Home /News /entertainment /

'मी दिव्याचा तिरस्कार..', ब्रेकअपनंतर दिव्याबद्दल काय म्हणाले वरुण सूदचे वडिल?

'मी दिव्याचा तिरस्कार..', ब्रेकअपनंतर दिव्याबद्दल काय म्हणाले वरुण सूदचे वडिल?

बहुचर्चित रिऍलिटी शो 'बिग बॉस ओटीटी'ची विजेती (Bigg Boss OTT Winner) दिव्या अग्रवालने (Divya Agrawal) अलीकडेच तिच्या ब्रेकअपची (Breakup) घोषणा केली आहे.

    मुंबई, 9 मार्च-   बहुचर्चित रिऍलिटी शो 'बिग बॉस ओटीटी'ची विजेती  (Bigg Boss OTT Winner)  दिव्या अग्रवालने (Divya Agrawal)  अलीकडेच तिच्या ब्रेकअपची  (Breakup) घोषणा केली आहे. दिव्याच्या या खुलास्याने तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. दिव्या गेल्या 4 वर्षांपासून अभिनेता वरुण सूदला   (Varun Sood)  डेट करत होती. एवढेच नाही तर 'बिग बॉस ओटीटी' जिंकल्यावर तिने वरुणसोबत सेलिब्रेशनही केलं होतं. ब्रेकअपची घोषणा करण्यासोबतच दिव्याने वरुणच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि वागण्याचेही कौतुक केले आहे. ती आणि वरुण चांगले मित्र राहतील असेही तिने सांगितले आहे. दिव्या अग्रवालने वरुण सूदसोबत ब्रेकअपचा खुलासा केल्यानंतर वरुण सूदने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'सदैव आणि कायमचे' असे लिहिले आहे. वरुणच्या या कॅप्शनवर एका यूजरने लिहिले की, "नाव तरी सांग कुणासोबत?" मात्र, या युजरच्या कमेंटवर वरुणने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आता वरुणचे वडील विनीत सूद यांनी युजरच्या कमेंटला उत्तर दिलं आहे. विनीत सूद म्हणजेच वरुणच्या वडिलांनी ट्विट करत लिहिलंय, "दिव्याच्या निर्णयाचा आदर करतो. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. अजूनही आहे. हेच तर आयुष्य आहे. मी दिव्याचा तिरस्कार करत नाही. दिव्याबद्दल माझ्या मनात कोणतीही नकारात्मकता नाही. तिच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड प्रेम आणि काळजी होती आणि कायम राहील. त्या दोघांनाही सोबत घालवलेल्या सुंदर क्षणांचं मूल्य आहे'. विनीत सूदने दिव्या अग्रवालबद्द्दल पुढे लिहिले, "तुम्ही एकत्र घालविलेले सुंदर क्षण जतन करा आणि भविष्यासाठी एकमेकांना शुभेच्छा द्या आणि देव तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जावो." आई आणि मीसुद्धा हेच करू. रॉक ऑन." असं म्हणत वरुणच्या वडिलांनी लक्षवेधी ट्विट केलं आहे. तसेच दिव्याने ब्रेकअपची घोषणा केल्यानंतर लोक वरुण सूदवर दिव्याची फसवणूक केल्याचा आरोप करत होते. वरुणची एक्स गर्लफ्रेंड बेनाफ्शा सूनावाला हिनेही त्याच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. (हे वाचा:अंकिता लोखंडे करत होती डान्स, पाठीमागे होते सासरे, नंतर जे घडलं, पाहा VIDEO ) लोकांनी वरुणवर केलेला फसवणुकीचा आरोप दिव्या अग्रवालला अजिबात आवडला नाही. वरुणच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या ट्विटरवरील युजर्सचेही तिने तोंड बंद केलं आहे. दिव्याने तिच्या एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, वरुणच्या चारित्र्यावर काहीही बोलण्याची कोणात हिंमत आहे?. प्रत्येक वेळी वेगळं होण्यासाठी चारित्र्य हेच कारण नसतं. तो एक अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहे. एकटी राहण्याचा हा माझा निर्णय आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Breakup, Entertainment, Tv actors

    पुढील बातम्या