मुंबई, 3 ऑक्टोबर : बॉलिवूडचा हॅडसम हंक अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या बॉडी, डान्स आणि अॅक्शनमुळे ओळखला जातो. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांशी कनेक्ट असतो. फोटो, व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांना त्याच्याविषयी अपडेट देत असतो. नुकतंच टायगरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनं मात्र त्याच्या चाहत्यांची चिंता वाढवली आहे. टायगरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये टायगर बिपी चेक करताना दिसत आहे. या व्हिडीओसोबत टायगरने लिहिलं की, ‘एका अॅक्शन हिरोच्या जीवनातील आणखी एक दिवस’. टायगरचा हा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. टायगरला नक्की काय झालं?, असा प्रश्न चाहते विचारत आहेत. टायगरचा हा व्हिडीओ काही क्षणांतच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर येताना दिसत आहेत.
‘हिरोपंती’ ते ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ चित्रपटांतून टायगरने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अभिनयाव्यतिरिक्त तो फिटनेस फ्रिकदेखील आहे. तो त्याच्या वर्कआऊटचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो. अनेकजण त्याचा फिटनेस फंडा फॉलो करताना दिसतात.
दरम्यान, टायगर श्रॉफ लवकरच ‘स्क्रू धीला’ चित्रपटात दिसणार आहे. शशांक खेतान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून ह चित्रपट करण जौहर निर्मित आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. टीझरमध्ये टायगर एका पी.टी टीचरची भूमिका साकरताना दिसणार आहे.