जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Liger च्या अपयशानंतर विजय देवरकोंडाचा मोठा निर्णय; समोर आल्या डिटेल्स

Liger च्या अपयशानंतर विजय देवरकोंडाचा मोठा निर्णय; समोर आल्या डिटेल्स

vijay deverkonda

vijay deverkonda

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे स्टारर ‘लाइगर’ चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा पहायला मिळाली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तेवढी कमाल दाखवू शकला नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 3 सप्टेंबर : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे स्टारर ‘लाइगर’ चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा पहायला मिळाली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तेवढी कमाल दाखवू शकला नाही. हा चित्रपट फ्लॉप झाला आणि तो पाहिल्यानंतर लोकांच्या सतत नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. 125 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आठ दिवसांत 40 कोटींचा आकडा पार करू शकलेला नाही. त्यामुळे ‘लाइगर’च्या संपूर्ण टीमला मोठ्या नुकसानास सामोरं जावं लागत आहे. ‘लाइगर’ चित्रपटाने केवळ 40 कोटींचा व्यवसाय केला असून आता विजय आणि चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी हे नुकसान भरून काढण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. लाइगर फ्लॉप झाल्यानंतर विजय आता त्याच्या आगामी ‘जन गण मन’ या चित्रपटाबाबत चिंतेत आहे. विजयच्या या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ करत आहेत. अशा परिस्थितीत विजय आणि पुरी यांना जनानाथ मेकर्सचे मोठे नुकसान भरून काढायचे आहे. हेही वाचा -  जॅकलीननंतर सुकेशमुळे आणखी एक अभिनेत्री अडचणीत, मनी लाँड्रिंग प्रकरणात 6 तास चौकशी विजय देवरकोंडा आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी पुढील चित्रपट ‘जन गण मन’साठी त्यांची फी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जन गण मन’ चित्रपटाचे बजेट निम्मे करण्यात आले आहे. एवढेच नाही तर चित्रपटाच्या कथेवरही फेरविचार केला जात आहे. पुरी जगन्नाथ यांनी विजयला लाइगर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ‘जन गण मन’ची स्टोरी सांगितली आणि तेव्हा विजयला ही स्टोरी आवडली आणि त्यानी होकार कळवला. विजयच्या पहिले हा चित्रपट महेश बाबूला ऑफर करण्यात आला होता. मात्र काही कारणास्तव तो हा चित्रपट करु शकत नव्हता. दरम्यान, ‘जन गण मन’ पुढील वर्षी 3 ऑगस्ट रोजी हिंदी, कन्नड, तामिळ, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय जादू दाखवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात