मुंबई, 12 फेब्रुवारी : ‘माझा होशील ना’ (Majha hoshil na) या मालिकेत सध्या सई आणि आदित्य पळून जाताना दिसतात आणि सुयश आणि त्याचे लोक दोघांचाही पाठलाग करतात. हा गंभीर असता सीन करताना त्यामागे एक मजेशीर गोष्ट घडली. ज्याचा व्हिडीओ आदित्य म्हणजेच अभिनेता विराजस कुलकर्णीनं (Virajas Kulkarni) शेअर केला आहे आहे.
माझ्या होशील नामधील या सीनमध्ये सई आदित्यसोबत पळते आहे. त्यावेळी ती नऊवारी नेसली आहे. पण पळता पळता सईची साडी सुटते. दोघंही सुयशच्या तावडीत सापडो न सापडो पण साडीमुळे त्यांची पंचायत होते. साडी सुटण्याचं नेमकं कारण म्हणजे तिनं ती साडी जीन्सवर नेसली आहे आणि प्रत्यक्ष आयुष्यात असं काही करता येत नाही, हे विराजसनं आपल्या पोस्टमधून सांगितलं आहे.
View this post on Instagram
विराजस म्हणाला, “जीन्सवर नऊवारी साडी नेसून फक्त मालिकेमध्ये पळून जाता येतं. खऱ्या आयुष्यात ती अशी सुटली तर शॉट कट करता येत नाही.” (funny saree video) अशी गंमतीशीर पोस्ट करत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आगामी कथानकानुसार ‘माझा होशील ना’ या मालिकेत सई आणि आदित्य पळून जाण्याची योजना आखतात. अर्थात हे पळण्याचं चित्रीकरण सुरू असताना सईचा तोल जातो परिणामी तिची नऊवारी साडी सुटते. हा गंमतीशीर प्रसंग विराजसनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
हे वाचा - सलमान खानची कथित EX गर्लफ्रेंड पुन्हा चर्चेत; सल्लूसोबतच्या नात्याबाबत केला मोठा खुलासा
‘माझा होशील ना’ (Majha hoshil na) ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून चर्चेत आहे. सध्या रंगतदार वळणावर असलेली ही मालिका कमी काळात तुफान लोकप्रिय झाली. त्यामुळे या मालिकेविषयीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते कायमच आतूर असतात. (Aditya marriage special episode) विशेष म्हणजे लवकरच या मालिकेत सई आणि आदित्यचा लग्नसोहळा रंगणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Majha hoshil na, Marathi entertainment, Photo viral, Saree scene, Valentine's day, Valentine's week