मुंबई, 9 एप्रिल- वरुण धवन बॉलिवूडमधील असा अभिनेता आहे जो आपलं खाजगी आयुष्य नेहमीच कॅमेऱ्यापासून दूर ठेवणं पसंत करतो. खरं तर वरुणची पत्नी नताशाला लाइमलाईटमध्ये राहणं अजिबात आवडत नाही. ती एक अतिशय खाजगी स्वभावाची व्यक्ती असल्याचं वारंवार पाहायला मिळालं आहे. फारच क्वचित नताशा मीडियासमोर येते. दरम्यान आता नताशा आणि वरुणच्या खाजगी आयुष्याबाबत एक मोठा अंदाज लावला जात आहे. वरुण धवन आणि नताशा आईबाबा बनणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. पाहूया नेमकं काय घडलं. वरुण धवन हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनेत्याचे अलीकडील चित्रपट जरी फ्लॉप ठरले असले तरी त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. वरुण आपल्या मजेशीर स्वभावासाठी ओळखला जातो. तो नेहमीच आपल्या सह कलाकारांसोबत मजामस्ती करताना दिसून येतो. वरुण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता अभिनेता पिता बनणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. (हे वाचा: ‘राम तेरी गंगा मैली’च्या ‘त्या’ सीनने माजलेली खळबळ; आजही लोकांना भाळतो मंदाकिनीचा पांढऱ्या साडीतील लुक ) सोशल मीडियावर सध्या वरुण धवन आणि पत्नी नताशा दलालचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे नताशाकडे गुड न्यूज असल्याचा अंदाज बांधला जात आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये नताशा आणि वरुण धवन मुंबईतील खार येथील एका फर्टिलिटी क्लिनिकमधून बाहेर पडताना दिसून येत आहेत. त्यामुळे नताशा आई बनणार आहे का? असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित झाला आहे.
याआधीसुद्धा वरुण धवनची पत्नी नताशा आई बनणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. वरुण धवन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. वरुण प्रत्येक सणाला किंवा लहान-मोठ्या आनंदाच्या क्षणाला पत्नीसोबतचे सुंदर फोटो शेअर करत असतो. एकदा वरुणने असेच काही फोटो शेअर केले होते. जे पाहून नताशा गरोदर असल्याचा अंदाज लावला जात होता. मात्र असं काहीही नसल्याचं समोर आलं होतं. त्यांनंतर आता पुन्हा एकदा वरुण आणि नताशा आईबाबा बनणार असल्याचं म्हटलं जात आहे.
वरुण धवन आणि नताशा दलाल हे शालेय वयापासून एकमेकांवर प्रेम करतात. हे दोघे तेव्हापासून एकत्र आहेत. एकमेकांना दीर्घकाळ डेट केल्यानंतर जानेवारी 2021 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. दोघांच्या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते.