इतिहासात याला भोपाळ गॅस दुर्घटना (Bhopal gas tragedy) असे नाव देण्यात आलं आहे. भोपाळमधील युनियन कार्बाइड नावाच्या कंपनीच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली, ज्यामुळे 15000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकांना विविध प्रकारचे शारीरिक अपंगत्व आलं. ही घटना रोखली जाऊ शकत होती का? काय घडलं त्या रात्री? चला सविस्तर जाणून घेऊया.

भोपाळ वायू दुर्घटनेत मिथाइल आयसोसायनाइट (Mic) नावाच्या विषारी वायूची गळती झाली होती. ज्याचा वापर कीटकनाशके बनवण्यासाठी केला जात होता. वेगवेगळ्या सोर्समुळे मृतांच्या संख्येचा अंदाज बदलतो, तरीही अधिकृत मृतांची संख्या पूर्वी 2,259 इतकी नोंदवली गेली होती. मध्य प्रदेशच्या तत्कालीन सरकारने 3,787 लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली होती, तर इतर अंदाजानुसार दोन आठवड्यांत 8000 हून अधिक लोक मरण पावले. तर इतर 8000 लोक गॅसमुळे पसरलेल्या रोगांमुळे मरण पावले. तो भीषण प्रसंग आठवला की पीडितांचे डोळे अजूनही पाणावतात.

हिवाळ्यातील थंडीची रात्र होती, लोक शांतपणे झोपले होते. 2 डिसेंबर 1984 रोजी भोपाळ येथील चोला रोड येथे असलेल्या युनियन कार्बाइड कारखान्यात अधिकारी, कर्मचारी आणि मजूर नेहमीप्रमाणे प्लांट परिसरात त्यांचे काम करत होते.

रात्री झोपलेल्या हजारो लोकांना याची कल्पनाही नव्हती की ही काळरात्र ठरणार आहे. युनियन कार्बाईड फॅक्टरीतल्या टँक नंबर 610 मधील विषारी मिथाईल आयसोसायनाइट वायूचा पाण्याशी संपर्क आल्यानं ही घटना घडली. रासायनिक प्रक्रियेमुळे टँकमध्ये दाब निर्माण झाल्याने टाकी लीक झाली. त्यातून वायू गळती होऊ लागली. कारखान्याच्या जवळ असणाऱ्या झोपडपट्टीला याचा सगळ्यात जास्त फटका बसला. त्या रात्रीचा घटनाक्रम नेमका काय होता?

भोपाळ गॅस घटना: 2 डिसेंबर 1984 रात्री 8 वाजता

युनियन कार्बाइड कारखान्याची नाईट शिफ्ट सुरू होती. तिथं सुपरवायझर आणि कामगार काम करत होते.

भोपाळ गॅस घटना: 2 डिसेंबर 1984 रात्री 9 वाजता

भुयारी टाकीजवळील पाइनलाईनच्या साफसफाईच्या कामासाठी सुमारे अर्धा डझन कामगार निघून जातात.

भोपाळ गॅस घटना: 2 डिसेंबर 1984 रात्री 10 वाजता

कारखान्याच्या भूमिगत टाकीमध्ये रासायनिक अभिक्रिया सुरू झाली, टँकरचे तापमान 200 अंशांवर पोहोचले आणि गॅस तयार होऊ लागला.

भोपाळ गॅस घटना: 2 डिसेंबर 1984 रात्री 10:30 वाजता

टाकीतील गॅस पाईपपर्यंत पोहोचू लागला. व्हॉल्व्ह व्यवस्थित बंद होत नसल्याने टॉवरमधून गॅस गळती होऊ लागली.

भोपाळ गॅस घटना: 3 डिसेंबर 1984 रात्री 12:15 वाजता

तिथं उपस्थित कर्मचारी घाबरू लागले. व्हॉल्व्ह बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण नंतर सायरन वाजू लागला.

भोपाळ गॅस घटना: 3 डिसेंबर 1984 रात्री 12:50 वाजता

आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना गुदमरणे, खोकला, डोळ्यात जळजळ, पोट फुगणे, उलट्या होणे असे अनुभव येऊ लागले.

भोपाळ गॅस घटना: 3 डिसेंबर 1984 रात्री 1:00 वाजता

पोलिसांना खबर देण्यापूर्वीच गोंधळ उडाला. पण कारखान्याचे संचालक म्हणाले, गळती झाली नाही.

भोपाळ गॅस घटना: 3 डिसेंबर 1984 रात्री 2:00 वाजता

काही वेळाने रुग्णालयाच्या आवारात अशा रुग्णांची वाढायला लागली होती.

भोपाळ गॅस घटना: 3 डिसेंबर 1984 रात्री 2:10 वाजता

कारखान्यातून अलार्म सायरनच्या आवाजाने लोक घराबाहेर पळत होते आणि त्यांची प्रकृती खालावली होती. संपूर्ण शहरात गॅस पसरला होता.

भोपाळ गॅस घटना: 3 डिसेंबर 1984 रात्री 4:00 वाजता

झोपेच्या कुशीत असलेले हजारो लोक एका क्षणात विषारी वायूचे रुग्ण झाले होते. दरम्यान, गॅस गळतीवर नियंत्रण आणण्यात आले.

भोपाळ गॅस घटना: 3 डिसेंबर 1984 सकाळी 6 वाजता

पोलिसांच्या वाहनांनी परिसरात ध्वनिक्षेपकाद्वारे इशारा देण्यास सुरुवात केली. हजारो गॅसबाधित लोक एकतर शहरातील रस्त्यावर मरत होते किंवा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत होते.

मुख्य आरोपी वॉरन अँडरसनचे अमेरिकेत पलायन

36 वर्षांपूर्वी 1984 मध्ये 2 डिसेंबरच्या रात्री आणि 3 डिसेंबरच्या पहाटे भोपाळची ती काळी रात्र ज्याने हजारो लोकांना मृत्यूच्या कुशीत झोपवले. या दुर्घटनेनंतर युनियन कार्बाइडचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी वॉरन अँडरसन यांनी रात्रीत भारत सोडला आणि आपला देश अमेरिकेला पलायन केलं. या दुर्घटनेतील मुख्य आरोपी वॉरन अँडरसन यांचा 29 सप्टेंबर 2014 रोजी मृत्यू झाला होता.

2014 मध्ये या अपघातावर 'भोपाळ अ प्रेअर ऑफ रेन' हा चित्रपट तयार झाला होता. या दुर्घटनेनंतर भोपाळमध्ये जन्माला आलेल्या मुलांपैकी अनेकजण अपंगत्व घेऊन जन्माला आले तर अनेकजण दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या आजाराने या जगात आले. हे भयावह चक्र अजूनही सुरूच आहे आणि इथे अनेक विकृती घेऊन मुलं जन्माला येत आहेत.

First published:

Tags: Bhopal News, Gas, Oxygen leak