Home /News /entertainment /

त्या चुकीमुळं संपलं अनिताचं career; सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कामाच्या शोधात

त्या चुकीमुळं संपलं अनिताचं career; सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कामाच्या शोधात

कधीकाळी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आज आहे कामाच्या शोधात; या अभिनेत्यामुळं संपलं करिअर

    मुंबई 14 एप्रिल: अनिता हसनंदानी (Anita Hassanandani) ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. क्यूट लूक आणि जबरदस्त अभिनयाच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना घायाळ करणारी अनिता ही एकेकाळी हिंदी मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती. आज तिचा वाढदिवस आहे. 40 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनिता चाहत्यांमध् लोकप्रिय असली तरी अभिनेयसृष्टीत मात्र तिचा भाव आता उतरला आहे. (Highest paid actress) आयुष्यात केलेल्या त्या एका चूकीमुळं लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ही अभिनेत्री आज बेरोजगार आहे. अनितानं 1998 साली इधर उधर या मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. पहिल्याच मालिकेनं तिला तुफान प्रसिद्धी मिळवून दिली. अन् या प्रसिद्धीच्या जोरावरच तिनं ताल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिनं कभी सौतन कभी सहेली, कोई अपना सा, कसौटी झिंदगी की यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. याच दरम्यान ती सामुराई, छोटी गँग, ये दिल, नानू पेलेक्की रेड्डी यांसारख्या हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम करत होती. अनिता अगदी यशाच्या शिखरावर होती. पण त्याच दरम्यान 2005 साली ती अभिनेता एजाज खानच्या प्रेमात पडली. अन् तिथूनच तिच्या करिअरला उतरती कळा लागली असं म्हटलं जातं. अवश्य पाहा - सोनाली कुलकर्णी ते अमृता खानविलकर, तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींनी कसा साजरा केला गुढीपाडवा अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अनितानं एजाजसोबतच्या नात्यावर भाष्य केलं होतं. काव्यांजली या मालिकेच्या सेटवर त्यांची मैत्री झाली. अन् पुढे दोघं एकमेकांना डेट करु लागले. अनिताला लग्न करायचा होतं. पण एजाज तयार नव्हता. अखेर दोघांचं ब्रेकअप झालं. पण या ब्रेकअपचा वाईट परिणाम अनिताच्या करिअरवर झाला. ब्रेकअपमुळं अनिता काही काळ नैराश्येत होती. याचा परिणाम तिच्या अभिनयावर देखील होत होता. शिवाय ती सेटवर सहकलाकारांसोबत भांडणं करायची. त्यामुळं तिला मालिकेतून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर तिच्याकडे बराच काळ काम नव्हतं. त्यानंतर तिनं छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं खरं पण तिला मुख्य भूमिका मिळत नव्हत्या. शिवाय मानधनही तिला खूप कमी दिलं जातं होतं. त्यामुळं तिनं अनेक मालिका अर्ध्यावर सोडल्या. अनिताच्या मते जर तिनं एजाजसोबत अफेअर केलं नसतं तर आज कदाचित ती बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री असती. पुढे अनितानं लग्न केलं. दोन मुलांची आई झाली. वैयक्तिक आयुष्यात तिनं स्थैर्य मिळवलं. पण दुसरीकडे करिअरला मात्र उतरती कळा लागली. कधीकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली अनिता सध्या चांगल्या कामाच्या शोधात आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Anita hassanandani, Bold photoshoot, Entertainment, Payment, Salary

    पुढील बातम्या