Home /News /entertainment /

छोेट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री 6 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर; पतीने ICU मध्ये काढला VIDEO

छोेट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री 6 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर; पतीने ICU मध्ये काढला VIDEO

दिव्या भटनागरला (Divya Bhatnagar) कोरोनाची बाधा झाली आहे. ती प्रकृती नाजूक आहे.

    मुंबई, 01 डिसेंबर: ये रिश्ता क्या कहलाता हैं (Yeh Risha Kya Kehalata Hai) फेम अभिनेत्री दिव्या भटनागर (Divya Bhatnagar) गेल्या 6 दिवसांपासून व्हेंटिलेटवर आहे. या अभिनेत्रीची कोरोना (Corona) चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तिच्यावर सध्या मुंबईतील मल्टीस्पेशालिटी सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्यामुळे तिचे कुटुंबीय चिंतेत आहेत. प्रकृती सुधारायला 20-25 दिवस लागणार एका वृत्तपत्राशी बातचीत करताना दिव्याचा धाकटा भाऊ देव भटनागर म्हणाला, "डॉक्टरांच्या उपचारांना दिव्या रिस्पॉन्स देत नाही.  तिला बरं होण्यासाठी आणखी 20 ते 25  दिवस लागू शकतात. ती शुद्धीत यावी यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत” दिव्याला कोरोना आणि हायपर टेंशनचा त्रास आहे. वैय़क्तिक आयुष्यात ती तणावाला सामोरी जात होती. अशी माहिती त्याच्या भावाने दिली. सासऱ्याच्या व्यक्तींनी त्रास दिल्याचा आरोप दिव्याला तिचा पती गगन आणि सासरच्या इतर मंडळींकडून मानसिक त्रास सहन करावा लागत होता. असा आरोप तिच्या भावाने केला आहे. ‘माझी बहीण आयसीयूमध्ये असतानाही गगनने तिचा व्हिडीओ काढला. मला सांगा आपली पत्नी आयसीयूमध्ये असताना तिचा व्हिडीओ कोण काढतं?’ असा सवालही देव भटनागरने उपस्थित केला आहे. ‘तो हे सगळं पब्लिसिटी मिळवण्यासाठी करत आहे. तो स्वत: पैसे कमवत नाही. अशीही माहिती तिच्या भावाने दिली. 'एकदा माझ्या बहिणीची प्रकृती सुधारली की मी त्याच्याकडेही बघून घेईन’ असं देव म्हणाला. सिने इंडस्ट्री आली मदतीला दिव्या भटनागरच्या भावाने माहिती दिली, ‘माझ्या बहिणीच्या उपचारांवर सध्या फार खर्च होत आहे. पण आम्ही तिला बरं करण्यासाठी पैशांकडे बघणार नाही. तिच्या उपचारासाठी छोट्या पडद्यावरील कलाकारांची युनियन धावून आली. काही निर्माते आणि कलाकारांनीही आम्हाला मदतीचा हात दिला.’ दिव्याने आत्तापर्यंत 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत गुलाबोची भूमिका केली होती. याच सीरिअलमधून तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर 'उड़ान', 'जीत गई तो पिया मोरे'आणि 'विष' या मालिकांमध्येही ती झळकली होती. सध्या ती शशि-सुमित प्रोडक्शन हाउसच्या 'तेरा यार हूं मैं' या मालिकेत काम करत आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Corona, Serials

    पुढील बातम्या