मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Vijay Deverakondaनं मध्यरात्री Samantha Ruth Prabhu सोबत केलं असं काही....Video Viral

Vijay Deverakondaनं मध्यरात्री Samantha Ruth Prabhu सोबत केलं असं काही....Video Viral

Samantha Ruth Prabhu Birthday : यावेळीचा समंथाचा बर्थडे वर्किंग राहिला आहे. कारण यावेळी ती सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत तिच्या आगामी वीडी 11 या सिनेमाचं शूटींग करत आहे.

Samantha Ruth Prabhu Birthday : यावेळीचा समंथाचा बर्थडे वर्किंग राहिला आहे. कारण यावेळी ती सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत तिच्या आगामी वीडी 11 या सिनेमाचं शूटींग करत आहे.

Samantha Ruth Prabhu Birthday : यावेळीचा समंथाचा बर्थडे वर्किंग राहिला आहे. कारण यावेळी ती सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत तिच्या आगामी वीडी 11 या सिनेमाचं शूटींग करत आहे.

मुंबई, 28 एप्रिल- Samantha Ruth Prabhu Birthday : ‘साऊथ क्वीन’ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आज 28 एप्रिल रोजी आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे. केवळ दक्षिणात्यचं नव्हे, तर बॉलिवूड विश्वातही समंथाने आपल्या अभिनयाच्या जोरावर हक्काचे स्थान निर्माण केले आहे. यावेळीचा समंथाचा बर्थडे वर्किंग राहिला आहे. कारण यावेळी ती सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत तिच्या आगामी वीडी 11 या सिनेमाचं शूटींग करत आहे. या शूटींगवेळी विजय देवरकोंडानं समंथाला मध्यरात्री एक खास सप्राईज दिलं. विजय देवरकोंडाने सिनेमाच्या निर्मांत्यासोबत मिळून एक जबरदस्त प्लॅन केला. ज्यामध्ये समंथासाठी एक खास सीन लिहिण्यात आला होता. हा एक प्लॅनचा भाग होता. या सीनवेळी समंथा विजय देवरकोंडाच्या जवळ येते व तिचा डायलॉग म्हणताना दिसत आहे.

समंथा नंतर विजय देवरकोंडाची डायलॉग म्हणायची वेळ येते तशी विजय देवरकोंडा फक्त समंथा....असं म्हणतो..आपलं नाव ऐकताची ती जोरात हासू लागते. तिला वाटत की विजय सिनेमातील तिचं नाव विसरून तिचं खरं नाव घेत आहे. यानंतर वेळ न घालवता विजय देवरकोंडा लगेच त्याचं वाक्य पूर्ण करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. समंथा हे सरप्राईज पाहून दंग होते. यानंतर सेटवरील सर्व लोक तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वाचा-KGF 2 च्या तुफान सक्सेसनंतर व्हेकेशन एन्जॉय करतोय यश,पत्नीसोबतचे रोमॅंटिक फोटो..

काश्मीर बेस्ट रोमँटिक स्टोरी

विजय देवरकोंडा आणि समंथा रुथ प्रभू यांचा हा चित्रपट काश्मीर बेस्ट रोमँटिक स्टोरी आहे. ज्यामध्ये फिल्मस्टार विजय देवरकोंडा आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर समंथा काश्मिरी महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक शिव निर्वाण आहेत. या चित्रपटाचे निर्माते मैत्री मुव्ही मेकर्स आहेत. या चित्रपटात समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा पहिल्यांदाच दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.

साऊथ अभिनेता नागा चैतन्य याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली होती. या घटस्फोटानंतर अभिनेत्री बराच काळ ट्रोल झाली होती. मात्र, या सगळ्याचा परिणाम आपल्या कामावर न होऊ देता, तिने सर्वांना कामातून याचे उत्तर दिले.

First published:
top videos

    Tags: Tollywood