मुंबई, 2 नोव्हेंबर : मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या कामाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सईची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. ती कायमच कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय ठरत असते. अशातच कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली मराठमोठी सई पुन्हा एकदा चर्चेत आलीये. यावेळी तिच्या चर्चेत येण्याचं कारण काही वेगळंच आहे.
सई ताम्हणकरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सईसोबत आणखी एक व्यक्ती आहे मात्र त्याचा चेहरा दिसत नाहीये. हा फोटो शेअर करत सईने लिहिलं की, 'रिअलवाला कॅन्डीड आणि कोण आहे ते ओळखा?' मग काय सईच्या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडत असल्याचं दिसतंय. अनेकजण तो व्यक्ती कोण असू शकतो ज्याला पाहूण सईच्या डोळ्यांत तेज आलंय, विचारत आहेत. पोस्टवर कमेंट करत वेगवेगळ्या लोकप्रिय व्यक्तींची नाव घेत आहेत.
View this post on Instagram
'शाहरुख खान, प्रतिक बब्बर, रोमन रेंस', अशी नाव घेत कमेंट करत आहेत. आणि सईच्या पोस्टला भरभरुन लाईक्स मिळत पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्यामुळे आता ही व्यक्ती असणार याकडे सईच्या चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. चाहत्यांचा गेस खरा ठरतोय का? हे पाहणंही उत्सुकतेचं असणार आहे.
दरम्यान, सईनं वैविध्यपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. सई सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांशीही नेहमीच कनेक्टेड असलेली पहायला मिळते. सई लवकरच आणखी एका हिंदी चित्रपटात दिसणरा आहे. 'इंडिया लॉकडाऊन' असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाच सईसोबत प्रतीक बब्बर, प्रकाश बेलवडी, श्वेता बसू प्रसाद, आहाना कुमराहे हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. सईनं नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. पोस्टरवरुन आणि चित्रपटाच्या नावावरुन हा कोरोना महामारीच्या काळात लागलेल्या लॉगडाऊनवर आधारित असल्याचं दिसतंय. सई तिच्या नव्या भूमिकेत काय वेगळं करणार आणि प्रेक्षकांची मनं कितपत जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.