मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘काय टॉर्चर आहे यार’ बॉलिवूडमधील या गोष्टीमुळे वैतागला विवेक ओबेरॉय

‘काय टॉर्चर आहे यार’ बॉलिवूडमधील या गोष्टीमुळे वैतागला विवेक ओबेरॉय

राणी मुखर्जी (Rani Mukerji) आणि विवेक ओबेरॉयच्या (Vivek Oberoi) साथिया (Sathiya) या सिनेमाने नुकतीच 18 वर्ष पूर्ण केली. बॉलिवूडमधील ही गोष्ट विवेक ओबेरॉयला अजिबात आवडत नाही.

राणी मुखर्जी (Rani Mukerji) आणि विवेक ओबेरॉयच्या (Vivek Oberoi) साथिया (Sathiya) या सिनेमाने नुकतीच 18 वर्ष पूर्ण केली. बॉलिवूडमधील ही गोष्ट विवेक ओबेरॉयला अजिबात आवडत नाही.

राणी मुखर्जी (Rani Mukerji) आणि विवेक ओबेरॉयच्या (Vivek Oberoi) साथिया (Sathiya) या सिनेमाने नुकतीच 18 वर्ष पूर्ण केली. बॉलिवूडमधील ही गोष्ट विवेक ओबेरॉयला अजिबात आवडत नाही.

मुंबई, 24 डिसेंबर: विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हा बॉलिवूडचा एक हँडसम हँक. नुकत्याच त्याच्या साथिया (Sathiya) या सिनेमाला 18 वर्ष पूर्ण झाली आहेत. साथिया या सिनेमाने त्यावेळचे सगळे रेकॉर्ड् तोडले होते. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. साथिया सिनेमामुळे विवेक ओबेरॉय आणि राणी मुखर्जी (Rani Mukhrjee) यांचा बॉलिवूडमधील भाव चांगलाच वधारला होता. त्यांच्या फॅन फॉलोईंगमध्येही मोठी वाढ झाली होती. विवेकने इ टाम्सशी बातचित करताना एक किस्सा सांगितला होता.

'साथिया' सिनेमा रिलीज झाल्यानंतर विवेक ओबेरॉय आणि राणी मुखर्जी यांना पुण्यातील एका थिएटरमध्ये प्रमोशनसाठी बोलवण्यात आलं होतं. ते दोघं येणार म्हणून तिथे लोकांनी अक्षरक्ष: गराडा घातला होता. तिथे जमलेल्या अनेक तरुणी विवेकच्या नावाने ओरडत होत्या. विवेक म्हणतो, ‘त्या वेळी मला रॉकस्टार असल्यासारखं वाटत होतं. हजारो तरुणी आपल्या एन्ट्रीला आपल्या नावाने ओरडत आहेत हे दृश्य या आधी फक्त कॉन्सर्टमध्येच पाहिलं होतं. हे सगळं बघून मला स्वत:चा अभिमान वाटत होता.’

विवेक ओबेरॉयच्या करिअरला दोन दशकांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. तो म्हणतो, ‘बॉलिवूडमध्ये इतकी वर्ष काम करत आहे. अनेक गोष्टी बदलल्या पण गोष्ट तशीच आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी शूटिंग करत असता, तिथे हाडं गोठवणारी थंडी असते. पण तुम्हाला कॅमेऱ्यासमोर कधी गाणं म्हणावं लागतं, चेहरा हसरा ठेवावा लागतो. याऊलट वाळवंटात जेव्हा शूटिंग सुरू असतं तेव्हा तुम्हाला जाडजूड लेदर जॅकेट घालायला देतात.  ज्याला काहीच अर्थ नसतो. पण हे सगळं करावं लागतं. असं घडलं की काय टॉर्चर आहे यार.. असं म्हणायची वेळ येते पण काय करणार? शेवटी काम आहे ते करावंच लागतं.’

साथिया सिनेमा या काळात बनवायचा झाला तर कोणत्या कलाकारांना मोठ्या पडद्यावर पाहायला आवडेल? असा प्रश्न विवेकला विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, ‘कार्तिक आर्यन आणि आलिया भट्ट हे या व्यक्तीरेखेसाठी अतिशय योग्य कलाकार आहेत असं मला वाटतं.’

विवेक ओबेरॉयने आत्तापर्यंत नरेंद्र मोदी, क्रिश 3, मस्ती, ग्रँड मस्ती, शूटआऊट अट लोकंडवाला, प्रिन्स, ओमकारा अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Rani Mukharjee, Vivek oberoi