जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / रविवारची संध्याकाळ राखून ठेवा ! तुमच्या लाडक्या मालिकांच्या महाएपिसोडचा आनंद घ्या

रविवारची संध्याकाळ राखून ठेवा ! तुमच्या लाडक्या मालिकांच्या महाएपिसोडचा आनंद घ्या

रविवारची संध्याकाळ राखून ठेवा ! तुमच्या लाडक्या मालिकांच्या महाएपिसोडचा आनंद घ्या

रविवारची संध्याकाळ तुमच्या लाडक्या मालिकांसाठी राखून ठेवा कारण अनेक ट्विस्ट घेऊन तुमच्या लाडक्या मालिका येत्या रविवारी प्रदर्शित होणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 डिसेंबर: तुम्ही जर मालिकांचे चाहते असाल तर येणारा रविवारही राखून ठेवा. कारण येत्या रविवारी झी मराठी घेऊन येत आहे 3 सुपरहिट मालिकांचे महाएपिसोड. माझा होशील ना (Majha Hoshil Na), कारभारी लयभारी (Karbhari Lai Bhari) आणि माझ्या नवऱ्याची बायको (Majha Navryachi Bayko) या लोकप्रिय मालिकांचे 1 तासांचे विशेष भाग सादर करणार आहे. माझा होशील ना या मालिकेत देखील सई आणि आदित्यचं एकमेकांशी पॅचअप होणार का हे  प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, आणि सर्वात मोठा क्षण म्हणजे, आदित्यला मेघनाशी लग्न ठरवण्यासाठी दापोलीला जायची आज्ञा मिळणार आहे! कारभारी लयभारी मालिकेत आत्तापर्यंतच्या भागांत पियूने राजवीरपासून तिची खरी ओळख लपवली होती. तिने स्वतच्या पोस्टरवर शेण फासल्याप्रकरणी विनाकारण राजवीर त्यात अडकतो. राजवीरला आपल्यामुळे त्रास झाला या भावनेने अस्वस्थ पियूने अनेकदा त्याला खरं सांगण्याचा प्रयत्न केला. पण दरवेळी काही ना काही अडचणी येत आहेत. दुसरीकडे अंकुशरावने आता पियूला राजकारणात आणण्याची तयारी सुरु केली आहे. तिची सर्वांना ओळख करुन देण्यासाठी तो एका कार्यक्रमाचं आयोजन करतो. याच कार्यक्रमावेळी राजवीरला प्रियांकाची खरी ओळख कळणार आहे. महाएपिसोडमध्ये हा जबरदस्त ड्रामा घडणार आहे.

जाहिरात
जाहिरात

तर माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत इतक्या घडामोडींनंतर शनाया च्या आयुष्यात कोणाच्या रूपात प्रेम परत येईल हे कळेल. ‘माझा होशील ना’ संध्याकाळी 7 वाजता, ‘कारभारी लयभारी’ रात्री 8 वाजता आणि माझ्या नवऱ्याची बायको रात्री 9 वाजता प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात