
झरिना खान ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं आजवर वीर, हाऊसफुल, रेडी, हेट स्टोरी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

अनेक नामांकित अभिनेत्यांसोबत काम केल्यानंतरही झरिनाला मात्र अपेक्षित असलेली लोकप्रियता मिळाली नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

झरीन एक चांगली अभिनेत्री आहे. तरी देखील अभिनयापेक्षा तिच्या लूकचीच चर्चा अधिक केली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

तिचा चेहरा कतरिनासारखा दिसतो म्हणून तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली असं म्हटलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

परंतु या चर्चेचा झरीनला मात्र प्रचंड राग येतो. मी कतरिनासारखी दिसते असा लोकांचा समज झाल्यामुळंच माझ्या करिअरला उतरती कळा लागली असं ती म्हणाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिनं कतरिनासोबत केल्या जाणाऱ्या तुलनेवर भाष्य केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

ती म्हणाली, “मला आजवर वाटत होतं मी माझ्या आईसारखी दिसते. परंतु बॉलिवूडमध्ये आल्यावर कळलं की मी कतरिनासारखी दिसते.” (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

“अर्थात या चर्चेमुळं माझं स्वत:च अस्तित्व पार पुसून गेलं अन् मला कतरिनाची डुब्लिकेट म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं.” (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

“जर मी इतर दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात कार्यरत असती तर मला ही चर्चा ऐकून खुप आनंद झाला असता परंतु माध्यमांनी खोट्या अफवा पसरवून माझ्या करिअरचे तीनतेरा वाजवले.” (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
 
 
 




