रितेशचा 'बँक-चोर' भारतातला पहिला '16 डी' सिनेमा

रितेशचा 'बँक-चोर' भारतातला पहिला '16 डी' सिनेमा

हा तोच सिनेमा आहे जो विनोदवीर कपिल शर्माला ऑफर केला होता

  • Share this:

01 मार्च : 3डी सिनेमा जर तुम्ही पाहिला असले तर तो पाहण्यात किती आनंद असतो हे तुम्हाला चांगलं माहीत असेल, पण हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी भारतातील पहिला 16 डी सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. 'बँक-चोर' असं या सिनेमाच नाव असून अभिनेता रितेश देशमुख प्रमुख भुमिकेत झळकणार आहे.

हा तोच सिनेमा आहे जो विनोदवीर कपिल शर्माला ऑफर केला होता. मात्र नंतर कपिलने आपलं नाव मागे घेत सिनेमा करण्यास नकार दिला.

यशराजचा हा नवा 16 डी सिनेमा बँक रॉबरीवर आधारीत आहे. या सिनेमाच पहिल पोस्टरसुद्धा आज रिलीज करण्यात आलं. बॉलिवूडमध्ये प्रथमच या सिनेमा मार्फत यशराज एक आगळावेगळा प्रयोग करणार आहे.

जर आपण 3 डी चष्मा घालून हा सिनेमा पाहिला तर सिनेमा पाहण्याच्या व्यतिरिक्त सिनेमाचा स्पर्श, गंध आणि स्वाद सुद्धा अनुभवता येणार आहे. या नवीन तंत्राचा वापर लहान मुलांच्या एम्यूजमेंट पार्कमध्ये सुद्धा केला जातोय.

16 डी सारख्या निरनिराळ्या तंत्रज्ञानाचा वापर सिनेमात केला जातोय. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे प्रयोग असंच चालू राहिले तर बॉलिवूड नक्कीच हॉलिवूड सिनेमांची उंची गाठु शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2017 08:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading