जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'झोंबिवली' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर एंट्री, दिसणार नव्या मालिकेत नवीन भूमिकेत

'झोंबिवली' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर एंट्री, दिसणार नव्या मालिकेत नवीन भूमिकेत

'झोंबिवली' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर एंट्री, दिसणार नव्या मालिकेत नवीन भूमिकेत

‘झोंबिवली’ सिनेमातील रिपोर्टर अंजली म्हात्रे म्हणजे अभिनेत्री जानकी पाठक (Janaki Pathak) लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 मे- ‘झोंबिवली’ सिनेमातील रिपोर्टर अंजली म्हात्रे म्हणजे अभिनेत्री जानकी पाठक (Janaki Pathak) लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. झोंबिवली (Zombivali Movie) या सिनेमातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. आता छोटा पडदा गाजवण्यासाठी ती सज्ज झाली आहे. लवकरच ती एक नव्या मालिकेत नवीन भूमिकेत दिसणार आहे. सन मराठी वाहिनीवरील ‘माझी माणसं’ (Mazi Manasa) या नव्या मालिकेत जानकी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आहे. 30 मे पासून ही मालिका सुरू होणार आहे. कशावर आधारित आहे मालिकेचे कथानक आपल्या वडिलांच्या पश्चात आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘गिरीजा’ची ही गोष्ट असून एका हॉस्पिटलमध्ये हेड नर्स असलेली गिरिजा तिच्या ८ जणांच्या कुटुंबातील एकमेव कमवणारी व्यक्ती आहे. घरातील सर्वांची काळजी घेत असताना, स्वतःकडे; स्वतःच्या सुखाकडे मात्र ती नेहमीच दुर्लक्ष करते. कुटुंबाचा एकटाच कमवता आधार असल्यामुळे आपल्या भावंडांच्या शिक्षणापासून ते घरखर्च भागवण्याची जबाबदारी सर्वस्वी गिरीजाच पार पाडते. अर्थात या सगळ्या प्रवासात अनेक अडथळे येतात. त्यातून मार्ग काढताना ज्या आपल्या माणसांचा तिला आधार वाटतो, अशी तिला आपली वाटणारी माणसं खरंच तिची आपली आहेत का? ह्या प्रश्नाभोवती मालिका गुंफलेली आहे. वाचा- बॉलिवूडला पाहिजे पन्नशीचा हिरो आणि तरुण हिरोईन! Age gap चा मुद्दा पुन्हा चर्चेत जानकीविषयी थोडसं… जानकीनं अनुपम खेर यांच्या इन्स्टिट्युटमधून अभिनयाचं रीतसर प्रशिक्षण घेतलं आहे. जानकीचे बाबा गिरीश विश्वनाथ हे जाहिरात क्षेत्रात क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. तर आई मनीषा पाठक डॉक्टर आहेत. आपल्याला अभिनेत्री व्हायचं, हे जानकीनं वयाच्या पाचव्या वर्षापासूनच ठरवलं होतं. आई सुरुवातीच्या काळात नाटकांतून कामं करायची. त्यांचंही स्वप्न मनोरंजन क्षेत्रात येण्याचं होतं. मात्र, बारावीला मार्क अधिक मिळाले अन् त्यांना वैद्यकीय क्षेत्राकडे वळावं लागलं.

जाहिरात

एके दिवशी जानकीनं ‘मला अभिनेत्री व्हायचंय’, असं घरी जाहीर करून टाकलं. कलाक्षेत्रात कार्यरत बाबा आणि अभिनयक्षेत्राची आवड असलेली आई या दोघांनाही तिच्या या निर्णयानं आनंदच झाला. विशेष म्हणजे, ‘व्हॅनिला स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट’ हा चित्रपट जानकीचे बाबा गिरीश विश्वनाथ यांनीच दिग्दर्शित केला आहे. नायिका म्हणून जानकीचा आणि दिग्दर्शक म्हणून गिरीश या बापलेकीचा हा पहिलाच चित्रपट आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात