मुंबई,22 मार्च- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री
(Tv Actress) अंकिता लोखंडेने
(Ankita Lokhande) गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये बॉयफ्रेंड विकी जैनसोबत
(Vicky Jain) लग्न
(Wedding) केलं आहे. या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. अंकिता आणि विकी हे सध्या लोकप्रिय सेलिब्रेटी कपल्सपैकी एक आहेत. हे दोघेही अनेकवेळा त्यांच्या खाजगी आयुष्यावर खुलेपणाने बोलताना दिसतात. आणि आता पुन्हा एकदा असंच काहीसं घडलं आहे. नुकतंच विकी आणि अंकिताने खुलासा करत सांगितलं की, विकी गेली दोन वर्षे घरजावई म्हणून का राहात आहे.
एका मुलाखतीदरम्यान विकीला विचारण्यात आले की, त्यालाआपल्या पत्नीसोबत आपलं घर शेअर करताना कसं वाटतं. यावर तो गमतीने म्हणाला की अंकिता लोखंडेने या प्रश्नाचं उत्तर द्यावं कारण सध्या तो अंकिताच्या घरी तिच्या आई-वडिलांसोबत घरजावई म्हणून राहात आहे. विकीने सांगितले की, तो जेव्हाही मुंबईला येतो तेव्हा तो अंकिताच्या घरीच राहतो. कारण त्यांनी खरेदी केलेल्या नवीन घराच्या रिन्युएशनचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीय.
ETimes ला दिलेल्या एका मुलाखतीत विकी जैनने म्हटलं- 'कारण, आम्ही खरेदी केलेल्या घरात अजूनही रिन्युएशनचं काम सुरू आहे. त्यामुळे आम्ही आमच्या नवीन घरात स्थलांतरित होऊ शकलो नाही. मी अजूनही अंकिताच्या घरी 'घरजावई ' म्हणून राहात आहे. मी जेव्हाही मुंबईत येतो तेव्हा अंकिताच्या घरी राहतो. त्यामुळे हा प्रश्न अंकिताला विचारायला हवा, कारण तिचं घर, तिचं कपबोर्ड माझ्यासोबत शेअर करून तिला कसं वाटतंय'.
(हे वाचा:खूप वर्षांनी पूर्ण झालं पूजा सावंतच स्वप्न, Video शेअर करत दिली माहिती )
दरम्यान अंकिता लोखंडेने एकाच घरात एकत्र राहणं आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्याविषयीही सांगितलं. ती म्हणाली- 'मला वाटतं की एक कपल म्हणून आमचं खरं आयुष्य एकत्र तेव्हा सुरू होईल जेव्हा आम्ही दोघे पती-पत्नी म्हणून आमच्या घरात राहायला जाणार. जेव्हा आपण आपलं घर बांधायला सुरुवात करतो, तेव्हा ती एका दाम्पत्याच्या आयुष्याची आणि नात्याच्या प्रवासाची खरी सुरुवात असते. मला माहीत आहे की मी खूप चांगली गृहिणी होणार आहे. मी सर्वकाही व्यवस्थित सांभाळून घेईन. विकीसोबत मला माझं आयुष्य आणि इतर काहीही शेअर करण्यात मला कोणतीही अडचण नाही'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.