जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / उषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार!

उषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार!

उषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार!

महाराष्ट्राच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी या एका महत्वाच्या भूमिकेमध्ये मालिकेमध्ये दिसणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 16 जानेवारी : कलर्स मराठीवरील ‘घाडगे & सून’ या मालिकेमध्ये बऱ्याच घटना घडत आहेत. मालिकेमध्ये घराची विभागणी झाली आहे. अक्षय आणि कियारा घाडगे सदनमध्ये परतल्यानंतर अमृता घर सोडणार असं सांगते.  यामुळे अण्णा आणि माई अमृताला संपत्तीमधला काही हिस्सा द्यावा असं म्हणतात.  यावरूनच वसुधा भांडणाची एक ठिणगी पडते. इतकं वर्ष जपलेलं हे कुटुंब अचानक तुटलं हे माईना सहन होत नाही त्यामुळेच माई आणि अण्णा पूर्णपणे खचून जातात. आता अमृता हा नात्यांचा गुंता कसा सोडवणार? कसं घराला सावरणार? अक्षय तिची मदत कशी करणार? असे बरेच प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. आणि आता या सगळ्यामध्ये मालिकेमध्ये एक वेगळंच वळण येणार आहे. कारण घाडगे सदन मध्ये एक नवी एन्ट्री होणार आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी या एका महत्वाच्या भूमिकेमध्ये मालिकेमध्ये दिसणार आहेत. बऱ्याच दिवसानंतर त्या छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. या आधी त्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिसल्या होत्या, ज्यामध्ये त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं. घाडगे & सून या मालिकेमधील घाडगे सदनमध्ये माईची चुलत सासू म्हणून उषाजींची एन्ट्री होणार आहे. त्यांच्या स्वागताची लगबग आता सुरु झाली आहे. कियारा आणि अक्षयचे लग्न झाले आहे याची माहिती येणाऱ्या पाहुण्याला नसल्याने पुन्हा एकदा साडी आणि मंगळसूत्र घातलेली अमृता प्रेक्षकांना दिसणार आहे. बिग बॉस म्हणजे वेड्यांचा बाजार आहे असं बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या उषा नाडकर्णींनी म्हटलं होतं. या घरात रहाणं हे येऱ्या गबाळ्याचं काम नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. गेले 77 दिवस आपण या घरात कसं राहिलो याचं आपल्यालाच अश्चर्य वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात