मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'आजवर तुम्ही प्रत्येक क्षणी या प्रवासाचे साक्षीदार होत आलात आणि आता...' तू चाल पुढं फेम अभिनेत्रीची भावुक पोस्ट

'आजवर तुम्ही प्रत्येक क्षणी या प्रवासाचे साक्षीदार होत आलात आणि आता...' तू चाल पुढं फेम अभिनेत्रीची भावुक पोस्ट

झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’  ही मालिका लगेचच प्रेक्षकांच्यात लोकप्रिय झाली.

झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ ही मालिका लगेचच प्रेक्षकांच्यात लोकप्रिय झाली.

‘तू चाल पुढं’ या मालिकेमधील दीपा साकारत असलेली गृहिणीची भूमिका सध्या चर्चेत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 मार्च- झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ ही मालिका लगेचच प्रेक्षकांच्यात लोकप्रिय झाली. मालिकेचं कथानंक अश्विनी भोवती फिरताना दिसत आहे. या मालिकेनं नुकताच 200 भागाचा टप्पा पूर्ण केला. यानिमित्त मालिकेत अश्विनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपा चौधरी हिनं एक भावनिक पोस्ट केली आहे. सध्या दीपाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

‘तू चाल पुढं’ या मालिकेमधील दीपा साकारत असलेली गृहिणीची भूमिका सध्या चर्चेत आहे. दीपा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. तिनं मालिकेनं 200 भागाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सोबत तिनं म्हटलं आहे की, काल ‘तू चाल पुढं’ मालिकेने २०० भाग पुर्ण केले आणि आजपासून अश्विनीच्या मिसेस इंडिया कॉम्पिटीशनला खऱ्या अर्थाने सुरुवात होते आहे. आजवर तुम्ही प्रत्येक क्षणी अश्विनीच्या या प्रवासाचे साक्षीदार होत आला आहात आणि आता अश्विनीला खरोखरच तुमच्या प्रेमाची, आशिर्वादाची गरज आहे… त्यामुळे तुम्हीसुद्धा ‘तू चाल पुढं’ पाहत रहा आणि आजपासून सुरु होणाऱ्या मिसेस इंडिया कॉम्पिटीशनचा भाग नक्की व्हा. मालिकेत आता मिसेस इंडिया कार्यक्रमाचा जलवा पाहिला मिळणार आहे. यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहेत.

वाचा-अर्जुन-मलायकाआधीच लग्न करणार अंशुला कपूर;जान्हवीची सावत्र बहीण पडली प्रेमात

अंकुश चौधरीशी लग्न झाल्यानंतर दीपा परब लहान आणि मोठ्या पडद्यापासून बराच काळ दूर राहिली होती. तसंच आपल्या मुलाच्या जन्मानंतर पुन्हा एकदा दीपा या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गेल्यावर्षी दीपाने हिंदी मालिकेतून पुनरागमन केले होते. पण मराठी प्रेक्षकांना दीपा पुन्हा कधी दिसणार असा प्रश्न अनेकांना सतावत होता आणि दीपा चौधरी पुन्हा एकदा मराठी मालिकेतून पुनरागमन केलं आहे. तिच्या भूमिकेला चांगाला प्रतिसाद देखील मिळत आहे.

दीपाच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एकानं म्हटलं आहे की, खुप छान आहे अश्विनी.पुढील वाटचालीच्या खुप खुप शुभेच्छा..😍❤️🔥 तर दुसऱ्यानं अश्विनीच्या अभिनयाचे कौतुक केलं आहे. त्यानं म्हटलं आहे की, तुम्ही माझी सगळ्यात आवडती अभिनेत्री आहात.. अगदी दूरदर्शन वर दामिनी मालिकेत प्रीती होतात तेव्हा पासून मला खूप आवडतो तुमचा अभिनय... साधा सरळ आणि नैसर्गिक अभिनय.. आणखी एकानं कमेंट करत म्हटलं आहे की, मला एक कळत नाही अश्विनी काहीही करायला गेली की शिल्पी का मध्ये येते.

आपल्याकडे अनेक महिला आहेत ज्या आजही गृहिणी आहेत, तर अनेक महिला काम करत असूनही आपलं घर – ऑफिस अथवा घर आणि आपला उद्योग या दोन्ही कसरती अत्यंत यशस्वीपणे सांभाळताना दिसून येतात. अशाच कथेवर आधारित ही एका गृहिणीची आणि गृहिणी असूनही यशस्वी उद्योजिकेचा प्रवास करणारी कहाणी आहे. दीपा देखील भविष्यात असचं काहीतरी करताना दिसणार आहे. त्यामुळं दीपाला यशस्वी उद्योजिका पाहण्यासाठी तिचे चाहते देखील उत्सुक आहेत.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial