जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कुठे आणि कोणत्या अवस्थेत आहे 'खतरो की खिलाडी' ची पहिली विजेता? 50 लाख मिळताच झाली होती गायब

कुठे आणि कोणत्या अवस्थेत आहे 'खतरो की खिलाडी' ची पहिली विजेता? 50 लाख मिळताच झाली होती गायब

nethra raghuraman

nethra raghuraman

खतरो के खिलाडीचा पहिला किताब नावावर करणारी सुपर मॉडेल, 50 लाख मिळताच झाली होती गायब, आता काय करते आणि कोणत्या अवस्थेत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 7 मे- सध्या सगळीकडे खतरो की खिलाडी या शोची चर्चा आहे. पण या शोच्या पहिल्या सीजनची विजेता कोण आहे आणि ती सध्या काय करते याबद्दल तुम्हाला माहिती आहे का..? 2008 मध्ये आलेल्या खतरो के खिलाडीच्या पहिल्या सीजनमध्ये नेत्रा रघुरामन आणि उर्वशी शर्मा हिच्यामध्ये चांगलीत फायट रंगली होती. मात्र बाजी नेत्रा रघुरामन हिनं मारत खतरो के खिलाडीचा किताब पटकवला होता. पहिला सीजन बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने होस्ट केला होता. पहिल्या सीजनमध्ये पूजा बेदी, अदिति गोवित्रिकर, अंजना सुखानी, सोनाली कुलकर्णी, याना गुप्ता, मेघना नायडु, अनीता हसनंदानी, दीपान्निता शर्मा, विद्या मालवड़े आणि तापूर चटर्जी यांनी सहभार नोंदवला होता. हा शो नेत्राने जिंकल्यानंतर तिला 50 लाखाची रक्कम मिळाली होती. वाचा- करिअर फ्लॉप होताच कुठे गायब झाली राजेश खन्नांची दुसरी लेक रिंकी? नेत्र रघुरामनचा जन्म 29 नोव्हेंबर 1976 रोजी गुजरातमधील वडोदरा येथे झाला. सुपरमॉडेल असण्यासोबतच नेत्रा अभिनय विश्वातही सक्रीय आहे. खासकरुन भोपाळ एक्सप्रेस, तुम … हो ना ! आणि इंटकम: द परफेक्ट गेममधील तिने साकारलेल्या भूमिकांसाठी ती ओळखली जाती.  तेव्हा तिला खूप आर्थिक मदतीची गरज होती, जेव्हा नेत्रा या शोची विजेती झाली तेव्हा तिने या जिंकलेल्या रक्कमेबद्दल सांगितले होते. तेव्हा तिला खूप आर्थिक मदतीची गरज होती, म्हणून ती या शोचा भाग बनली होती. काही वैयक्तिक कामासाठी तिला खूप पैशांची गरज होती. असं म्हटलं जातं की जेव्हा नेत्रा या शोची विजेती झाली तेव्हा तिला वाटलं होतं की, ती जास्त सिनेमे आणि टीव्ही शोज करेल, नाव कमवेल, पण तसं झालं नाही.

जाहिरात

बिझनेसमन कुणाल गुहासोबत लग्न केले नेत्राने 2011 मध्ये बिझनेसमन कुणाल गुहासोबत लग्न केले होते. तो प्रसिद्ध क्रिकेटपटू सुब्रतो गुहा यांचा मुलगा आहे. नेत्राला एक मुलगी आहे. लग्नानंतर नेत्राने टीव्ही च्या दुनियेला कायमचा रामराम ठोकला. अनेकदा तिला टीव्हीवर काम करण्याविषयी विचारण्यात आलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

यावर ती म्हणाली आहे की, मला नेहमीच सुपरमॉडेल व्हायचे होते आणि आता तिला या इमेजमध्ये जगायचे आहे. 2001 मध्ये नेत्रा रघुरामन अभिनेता अर्शद वारसीसोबत ‘नाच मेरी जां नाच नाच’या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात