Home /News /entertainment /

सिनेमागृहात झळकणार ‘जिंदगानी’; मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज

सिनेमागृहात झळकणार ‘जिंदगानी’; मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज

लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या 'जिंदगानी' या पहिल्या-वहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉंच

    मुंबई 20 ऑगस्ट: कोरोनाचा वाढता प्रभाव आता हळूहळू कमी झाला आहे. (coronavirus in India) परिणामी प्रशासनानं अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या उदास प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आता सिनेसृष्टीदेखील सज्ज झाली आहे. (Marathi Movie) या पार्श्वभूमीवर एक नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव 'जिंदगानी' (Zindagani) असं असून नुकताच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला. 'जिंदगानी' या आगामी चित्रपटाचं पोस्टर आज सोशल मीडियावर लॉंच करण्यात आले. अभिनेते शशांक शेंडे व विनायक साळवे यांनी या चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. खेडेगावातील कठीण परिश्रम आणि संयमाचे उत्तम उदाहरण ठरणाऱ्या 'प्रभाकर' आणि 'सदा' या आदिवासी व्यक्तींच्या त्यांनी या चित्रपटात साकारल्या आहेत. खान-कपूर नव्हे तर हा अभिनेता आहे 'गोल्डन बॉय'चा फेव्हरिट; अभिनेत्याने स्वत: शेअर केला VIDEO शशांक आणि विनायक यांच्यासोबतच सविता हांडे, सुष्मा सिनलकर, स्मिता प्रभू, सायली पाटील, गणेश सोनवणे, प्रथमेश जाधव, रवि साळवे, सागर कोरडे, संजय बोरकर, दिपक तावरे, पांडुरंग भारती यांनी चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचे लेखन विनायक भिकाजीराव साळवे यांनी केलेले असून विजय गवंडे यांनी चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. तर चित्रपटातील गाणी अजय गोगावले, आदर्श शिंदे, बेला शेंडे, राधिका अत्रे, अमिता घुगरी यांच्या सुरमधुर स्वरांनी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित 'जिंदगानी' हा बदलत्या काळानुसार माणसाच्या बदलत्या जीवनशैलीची जीवनगाथा सांगणारा चित्रपट लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Movie release

    पुढील बातम्या