विक्रम फडणीसच्या 'हृदयांतर'चं पोस्टर रिलीज

‘हृदयांतर’ चित्रपटामध्ये सोनाली खरे, मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याचबरोबर चित्रपटामध्ये सुपरस्टार हृतिक रोशन आणि टीव्ही होस्ट मनिष पॉलच्याही भूमिका आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 11, 2017 04:49 PM IST

विक्रम फडणीसच्या 'हृदयांतर'चं पोस्टर रिलीज

11 मे : फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस आपल्या पहिल्या मराठी फिल्म ‘हृदयांतर’व्दारे लेखक-दिग्दर्शक-निर्माता म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. भावनात्मक नाट्य असलेल्या ‘हृदयांतर’ सिनेमाचं पोस्टर मंगळवारी रिलीज झालं.   ‘हृदयांतर’ चित्रपटामध्ये सोनाली खरे, मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याचबरोबर चित्रपटामध्ये सुपरस्टार हृतिक रोशन आणि टीव्ही होस्ट मनिष पॉलच्याही भूमिका आहेत.

फिल्ममेकर्सनी या चित्रपटाची तारीख अगोदर 9 जून निश्चित केली होती. पण आता हा सिनेमा 7 जुलै 2017ला थिएटर्समध्ये  झळकणार आहे.

याबद्दल  विक्रम फडणीस म्हणतो, 'ही फिल्म मोठ्यांनीच नाही तर लहान मुलांनीही पाहावी, असं आम्हाला वाटतं. ही कौटुंबिक भावनात्मक फिल्म आहे. त्यामुळे प्रत्येक आई-वडिलांनी त्यांच्या मुलांसह ही फिल्म पाहावी, असं आम्हांला वाटतं. त्यामुळे आम्ही सर्वानुमते हृदयांतर 7 जुलैला रिलीज करायचा निर्णय घेतलाय.'

विक्रम फडणवीससोबत प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांनी या सिनेमाची निर्मिती केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 11, 2017 11:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...