मुंबई, 26 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण स्टारर चित्रपट ‘पठाण’ वादात आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यातील भगव्या बिकीनीमुळे हा संपूर्ण वाद उफाळला असून या चित्रपटाचा तीव्र निषेध केला जात आहे. त्यामुळे हा चित्रपट सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. आत्तापर्यंत चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शीत झाली असून चित्रपटाच्या ट्रेलकडे किंग खानच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. ‘पठाण’ चा ट्रेलर कधी भेटीस येणार हा प्रश्न चाहते सातत्याने विचारत असल्याचं दिसत आहे. यावर आता खुद्द किंग खानने प्रतिक्रिया दिली आहे. शाहरुख खानने नुकतंच ट्विटरवर #ASKSRK के सेशन घेतलं. यामघ्ये शाहरुखने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्याने प्रश्न केला की ‘पठाण’ चा ट्रेलर का प्रदर्शीत करत नाहीत?. यावर शाहरुखने भन्नाट उत्तर दिलं आहे. शाहरुख म्हणाला, हाहाहा, माझी इच्छा. तो तेव्हाच येईल जेव्हा त्याला यायचंय. शाहरुखच्या या उत्तराची सध्या सोशल मीडियाावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा - Tunisha Sharma Pregnancy : तुनिषा शर्मा प्रेग्नेंट होती का? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य आलं समोर शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाचा ट्रेलर अद्याप रिलीज व्हायचा आहे, मात्र आता या चित्रपटातील दोन उत्तम गाणी रिलीज करण्यात आली आहेत. पहिले गाणे बेशरम रंग आणि दुसरे झूम जो पठान. बेशरम रंग हे पहिले गाणे देशातील अनेक राज्यांमध्ये प्रदर्शित झालं आहे. त्याचवेळी ‘झूम जो पठाण’ हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. किंग खान दीपिकाच्या चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता तर आहे मात्र बॉयकॉटच्या वादात चित्रपटावर किंवा प्रदर्शणावर काही परिणाम होणार तर नाही ना हे पाहणं औतुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान, शाहरुख दीपिकाचा ‘पठाण’ पुढच्या वर्षी 26 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र सध्या चित्रपट बॉयकॉटमध्ये अडकल्याचा दिसतोय. त्यामुळे याचा चित्रपटावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.