मुंबई, 20 एप्रिल- मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता यश चोप्रा यांच्या पत्नी आणि अभिनेत्री राणी मुखर्जीची सासू पामेला चोप्रा यांचं निधन झालं आहे. पामेला यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. पामेला या 85 वर्षांच्या होत्या. त्या गायिका, लेखिका, डिझायनर आणि सह निर्मात्यासुद्धा होत्या. बॉलिवूड अभिनेता उदय चोप्रा आणि निर्माता आदित्य चोप्रा यांच्या आई पामेला यांचं निधन झालं आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. पामेला या अभिनेत्री नसल्या तरी त्या बॉलिवूडमध्ये सक्रिय होत्या. त्यांचे अनेक सेलिब्रेटींसोबत जवळचे संबंध आहेत. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पामेला चोप्रा या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. तसेच त्या 15 दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल होत्या.त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत फारसा फरक दिसत नव्हता. अशातच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पामेला चोप्रा यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांतील गाण्यांना आपला आवाज दिला आहे.पती यश चोप्राप्रमाणे त्यासुद्धा इंडस्ट्रीत नेहमीच चर्चेत असायच्या. यश चोप्रा यांनी 1970 मध्ये पामेला यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. या दोघांची जोडी सिने इंडस्ट्रीत चांगलीच लोकप्रिय होती. पामेला या सध्या 85वर्षांच्या होत्या. त्या शेवटच्या आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या एका सीरिजच्या भागात झळकल्या होत्या. ‘द रोमांटिक्स’ असं त्या सिरीजचं नाव होतं. ही सीरिज सध्या नेटफ्लिक्सवरसुद्धा उपलब्ध आहे. या सीरिजमध्ये त्यांनी आपले पती यश चोप्रा आणि यशराज प्रोडक्शनच्या जडणघणबाबत अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. बातमी अपडेट होत आहे…