मुंबई, 10 मार्च- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री काजोलच्या (Kajol) अभिनयाचे तर सर्वच चाहते आहेत. मात्र तिच्या खट्याळ स्वभावाचेसुद्धा अनेकजण चाहते आहेत. अभिनेत्री सतत आपल्या बिनधास्त स्वभावाने चर्चेत असते. नुकतंच महिला दिवस साजरा करण्यात आला. यादरम्यान अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. दरम्यान अभिनेत्रीला चुलत बहीण (Cousin) राणी मुखर्जीबद्दलसुद्धा (Rani Mukharjee) प्रश्न विचारण्यात आला. यालाही अभिनेत्रीने आपल्या हटके अंदाजात उत्तर दिलं आहे. अभिनेत्री काजोल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतंच सर्वत्र आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. महिला दिनाचं औचित्य साधत काजोलने सोशल मिडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसाठी आस्क मी एनीथिंक हा सेशन आयोजित केला होता. यावेळी चाहत्यांनी काजोलला अनेक प्रश्न विचारले होते. अभिनेत्रीनेही आपल्या मजेशीर अंदाजात त्यांना उत्तरे दिली होती. दरम्यान एका चाहत्याने काजोलला तिची चुलत बहीण आणि अभिनेत्री राणी मुखर्जीबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला काजोलने आपल्या अंदाजात उत्तर दिलं आहे. राणीबद्दल प्रश्न विचारत चाहत्याने म्हटलं, ‘प्लिज राणी मुखर्जीबद्दल सांगा, ती इन्स्टावर का नाही?" याला मजेशीर उत्तर देत काजोलने म्हटलं, ‘मी राणीला फोन करते. हे फारच गंभीर आहे’. काजोल जरी सोशल मीडियावर सक्रिय असली तरी तिची बहीण राणी मुखर्जी मात्र सोशल मीडियापासून दूर आहे. ती आपल्या प्रत्येक गोष्टी खाजगी ठेवत असते. अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी या दोघी चुलत बहिणी आहेत. या दोघींना अनेक चित्रपटांमध्ये एकत्र पाहण्यात आलं आहे. परंतु फारच कमी लोकांना माहिती आहे की सुरुवातीच्या काळात या दोघींमध्ये काहीतरी बिनसलं होतं. त्यांचं नातं तितकंसं चांगलं नव्हतं. परंतु वेळेनुसार सर्व काही ठीक झालं. आणि आज या बहिणी एकमेकींच्या फारच जवळ आहेत. या दोघींना दुर्गा पूजेवेळी नेहमीच एकत्र पाहिलं जातं. सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंची बरीच चर्चादेखील होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.