...आणि स्वत:च्याच लग्नात बेशुद्ध पडले ऋषी कपूर, नीतू यांनी सांगितला होता किस्सा

...आणि स्वत:च्याच लग्नात बेशुद्ध पडले ऋषी कपूर, नीतू यांनी सांगितला होता किस्सा

ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्यापासून ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत नीतू सिंग सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत होत्या.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांचं आज निधन झालं. 2018मध्ये कॅन्सर झाल्यानंतर त्यांच्यावर 11 महिने उपचार करण्यात आले होते. मात्र बुधवारी रात्री अचानक ऋषी कपूर यांची तब्येत बिघडली, त्यामुळं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. या त्यांच्या खडतर प्रवासात त्यांच्या सोबत एक व्यक्ती कायम होती, ती म्हणजे त्यांची पत्नी नीतू सिंग.

ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्यापासून ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत नीतू सिंग सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत होत्या. अगदी किशोरवयात एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ऋषी कपूर आणि नीतू सिंग कायमच एक आदर्श कपल होते. अनेक खडतर प्रसंगात दोघं एकमेकांसोबत होते. वयाच्या 21व्या वर्षी नीतू सिंग यांनी ऋषी कपूर यांच्याशी विवाह केला, तो फक्त पहिल्या नजरेत झालेल्या प्रेमामुळं.

ऋषी कपूर आणि नितू सिंग यांचा पहिला सिनेमा होता जहरीला इंसान. या सिनेमामध्ये काम करताना त्यांची मैत्री झाली. नीतू त्यावेळी फक्त 14 वर्षांच्या होत्या. ऋषी कपूर यांनी नीतू यांना पाहताच ते त्यांच्या प्रेमात पडले. पहिल्या नजरेतील प्रेम कदाचित यालाच म्हणतात. त्यावेळी नुकतेच ऋषी कपूर यांचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर त्यानी जहरीला इंसानच्या सेटवरच नीतू सिंग यांना प्रपोज केलं आणि ते दुसऱ्या सिनेमासाठी युरोपला गेले. मात्र त्याचं मन काही लागत नव्हतं. त्यांनी त्यावेळी नीतू सिंग यांना टेलीग्राम पाठवला होता की,'माझं तुझ्याशिवाय मन नाही लागत आहे'. अखेर नीतू सिंग यांनी ऋषी कपूर यांना होकार दिला.

22 जानेवारी 1980मध्ये ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचा विवाह झाला. त्याच्या विवाहत घडलेले मजेशीर प्रसंग नीतू सिंग यांनी एका कार्यक्रमात सांगितला होता. नीतू आणि ऋषी कपूर यांचा विवाह धुमधडातक्यात झाला. मात्र लग्नाआधीच दोघंही बेशुद्ध पडले होते. नीतू सिंग यांनी परिधान केलेले घागरा खूप जड होता, त्यांना स्वत:ला सावरताही येत नव्हते, त्यामुळं अचानक त्या खाली पडल्या. तर थोड्या वेळानं खूप गर्दी पाहून ऋषी कपूर अस्वस्थ झाले आणि ते बेशुद्ध पडले. अखेर लग्न मंडपात डॉक्टर आले आणि थोड्या वेळानं दोघांचा विवाह झाला.

ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचं प्रेम खुललं ते बॉबी सिनेमाच्या सेटवर. नीतू आणि ऋषी कपूर यांनी अनेक सिनेमे एकत्र केले. 'रफू चक्कर', 'दूसरा आदमी', 'कभी-कभी', 'अमर अकबर एंथोनी' सारख्या सिनेमांमध्ये लोकांनी त्यांना खूप पसंत केले. एका मुलाखती दरम्यान ऋषी कपूर यांनी सांगितलं की, 'मला फक्त हिच सांभाळू शकते'. अखेर ऋषी कपूर यांच्या शेवटच्या क्षणी नीतू सिंग, रणबीर आणि संपूर्ण कपूर कुटुंब सोबत होते.

First published: April 30, 2020, 1:48 PM IST

ताज्या बातम्या