मुंबई, 2 सप्टेंबर : सिनेअभिनेता सुशांत सिंह याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडला जबरदस्त धक्का बसला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर नेपोटिज्मपासून अगदी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर सवाल उपस्थित करण्यात आला. सध्या सुशांतच्या प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिचा तपास सुरू आहे. सुशांतच्या मृत्यू मागे रियाचा हात असल्याचा आरोप सुशांतच्या चाहत्यांकडून केला जात आहे. अद्याप रिया विरोधात कोणतेही पुरावे हाती आलेले नाही. मात्र अशातही रिया विरोधात जोरदार टीका केली जात आहे. यामध्ये रिया चक्रवर्ती आणि दिग्दर्शक महेश भट यांच्यातील नातं आणि सुशांतच्या संपत्तीचा हव्यास आधी आरोप तिच्यावर केली जात आहेत. यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींनी रियाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यात आता प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन समोर आली आहे. विद्या बालनने ट्विट करीत रियाला पाठिंबा दर्शवला आहे.
लक्ष्मी मंचूने रियाला पाठिंबा दर्शविणारी पोस्ट केली आहे. यामध्ये तिने राजदीप सरदेसाई यांनी रियाच्या मुलाखतीचा उल्लेख केला आहे. त्यानंतर तिला प्रतिक्रिया देत विद्या बालनही या प्रकरणात आपलं मत व्यक्त केलं आहे.
@LakshmiManchu pic.twitter.com/GnjPpsyoaq
— vidya balan (@vidya_balan) September 1, 2020
यामध्ये विद्याने संविधानाचा आदर करण्याचं आवाहन केलं आहे. अद्याप रियावरील आरोप सिद्ध झाला नसून तोपर्यंत तिला दोषी ठरवू नये अशी भावना व्यक्त केली आहे. विद्या बालन व्यतिरिक्त अभिनेत्री तापसू पन्नूनेही याला पाठिंबा दर्शविला आहे. तिच्याविरोधात आरोप अद्याप सिद्ध झालेले नाही, त्यामुळे तिला दोषी ठरवू नये असं मत व्यक्त केले आहे.