जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : एकवेळच्या जेवणासाठी करावा लागत होता संघर्ष ; स्ट्रगलचे दिवस आठवल्यानंतर अभिनेता भावुक

VIDEO : एकवेळच्या जेवणासाठी करावा लागत होता संघर्ष ; स्ट्रगलचे दिवस आठवल्यानंतर अभिनेता भावुक

VIDEO : एकवेळच्या जेवणासाठी करावा लागत होता संघर्ष ; स्ट्रगलचे दिवस आठवल्यानंतर अभिनेता भावुक

पडद्यावर पाहताना आपणास एकादा चेहरा व त्यावरची चमक दिसते. मात्र बऱ्याचवेळा यामागे संघर्ष लपलेला असतो. किचन कल्लाकारमध्ये देखील एका अभिनेत्याने स्ट्रगलच्या काळात कसे दिवस काढले याबद्दल सांगितले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 जानेवारी- झी मराठीवरील**( zee marathi)** किचन कल्लाकार ( Kitchen Kallakar Latest Episode )शो कमी काळात लोकप्रिय झाला आहे. या शोमध्ये अभिनेता संतोष जुवेकर, श्रुती मराठे, वैभव तत्ववादी या लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी संतोष जुवेकरच्या आयुष्यातील स्ट्रगलच्या( santosh juvekar struggle story ) काळातील एक किस्सा शोचा होस्ट संकर्षण कऱ्हाडे याने सांगितला आहे. सध्या संतोषचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक वेळच्या अन्नासाठी संतोषला एकेकाळी संघर्ष करावा लागत होता. मात्र परस्थितीवर मात करत त्याने अभिनयाच्या जीवावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा हा व्हिडिओ भावुक करणारा आहे पण त्याच्या संघर्षाची जाणीव करणारा देखील आहे. संतोष जुवेकरने ( santosh juvekar ) झी मराठीच्या किचन कल्लाकार या शोमध्ये सहभागी झाल्याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो की, हसवता हसवता अचानक जुन्या आठवणींना हात घातला आणि………….. ❤❤❤.. त्याचा हा व्हिडिओ डोळ्यात पाणी आणणारा असाच आहे. वाचा- ‘आई कुठे काय करते’ मधील देशमुखांच्या नव्या सूनबाईंचा लुक पाहिला का? संतोष या व्हिडिओत म्हणताना दिसत आहे की, ज्यावेळी मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली होती, त्यावेळी माझ्याकडे जेवणासाठी देखील पैसे नसायचे.मी कधी कधी मित्राकडे तर कधी मावशीकडे जेवण करायचो. पण रोज रोज जेवायला कोण देणार. खार स्टेशनच्या बाहेर एक हातगाडी आहे, जिथे 20 रुपयात थाळी मिळायची. त्यामध्ये तीन पोळ्या, बटाट्याची भाजी, भात, लिंबाचं किंवा कैरीच लोणचं आणि मिरची कांदा असायचं. तसेच तो पुढे म्हणाला की, जेवत असताना कोणी फोन केला आणि की कुठे आहेस विचारलं. तर सांगायचो की, लिलामध्ये आहे. पण, खरंच ही खूप जवळची गोष्ट आहे माझ्या. आयुष्यमधील या खडतर टप्प्यांनी ताठ मानेने जगण्याची दिलेली शिकवण खूप काही सांगून जाते.

जाहिरात

संतोषचा हा संघर्ष ऐकून यावेळी प्रशांत दामले तसेच संघर्षण कऱ्हाडे व इतर कलाकार देखील भावुक झाले. या शोमध्ये विनोद होत असतात मात्र संतोषचा स्ट्रगल ऐकल्यावर सर्वजण भावुक झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात