मुंबई, 09 जानेवारी : वैभव तत्ववादी, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांचं त्रिकुट म्हणजे सिनेप्रेमींसाठी पर्वणी. हे तिघंही एकत्र येतायत रेडिमिक्स या सिनेमातून. या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला. वैभव तत्ववादी, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांच्या व्यक्तिरेखांचं विलोभनीय दर्शन आणि त्यावर अभिनेते सचिन खेडेकर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजातील मोजक्या शब्दातलं खुमासदार वर्णन. या टीझरमधून सिनेमा कसा आहे, हे लक्षात येतं. आजच्या तरुणांचेच विषय यात आहेत. वैभवची व्यक्तिरेखा फारशी विचार न करणारी तर नेहा अति विचार करणारी. प्रार्थना उशिरा विचार करणारी. हे तिघं एकत्र येतात आणि मग एकेक गमतीजमती घडत राहतात.
निर्माते प्रशांत घैसास, सुनील वसंत भोसले निर्मित आणि जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘रेडीमिक्स’मध्ये समीर चिटणीस या उमद्या तरुण इंटिरियर डेकोरेटरच्या आयुष्याची कथा आहे. त्याच्या आयुष्यात नुपूर ही सुंदर तरुणी येते, आणि त्यानंतर त्याचे आयुष्य रोमँटिक वळण घेतं. आजचा आघाडीचा युथ आयकॉन - अर्थात लव्हरबॉय वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे आणि हरहुन्नरी अभिनेत्री नेहा जोशी यांच्या अभिनयाचं रसायन आहे. गीतकार गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, अभय इनामदार यांनी शब्दबद्ध केलेल्या गीतांना अविनाश–विश्वजित यांनी संगीत दिलंय.गायिका आर्या आंबेकर, मुग्धा कऱ्हाडे, शिखा जैन, गायक आशिष शर्मा, फराद भिवंडीवाला, विश्वजित जोशी यांनी आवाज दिलाय. कोरिओग्राफर दिपाली विचारे यांनी कोरिओग्राफी केली आहे. …चौघडा बोलतो दारी गं नवरी आली, ईशा-विक्रांतचे लग्नाचे PHOTOS व्हायरल